पुस्तकांतून

मराठी वाङ्मयकोश

मराठी वाङमयकोश हा एक खूप महत्त्वाचा प्रकल्प आहे. आजवरच्या हजारो मराठी लेखकांची माहिती यात आहे. त्यातला प्रबोधनकारांवरचा हा उतारा. यातली माहिती खूपच त्रोटक आहे. अन्य अनेक लेखकांच्या तुलनेत प्रबोधनकारांचं योगदान खूप मोठं असूनही त्यांनी योग्य जागा देण्यात आलीय, असं वाटत नाही.

लोकमान्य ते महात्मा

ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांचा लोकमान्य ते महात्मा हा महाग्रंथ अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. टिळक ते गांधी या स्थित्यंतराचा महाराष्ट्राच्या संदर्भातला वेध त्यांनी यात घेतला आहे. या टप्प्यातला प्रबोधनकारांचा महाराष्ट्रावरचा प्रभाव निर्विवाद आहे. तरीही त्याकडे सर्वसाधारणपणे दुर्लक्ष केले जाते. पण या ग्रंथात ते होत नाही.

मी पंढरी गिरणगावचा

वक्तृत्व कला आणि साधना या पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रबोधनकारांनी ‘माझे शिष्य’ असा गौरव केला तो ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचा. सध्या मार्मिकचे कार्यकारी संपादक असणा-या सावंतांनी ‘मी पंढरी गिरणगावचा’ या आत्मचरित्रपर पुस्तकात प्रबोधनकारांविषयी मनापासून लिहिलं आहे. त्यातलं ‘प्रबोधनकारांच्या तालमीत’ हे महत्त्वाचं प्रकरण.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

- धनंजय कीर
धनंजय कीरांचं आंबेडकर चरित्र अनेक अर्थांनी महत्त्वाचं मानलं जातं. एकतर बाबासाहेब जिवंत असताना हे आलं म्हणून आणि दुसरं म्हणजे बाबासाहेबांचं हे पहिलंच सविस्तर चरित्र. प्रबोधनकार हे बाबासाहेबांचे समकालीन. समतेच्या लढाईतले हे दोन महत्त्वाचे नेते. म्हणून या चरित्रातले प्रबोधनकारांविषयीचे हे संदर्भ.

महाराष्ट्रातील प्रमुख संपादक

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त डायमंड प्रकाशनाने प्रसिद्ध वक्ते प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथमाला प्रकाशित केली. त्यातलं एक पुस्तक, ‘महाराष्ट्रातील प्रमुख संपादक’. ऋता बावडेकर यांनी हे लिहिलंय. यामध्ये प्रबोधनकारांचा उल्लेख असणं स्वाभाविकच होतं.

मराठी वृत्तपत्रांचा इतिहास

- रा. के. लेले

प्रबोधनकारांच्या कर्तृत्वाचं एक प्रमुख अंग हे पत्रकारितेचं. त्यांच्या या कर्तृत्वाविषयी खूप चांगली माहिती रा. के. लेले लिखित मराठी वृत्तपत्रांचा इतिहास या महाग्रंथात वाचायला मिळते.
.............
प्रबोधन : केशव सीताराम ठाकरे (1885-1973)

Subscribe to पुस्तकांतून