लेख

सत्यशोधक प्रबोधनकार

राज्यात युतीची सत्ता आली आणि प्रबोधनकारांचं समग्र साहित्य छापण्याचा निर्णय घेण्यात आला. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांनी पहिल्या खंडाला प्रस्तावना लिहिली. प्रबोधनकारांच्या कालातीत कर्तृत्वाचा नेमका परिचय करून देणारी ती प्रस्तावना...

गणपती, प्रबोधनकार आणि शिवसेना

नव्या पिढीला प्रबोधनकारांची आठवण नाही, असं म्हटलं जातं. पण तरुण पत्रकार सचिन परब यांनी हे म्हणणं खोटं ठरवलंय. जमाना इंटरनेटचा आहे. या आधुनिक आणि प्रभावी माध्यमातून प्रबोधनकारांचं समग्र साहित्य जगभर पोचवावं ही परब यांचीच कल्पना. त्यातूनच ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ ही वेबसाईट तयार झाली.

प्रबोधनकार: एक द्रष्टे समाजसुधारक

पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी सामना मधील सारे काही समष्टीसाठी या सदरात लिहिलेला हा लेख. परिवर्ननवादी चळवळीमधलं प्रबोधनकारांचं योगदान या लेखातून अधोरेखित होतं.

छत्रपती शाहू महाराज व प्रबोधनकार ठाकरे

महाराष्ट्राच्या समाजपरिवर्तनाच्या चळवळीतील दोन बिनीचे शिलेदार म्हणजे, छत्रपती शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे. एक सामाजिक समता प्रत्यक्ष राबवणारा रयतेचा राजा तर दुसरा खरा माणूसधर्म ठणकावून सांगणारा लढाऊ विचारवंत. या दोन महात्म्यांच्या ऋणानुबंधावर प्रकाश टाकलाय ज्येष्ठ साहित्यिक नामदेव ढसाळ यांनी...

रोखठोक

हा नोंदवजा लेख सी. के. पी. को-ऑप बँक लिमिटेडच्या २०१० च्या सुवर्ण महोत्सव महाराष्ट्रानिमित्त काढलेल्या खास कॅलेंडरमधे छापण्यात आला आहे. यात संयुक्त महाराष्ट्राच्या विविध नेत्यांविषयी प्रत्येक महिन्यात माहिती आहे. मे महिन्याच्या पानावर मोठ्या फोटोसह प्रबोधनकारांविषयी हा मजकूर वाचायला मिळतो.

भेटी लागी जीवा

प्रबोधनकारांविषयीचा हा लेख आहे साहित्यिक गंगाधर महांबरे यांचा. ‘भेटी लागी जीवा’ या पुस्तकात त्यांनी काही व्यक्तिचित्र रेखाटली आहेत. त्यात प्रबोधनकारांचंही व्यक्तिचित्र आहे. ते हे. शिवाय त्यांच्याच ‘साक्षेपी समीक्षा’ या पुस्तकातही प्रबोधनकारांविषयी लिहिलंय.

बहुजनांचे कैवारी ठाकरे आणि अत्रे

‘महाराष्ट्र’ नाव उच्चारताच ज्या महापुरुषांची नावे डोळ्यापुढे येतात, त्यातील दोन ठळक नावे म्हणजे, प्रबोधनकार ठाकरे आणि आचार्य अत्रे. हे दोन महावीर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून लढले. त्याहीपूर्वी त्यांनी आपल्या वाणी आणि लेखणीने महाराष्ट्र ढवळून काढला होता.

आज प्रबोधनकारांनी आग लावली असती

- अमर हबीब, अंबाजोगाई

इतिहासापासून सिनेमा पटकथेपर्यंत सर्वत्र संचार करणा-या प्रबोधनकारांच्या लेखणीने शेतक-यांविषयीही मोठ्या तळमळीनं लिहिलं आहे. महाराष्ट्रातील शेतक-यांच्या आंदोलनात त्यांचं पुस्तक ‘शेतक-यांचे स्वराज्य’ खूप मोलाचं आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अमर हबीब यांचा या पुस्तकाची ओळख करून देणारा हा विशेष लेख...

Pages

Subscribe to लेख