आत्मभान देणारा विचारवंत : Page 6 of 7

गुरू मानतो, हे महत्त्वाचं.

प्रबोधनकार भाऊरावांसोबत अस्पृश्य बोर्डिंगसाठी हरिजन फंडातून पैसे मिळवण्यासाठी गांधीजींकडेही गेले होते. टिळकवाद्यांचं वर्चस्व मोडून काढणारा महात्मा म्हणून प्रबोधनकारांना गांधीजींचं कौतुकही होतं. पण त्यांनी गांधीजींना वेळोवेळी ठोकूनही काढलंय. आपण म्हणता आयाम ए बेगर विथ बाऊल. आपण बेगर तर खरेच , पण रॉयल बेगर आहात नि भाऊराव रियल बेगर आहेत ’, असं गांधीजींना सडेतोड सांगत त्यांनी भाऊरावांसाठी वर्षाला हजार रुपये देणगी मिळवली. पुढे दोन वर्षांनी अकोल्याला गांधीजींची सभा होऊ नये यासाठी प्रयत्न करणा-या सत्याग्रहींना टोलवत गांधीजींना सुखरूप सभास्थानी पोहोचवण्याचा पराक्रमही घडवून आणला होता. फार नंतर गांधीजींना महात्माऐवजी मिस्टर असं संबोधन लावण्याचा आग्रह होता, म्हणून त्यांनी नथुराम गोडसेच्या अग्रणी मासिकात लिहिणं सोडून दिलं.

सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे प्रणेते

पुण्याहून मुंबईतला परतल्यावर त्यांनी १९२६ सालचा दादरचा गणपती गाजवला. तिथे अस्पृश्याच्या हातून गणपतीची पूजा व्हावी यासाठी ब्राम्हणेतर आग्रह धरून होते. पण गणपती मंडळाचे ब्राम्हण पुढारी ऐकायला तयार नव्हते. मार्ग काढला नाही तर मी गणपती फोडून टाकेन, असा बॉम्ब प्रबोधनकारांनी टाकला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रावबहाद्दूर बोले यांच्या मध्यस्थीमुळे दलित नेते मडकेबुवांच्या हातची फुलं ब्राह्मण पुजारी प्रत्यक्षात देवाला वाहिल, असा मार्ग निघाला. पण पुढच्या वर्षीपासून दादरचा गणेशोत्सव बंद पडला.

ठाक-यांनी गणपती बंद पाडला अशी हाकाटी झाली. म्हणून मग सार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली. गुजराती गरबे आणि बंगाली दुर्गापूजा हे आधीपासून असतीलही पण मूर्ती आणून देवीची महाराष्ट्रीय पद्घतीची नवरात्री सुरू करण्याचं श्रेय प्रबोधनकारांचंच  पण त्यांनी याला शिवकालात असा उत्सव पूर्वी असायचा पण पेशवेकाळात बंद पडला, असे दाखले दिले होते. लोकहितवादी संघ ही संस्था स्थापन करून दादरला आजच्या टिळक पुलाजवळच्या एका मैदानात हा उत्सव साजरा झाला. त्याला पालघरपासून कुलाब्यापर्यंतच्या ब्राम्हणेतरांनी जोरदार प्रतिसाद दिला. पुढच्या वर्षी तो महाराष्ट्रभर पसरला. आजही प्रबोधनकारांनी सुरू केलेला उत्सव खांडके चाळीत सुरू आहे.

बहुजनवादी हिंदुत्वाचा मूळपुरुष

हिंदुत्ववाद आणि बहुजनवाद याचा समन्वय साधण्याच्या अचाट कामाचं श्रेय प्रबोधनकारांकडे जातं. हिंदुत्वाच्या बुरख्यात ब्राम्हणी फायदा लाटण्याला त्यांनी कडाडून विरोध केला. ते स्वतः हिंदुत्ववादी होते, पण त्यांचा पाया बहुजनवादाचा होता. त्यांना बहुजनवादी हिंदुत्वाचा मूळपुरूष मानायला हवं. ब्राह्मणेतर आंदोलनातले काँग्रेसकडे न गेलेले अनेक मोठे नेते न. चिं. केळकर आणि सावरकरांच्या प्रभावामुळे हिंदुमहासभेकडे गेले. पण प्रबोधनकारांचा बाणा कायम स्वतंत्रच राहिला. ते काँग्रेस आणि हिंदुमहासभेपासून समान अंतर राखून राहिले.

प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाचा पाया गजाननराव वैद्य यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीत घातला गेला. सोसायटीने धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदूधर्मात आणण्याचं काम केलं. शिवाय याविषयी वैचारिक दृष्टीनेही त्यांचं काम महत्त्वाचं आहे. पण वैद्य आणि त्यांचे अनुयायी ब्राम्हणेतर असल्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्याकडे कायम दुर्लक्ष केलं. प्रबोधनकार यांनी हिंदू मिशनरी म्हणून अनेक वर्ष प्रचार केला. गावोगाव व्याख्यानं दिली. नागपूरच्या हिंदू मिशनरी परिषदेचे ते अध्यक्षही होते. वैद्यांनी तयार केलेल्या वैदिक विवाह विधीचं त्यांनी संपादन केलं. अनेकांच्या लग्नात नव्या विधीनुसार पौरोहित्य केलं. आजही वैदिक विवाह विधी प्रसिद्ध आहे.

हिंदू धर्मातील अंधश्रद्ध परंपरांवर आणि आद्य शंकराचार्यांपासून लोकमान्य टिळकांपर्यंत हिंदुत्ववाद्यांच्या आदर्शांवर घणाघात, तसंच ब्राह्मणेतर आंदोलनाचं नेतृत्व त्यांच्या दृष्टीने हिंदुत्ववादाचाच एक भाग होता. मुस्लिम तसंच ख्रिश्चनांवर त्यांनी पूर्वग्रहातून आरोप केलेलेही कुठेच आढळत नाहीत. त्यांचा हिंदुत्ववाद दलितांच्या विरोधात नव्हताच, उलट तो दलितांची बाजू घेऊन लढत होता.

वाङमय

वक्तृत्वशास्त्र (१११९) हे प्रबोधनकारांचं पहिलं महत्त्वाचं पुस्तक मानायला हवं. अशा विषयावरचं ते भारतीय भाषांमधलं पहिलं पुस्तक असावं. खुद्द लोकमान्य टिळकांनी याचं कौतूक केलं होतं. पण त्याआधीही त्यांनी लाईफ अँड मिशन ऑफ रामदास (१९१८) हे संत रामदासांचं इंग्रजी चरित्र लिहिल्याचा उल्लेख आहे. पण ते पुस्तक आज उपलब्ध नाही. भारत इतिहास संशोधन