सविस्तर चरित्र: Page 8 of 8

पडले, वय वाढू लागले. अशा परिस्थितीत पनवेलला घरात सटरफटर कामे करण्यापेक्षा आपण मुंबईला जावे आणि एखाद्या कंपनीत नोकरी करावी. चार पैसे घरी पाठवावे. त्या विचाराने प्रबोधनकार मुंबईला रवाना झाले. मुंबईला गेल्यावर पहिला प्रश्न सर्वांना पडतो तो प्रबोधनकारांनाही पडला. तो म्हणजे राहण्याचा. ''मुंबई गिरगावातल्या धसवीतील शेणवी चाळीतील फणसे यांच्या खोलीच्या पोटमाळयावर प्रबोधनकारांच्या राहण्याची सोय झाली.'' खेतवाडीतील एका खाजगी शाळेत इंग्रजी पहिल्या इयत्तेला इंग्रजी हा विषय रोज दोन तास शिकविण्याची नोकरी महिना पावणे आठ रुपये पगारावर मिळाली. विरोधात आमांशबाधेचे झगण्याची निमित्त प्रवृत्ती होऊन १९०२ विद्यार्थी मध्ये दशेपासूनच लवकरच पुन्हा धाकटा भाऊ यशवंतही त्यांच्या शिक्षणासाठी प्रबोधनकारांकडे मुंबईला आला. त्याच्या शिक्षणाची व्यवस्थित सोय लावली न लावली तोच पनवेलमध्ये पुन्हा प्लेगची साथ सुरु झाली. संक्रांतीला सण म्हणून दोघेही भाऊ मुंबईहून पनवेलला आले. ऐन संक्रांतीच्या दिवशी पहाटेच वडिलांना ताप आला. प्रबोधनकारांनी आणि ताईंनी जमेल ते उपाय केले, पण कशाचे काय, सायंकाळी प्रबोधनकारांचे पितृछत्र काळाच्या पडद्याआड गेले. कुटुंबाचा पोशिंदाच नाहीसा झाला.

प्रबोधनकारांच्या वयाच्या अठराव्या वर्षी वडील वारले. वडिलांच्या मृत्यूनंतर तात्यांच्या सव्वासात रुपये पेन्शनीत दहा-बारा माणसांच्या कुटुंबाचे भागणे शक्यच नव्हते. यशवंतला त्याच्या पुढील शिक्षणासाठी मुंबईला ठेवले आणि प्रबोधनकारांनी पनवेलला घरीच ठाण मांडले. मॅट्रिक होऊन वकिलीची (पनवेलला) परीक्षा दिलीच पाहिजे, त्यासाठी पडतील ते काम नि उलाढाली करण्याचा त्यांनी निश्चय केला. कुटुंब पोषणाची जबाबदारी पार पाडीत, पाट्या रंगविण्याचे काम पूर्ण केले. पुढे काय? हा प्रश्न होताच. त्यावर, प्रबोधनकारांच्या डोक्यातून धारदार सुरी, रबराचे पातळी शीट, लाकडी तुकडा आणि मूठ यांचा वापर करुन रबरी शिक्के तयार करण्याची कल्पना निघाली. त्यांनी लगेच तो उद्योग सुरु केला. त्याला चांगला प्रतिसादही लाभल्यावर प्रबोधनकारांनी 'ठाकरे ब्रदर्स रबर स्टॅम्प मेकर्स, साईन बोर्ड पेंटर्स ऍंन्ड बाईंडर' अशी पाटीच घरावर लावली. या सगळया ओढाताणीतून आर्थिक प्राप्तीचा मार्ग प्रबोधनकारांना काढावा लागत होता आणि शिक्षण पूर्ण करण्याचीही जिद्द होती. रबर स्टॅम्पच्या उद्योगातून झालेली कमाई बय आणि ताईच्या हातावर ठेऊन मॅट्रिक पास होण्याचे समर्थांकडे गेले. तेथून कलकत्ता युनिव्हर्सिटीची परीक्षा देण्यासाठी त्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले. परीक्षा फी भरण्यासाठी अनेक जाती संस्थांचे उंबरठे झिजविले. मुदतीत परीक्षेस फी भरण्यासाठी लागणारे दहा रुपये जमविण्यासाठी अभ्यासही चालू ठेवला.

पनवेलला वडिलांनी घेतलेले टांगांच्या स्वप्न साकार करण्यासाठी प्रबोधनकार बारामतीला रावसाहेब त्यांनी पराकोटीचे प्रयत्न केले, पण अवघा दीड रुपया कमी पडला म्हणून प्रबोधनकारांच्या हातून जी निसटली ती कायमची. ती पुन्हा कधीच लाभली नाही. प्रबोधनकार मॅट्रिक पास होऊ शकले नाहीत; परंतू साहित्याचा नि स्वाध्यायाचा व्यासंग पाहिल्यावर त्यांच्या पांडित्याची आणि अचाट बुध्दिमतेची कल्पना येते. धनंजय कीर म्हणतात, ''प्रवेश फीमध्ये दीड रुपया कमी पडल्यामुळे त्यांची मॅट्रिकची परीक्षा हुकली. तथापि, प्रबोधनकारांची ज्ञानलालसा एवढी प्रबळ की, त्यांनी स्वाध्यायाच्या बळावर जे ज्ञान संपादन केले ते विश्वविद्यालयाच्या डॉक्टरेट संपादन केलेल्या दोन चार पंडितांच्या व्यासंगा इतके अफाट होते.'' प्रबोधनकारांवर झालेले संस्कार : 'जशी खाण तशी माती' म्हणतात हे काही खोटे नाही. घरात जसे संस्कार मुलावर होतील तसेच पुढे त्याचे चरित्र बनत जाते. प्रबोधनकारांच्या अंगी स्वाभिमान, ते फक्त साडेआठच रुपये जमवू शकले. आयुष्यातील मॅट्रिक होण्याची संधी कडक शिस्त, पराकोटीचा आत्मविश्वास आणि हरहुन्नरीपणा,