सविस्तर चरित्र: Page 6 of 8

केली. 'मनोरंजन'मध्ये वारंवार लेख प्रसिध्द होऊ लागल्यावर त्यांना वाटले, आपणही एखादे साप्ताहिक सुरु करावे. एक दिवस काही कामासाठी मामलेदार कचेरीत गेले तर तेथे कॉपिंग शाईचा वापर करुन दाबयंत्राच्या साहाय्याने एकाच मजकुराच्या अनेक प्रती काढल्या जात. लगेच कल्पना सुचली. दुकानातून ताबडतोब टीपकागद, शाई, लेखणी सारे साहित्य आणून 'विद्यार्थी' नावाचे हस्तलिखित लिहिले. साध्या लाकडाच्या फळीचा वापर करुन पन्नास प्रती काढल्या. तेव्हा सगळयांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. अंकातील सुबकता, सजावट, मजकूर पाहून सगळयांनी त्यांचे तोंड भरुन कौतुक केले. ''या विद्यार्थी साप्ताहिकापासून वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके, दैनिके काढण्याची परंपरा जी या घराण्यात सुरु झाली ती आजतागायत सुरु आहे.

प्रबोधनकारांनी आयुष्यभर अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळी केल्या. त्या चळवळींचा श्रीगणेशा विद्यार्थीदशेतच केला. पनवेलला इंग्रजी शाळेत देवधर नावाचे मास्तर शिकविण्यास अगदीच रद्दड. ते गेले दोन तीन महिन्यांच्या रजेवर. त्या ठिकाणी तात्पुरती बदली होऊन आले होते गाडगीळ. गाडगीळसर शिकविण्यात अतिशय पटाईत. थोड्याच काळात सर्व विद्यार्थ्यांचे लाडके बनले. रजा संपताच देवधर येणार नि गाडगीळ जाणार हे कळताच गाडगीळांना 'आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही' असे आश्वासन प्रबोधनकारांनी दिले. सर्व विद्यार्थ्यांच्या बैठकीत तो अर्ज गोखले मास्तराने लिहिला आहे, असा आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे देवधर मास्तर आणि गोखले यांच्यातच जुंपली. प्रबोधनकार हिरीरीने पुढे सरसावले आणि म्हणाले, ''अहो देवधर मास्तर तो अर्ज मी लिहिला आहे. आम्हा मुलांना तुम्ही नको. काय म्हणणे आहे तुमचे? गाडगीळांच्या जागी तुम्ही याल त्या दिवशी सारी शाळा ओस पाडीन, लक्षात ठेवा. ''म्युनिसिपालिटीच्या बैठकीत जाऊन प्रबोधनकारांनी तो अर्ज गोखले यांनी लिहिलेला नसून तो स्वतः मी लिहिलेला आहे, हे पटवून देण्यासाठी तसाच दुसरा अर्ज लिहून आणि आम्हाला हे देवधर सर नको आहेत, हे ठणकावून सांगितले. अखेर या प्रबोधनकारांच्या चळवळीने गाडगीळांना शाळेवर कायम केले.

पनवेलची इंग्रजी शाळा म्हणजे पाचवी पुरती. त्यावेळी पाचवी म्हणजेच पब्लिक सर्व्हिस परीक्षा; परंतू ही पध्दत सरकारने त्यावेळी बंद केली. नाही तर प्रबोधनकारांना सरकारी नोकरी तात्काळ मिळाली असती आणि ओढग्रस्त, हालाखीच्या आर्थिक परिस्थितीत कुटुंबाला तेवढाच हातभार लागला असता. पाचवी इयत्ता झाली, पुढे काय हा प्रश्न आई-वडिलांच्या समोर उभा ठाकला. प्रबोधनकारांनी निदान मॅट्रिक तरी व्हावे, ही घरातील सगळयांची इच्छा. ''मी मॅट्रिक होऊन स्ट्रिक्ट प्लीरची परीक्षा द्यावी आणि पनवेल येथे प्रॅक्टिस करावी, ही ताईची महत्वाकांक्षा. त्यावेळी दादर आणि कल्याण येथे मॅट्रिक पर्यंतच्या कल्याणला ड्राईंग विषयाची सोय म्हणून वडील सीताराम ठाकरे यांनी पनवेलवरुन कल्याणला बदली करुन घेतली.'' कल्याणला प्रवेश होताच पुरेशा विद्यार्थ्यांअभावी शाळेने ड्रॉईंग क्लास आणि दहावीचा वर्ग बंद केला. सहावीपर्यंतचे तरी वर्ग सुरु राहीले, हे प्रबोधनकारांचे नशीबच, नाहीतर नुकतीच बदली करुन घेतलेली आणि लगेच दुसरीकडे जायचे म्हणजे नाही तीच आफत. सहावी झाल्यानंतर पुन्हा तोच प्रश्न दत्त म्हणून उभा पुढे काय? दादर नको तर ठाण्याचा रेल्वेपास काढण्याइतकी खिशाची ताकद सह्या घेऊन दिला अर्ज म्युनिसिपालिटीच्या सेक्रेटरीला. दाखवला शिक्षणाची सोय होती.

प्रबोधनकारांना चित्रकलेचा छंद आणि नसल्यामुळे प्रबोधनकारांना घरीच बसावे लागले. कल्याणला दहा-बारा माणसांचे कुटुंब वडिलांना बेलीफची नोकरी. त्यांचा पगार १५ रुपये. खायचेच वांदे तिथे प्रबोधनकारांच्या शिक्षणाचा प्रश्न पडला सांधीलाच. ताईचे म्हणणे दुस-या मुलांना जे शिकवले असेल त्याची माहिती घेऊन घरी अभ्यास चालू ठेव. पण पुस्तकांचा प्रश्न होताच. तो प्रश्न फणसवाडीतील सेकंडहँड पुस्तक विक्रेते गणपत जगन्नाथ यांनी सोडविला. त्यांनी जुन्या पुस्तकांचे एक पार्सल पाठवून दिले. रोज रात्री मित्राच्या घरी जायचे, नोट्स उतरवून यायच्या, असा अभ्यास चालू झाला. अशा ओढाताणीच्या परिस्थितीत अभ्यास सुरु केला. तोपर्यंत दुसरे संकट दत्त म्हणून पुढे हजर. वडिलांची नोकरी गेली. आता आजोबांच्या सव्वासात रुपये पेन्शनवर भागणार कसे? त्यात प्लेगची साथ आल्याने अख्खे कल्याण गावाबाहेर