सविस्तर चरित्र: Page 5 of 8

आणि इंग्रजी विषयांची आवड निर्माण झाली होती. या दोन्ही विषयांवर प्रभुत्त्व आणि आत्मविश्वास मिळविला होता, पण गणितात मात्र प्रबोधनकार कच्चे होते. ते ''म्हणतात, गणित विषयात मात्र आम्ही की मला आकडाच यायचा म्हणाना', हिशोब माझे वैरी.'' ''गणिताचे नि माझेच काय, पण माझ्या सगळया कुटुंबीयांचे एवढे वैर का? ते समजत नाही. अपवाद सांगायचा तर आमचा धाकटा बंधू कै. यशवंतराव ठाकरे यांचे गणित उत्तम. या विषयाबद्दल त्याला 'रॉबर्ट मनी हायस्कुलात' स्कॉलरशिप मिळत असे.''

प्रबोधनकारांना लहानपणापासूनच अस्पृश्यतेची चीड येत असे. घरातही कोणी अस्पृश्यता बाळगीत नसे, पण तो काळच असा होता की ब्राह्मण खालच्या जातीचा विटाळ मानायचे तर इतर जाती आपल्या खालच्या लोकांना अस्पृश्य मानायच्या. ही स्पृश्यास्पृश्यता अस्पृश्य समजल्या जाणा-या जातींतही रुढ होती. आज अस्पृश्यता कोणी पाळीत नसले तरी मुला-मुलींच्या विवाहाच्या वेळी मात्र सांगताना आत्मचरित्रात प्रबोधनकार म्हणतात, ''इंग्रजी पाचवीत असताना पनवेलला मेजर सुभेदार वसाहतीला आले. सायंकाळच्या वेळेला फिरायला गेल्यावर झालीच त्याच्या अभ्यासाची गारगोटी. पुस्ती काढावीच होते. कागदाला लागे. जर संध्याकाळी कोठे डाग नियमित लागला वाचण्यास किंवा बसणेही एखादे अक्षर मोठे रँग्लर! धोटया मारुनही कधी पास झालो नाही. 'आकडे पाहिले या गोष्टीकडे आजही लोक पाहतात. अस्पृश्यतेच्या संदर्भात सुभेदारसाहेबांची अनाचक गाठ पडली. 'गुड इव्हिनिंग सुभेदार साहेब' म्हणून सलाम केला. सुभेदारसाहेबांनी 'गुड इव्हनिंग' करुन शेकहँडसाठी हात पुढे केला आणि मीही झटकन त्या हाताचा सन्मान केला नि संभाषणाचा पहिला धागा पकडला.'' शेवटी घराकडे नमस्कार करुन चालताना सुभेदारीण म्हणाल्या, ''आमच्या घरी या की एकदा, असे म्हणायची आम्हाला सोय नाही अन् विचारलंच तसं तर तुम्ही थोडेच येणार?'' प्रबोधनकारांनी खाडकन उत्तर दिले, का नाही येणार? आत्ता येतो तुमच्या घरी. काय आहे त्यात एवढे? पण ही आहे माझ्या चहाची वेळ. द्याल मला तुम्ही चहा? सुभेदाराची सून हळूच म्हणाली, 'महाराच्या हातचा चहा तुम्ही कसा घ्याल? बाटाल ना? वाळीत टाकील जात तुमची,’त्यावर 'झक मारते जात नि पात. आज घेणारच मी तुमच्या घरी चहा.' या चहाचे गावात बे फुटले. गावातील लोक बयकडे (आजीकडे) तक्रार करु लागले. 'शोभतं का तुमच्या घराण्याला असलं?' त्यावर बयचे उत्तर, 'अहो' कोल्हाटनी, तमाशे नि दारु झोकण्यापेक्षा सुभेदाराकडच्या चहात फारसं पाप काहीच नाही. माणसानं माणसाच्या हातचा चहा प्यायला तर त्यात धर्म कसा बुडतो? चहाच्या कपात बुडण्याइतका आपला धर्म म्हणजे काय टोलेग्याची कवडी आहे वाटतं?''

ठाकरे घराण्यात पत्रकारितेचा प्रारंभ पनवेलला प्रबोधनकारांच्या विद्यार्थी दशेतच झाला. प्रबोधनकारांना वाचण्याचा खूप छंद होता. छंद कसला बुकबाजीचे व्यसनच व्यसन. या व्यसनापायी पुष्कळ वेळा सांसारिक अडचणी उत्पन्न झाल्या नि होत असत, पण ते न सुटता वाढतच गेले. या व्यसनापायी मी शेकडो रुपयांची खैरात केली. ''वाचनाच्या व्यसनातूनच त्यांची लेखनाची उर्मी अनावर झाली. मुंबईत ज्या काळात रस्त्यावर जुनी पुस्तके दोन पैशाला सहज मिळत, अशा एका रस्त्यावरच्या विक्रेत्याकडून प्रबोधनकारांनी 'पॉकेट एन्सायक्लोपिडिया' हे इंग्रजी आणि वर्तमानपत्राच्या कहाणीविषयी दोन लेख त्या काळातील लोकप्रिय अशा 'करमणूक' या साप्ताहिकाकडे पाठवून दिले. दोन महिन्यांनी लेख छापून होते. प्रबोधनकार म्हणतात, ''हयातभर लागलेले माझे दुर्दम्य पुस्तक विकत घेतले. त्यातील छत्र्यांच्या उत्पत्तीविषयी आले. वाचनालयाच्या व्यवस्थापकांना विनंती करुन थोड्या वेळासाठी तो अंक मागून घरी आणला. ताईला दाखवला. प्रबोधनकारांना जवळ बोलावून ताई म्हणाली, ''शाब्बास केशव. असाच खूप लिही. मोठा हो. खूप ज्ञान मिळव आणि ते सगळयांना दे. आता तुझी लेखणी थांबवू नकोस.'' ही बातमी थोड्याच वेळात अख्या पनवेलभर झाली. ठाकरे कुळात पत्रकारितेच्या परंपरेचा उदय या प्रबोधनकारांच्या लेखनाच्या रुपाने झाला. त्याचे महाकाय वृक्षात रुपांतर झालेले आता मा. श्री. बाळासाहेबांच्या रुपाने आणि दै. सामनाच्या रुपाने सर्वांच्या समोर आहे. छापखाना संपादक, मुद्रक यांची परंपरा ठाकरे घराण्यात प्रबोधनकारांनी सुरु