सविस्तर चरित्र: Page 4 of 8

कोण जाणे कसली अचानक हिंमत नि हुरुप त्यांना यायचा. महाराष्ट्रात ब्युबॉनिक प्लेगच्या साथीने कहर उसळविला होता. ‘मेला’या शिवाय लागला दुसरा शब्दच ऐकू येत नसे. प्रबोधनकारांच्या वडिलांनी स्वयंसेवकाची टोळी बनविली. दहा-बारा स्नेही मंडळींनी एक पथक तयार केले. जात पात किंवा धर्म न मानता ज्या घरात प्रेत आहे ते घेऊन त्यांची तळ्याकाळी वाट लावायची. ते एका एका दिवशी पंधरा वीस प्रेतांची विल्हेवाट लावीत असत. १९०२ चा काळ पनवेलमध्ये प्लेगची साथ सुरु झाली. गाव बहुतेक उठून बाहेर गेलेला होता. एवढी संक्रांत झाली की, प्रबोधनकारांचे कुटुंबही बाहेर जाणार होते. भाऊराव जाधवने घरात पाऊल टाकले तोच त्यांच्या जांघेत गाठ आली आणि सणसणून ताप भरला. दुस-या दिवशी भाऊ जाधव मृत्यूमुखी पडला. त्याच्या स्मशान यात्रेहून प्रबोधनकारांचे वडील (बाबा) रात्री दहा वाजता आले. पहाटेच्या सुमाराला त्यांच्या अंगात ताप भरला. ताईने सुचेल तितके उपाय केले. प्रबोधनकार गौरुशेट डॅक्टरांकडे धावले आणि त्यांचे उपचार सुरु झाले. संक्रांतीचा दिवस कधीही जन्मात आजारी न पडलेले बाबा त्याच दिवशी सायंकाळी कालवश झाले. कुटुंबाचा पोशिंदा नाहीसा झाला. प्रबोधनकारांवर अकालीच कुटुंबाच्या पालनपोषणाचा भार पडला.

मातोश्री काशीबाई ऊर्फ ताई : प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, आज आम्ही ठाकरे ज्या सामाजिक, बौध्दिक नि सार्वजनिक पातळीवर आहोत त्याचे सारे श्रेय आमच्या मातोश्रींच्या कर्तबगार नि कडक शिस्तीला आहे. पनवेल गावात आणि घरात सर्वजण तिला ताई म्हणायचे. श्रीमंत, सुखवस्तू वामनराव पत्की यांची ती मोठी मुलगी. मराठी सहावी इयत्तेपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले. त्याचा रोख राखण्यासाठी ती कुणाचीही पर्वा करायची नाही. खोट्या दंभाची, अहंतेची नि कोरड्या फुशारकीची तिला मनस्वी चीड यायची. आम्ही आमच्या वाटेने जात असतो. आमच्या व्यवहारात इतरांना तोंड घालण्याची जरुरी नाही. हे तिचे सांसारिक पिनल कोड असे. संसार गरीबीचा होता. तरी गरजेसाठी तोंड वेंगाडलेले तिला आवडत नसे. असेल ती मीठ-भाकरी गोड करुन खावी. जेवताना हे बरे नि ते वाईट असे बोलण्याची कुणाला मुभा नसे. जेवण झाल्यावर त्याची काय ती चर्चा करा. अन्न हे परब्रह्य आहे. जगातल्या सा-या उलाढाली त्याच्यासाठीच चाललेल्या असतात. ते मुकाट तोंडी शांतपणाने खात जावे असा तिचा दंडक असे. माहेरचा संबंध जितक्यास तितकाच ठरलेला. त्याचाही एखादा खालीवर शब्द ती ऐकून घ्यायची नाही. ती लगेच कडाडून प्रति उत्तर द्यायची. घरातली शिस्त आणि प्रत्येक वस्तू त्याच्या जागेवरच ठेवली पाहिजे नाही तर बिजलीच्या कडकडाटाने सारे घर दणाणून सोडीत असे.

प्रबोधनकारांचे विद्यार्थी जीवन : प्रबोधनकार होते. इंग्रजी भाषेवर त्यांनी चांगले प्रभुत्व मिळविले होते. प्रत्येक शब्दाचा उच्चार आरोह अवरोह व्यवस्थित निघाला पाहिजे, अशी ताईंची सक्त ताकीद असे. पहिल्या इयत्तेवर बोस मास्तर होते. एकदा वाचताना 'आणि' शब्दाचा उच्चार 'आनी' केला. जवळ बोलावून मास्तराने प्रथम एक थोबाडीत दिली. 'आणि' हा उच्चार वर्गात शंभर वेळा वदवून घेतला. दुस-या इयत्तेत शिकताना जोशी नावाच्या गुरुजींनी बेरीज-वजाबाकी शिकण्यासाठी गोटया विकत घ्यायला दोन-दोन आणे आणायला सांगितले. प्रबोधनकारांनी घरी ताईजवळ पैसे मागितले. कशाला तेही सांगितले. ती म्हणाली, 'बरं तू जा शाळेत, मी येते पैसे घेऊन', ताईने येऊन हेडमास्तर आणि जोशी गुरुजींची चांगलीच खरडपट्टी काढली. 'का तुमच्या तिचा स्वभाव अत्यंत मानी होता. लहानपणानपासूनच शरीरप्रकृतीने बारीक पण बुध्दीने तल्लख शाळेत शाळेत रंगीत गोट्यांच्या फळयांचा दुष्काळ पडला की काय? पोराच्या हाताला एकदा गोटी लागली की शाळा सुटल्यावर रोज अर्धा तास खरी (बोलबोध आणि मोठी) आणि पंधरा मिनिटात आवश्यक वळणाप्रमाणे नीट काढता आले नाही तर ताई गालगुच्चा घ्यायची नाहीतर कान पिरगाळायची. मराठी गद्य, पद्य विभाग, इतिहास भूगोल या विषयात शंभर पैकी सत्तर पंच्याहत्तर मार्क मिळाले तरी ती संतापायची. शंभरच्या शंभर मार्क मिळाले पाहिजेत, असा तिचा आग्रह असायचा. लहानपणापासून प्रबोधनकारांना इतिहास