सविस्तर चरित्र: Page 2 of 8

संपत्ती चांगली होती. आप्पांना धाकटे दोन- तीन भाऊ असावेत. प्रारंभी आप्पांची मुले जगत नव्हती. तेव्हा सारे गुण्यागोविंदाने राहत होते. नंतर आप्पांची मुले जगू लागली. कालांतराने प्रत्येकाला वेगळे राहावे असे वाटू लागले. घरात बायकांची भांडणे सुरु झाली. आप्पांचे म्हणणे असे की, 'वडिलोपार्जित इस्टेटीचे तुकडे पाडू नका. जगाला विभक्तपणा दाखवू करावा. मी सल्ला देत जाईन, देखरेख करीन, पण सगळयांनी गुण्यागोविंदाने एकाच वाड्याच्या छपराखाली एका पंक्तीला जेवावे. परंतू या समाजवाणीचा उपयोग झाला नाही. शेवटी आप्पांनी आपल्या सर्व नातेवाईकांना सणाच्या निमित्ताने बोलावून घेतले. गावकरी आणि मित्रांसमोर सर्व मालमत्तेच्या राजीनाम्याचा दस्तऐवज समोर ठेवून त्यावर साक्षीच्या सह्या घेतल्या आणि सर्व मालमत्ता नका. वाटेल तर प्रत्येकाने एकेक कारभार मुखत्यारीने भावांना कायमची देऊन अंगावरच्या कपड्यानिशी ठाण्याला आले. इंग्रजी आमदानीत त्यांनी वकिली चालू केली. त्यांना 'खुर्चीचे वकील' म्हणूनही मान्यता मिळाली. त्याकाळी म्हणतात, ''माझ्या पणजोबांच्या आत्मसंतोषाचा हा भाग सामान्य म्हणता येईल काय? आत्मसामर्थ्याचा कडेलोट असल्याशिवाय असले धाडस कोण करील? वाडवडिलांच्या कमाईवर चैनीत दिवस काढण्यापेक्षा स्वतःच्या मनगटाच्या जोरावर मिळेल ती ओली कोरी भाकर खाण्यातच खरा पुरुषार्थ आहे, हिच त्यागी वृत्तीची शिकवण पुढच्या पिढयांना दिली.'' पणजोबांना चार मुले होती तीन मुलगे आणि एक मुलगी. आजोबा रामचंद्र उर्फ भिकोबा धोपकर : आप्पासाहेबांचा वडील मुलगा रामचंद्र उर्फ भिकोबा हे प्रबोधनकारांचे आजोबा होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यांना सहावी पासचे शिक्षण मिळाले आणि कोर्टात कारकुनाची नोकरी लागली. ठाण्याहून आजोबांची बदली पनवेलच्या स्मॉल कॉज कोर्टात झाली. तेव्हापासून प्रबोधनकारांचे घराणे हे पनवेलचे झाले. प्रबोधनकार ठाकरे यांचे आजोबा रामचंद्र उर्फ भिकोबा यांच्या पर्यंत धोपकर हे आडनाव वापरले. त्यानंतर मात्र प्रबोधनकारांच्या वडिलांनी पनवेलला स्थायिक झाल्यानंतर पनवेलकर हे आडनाव त्याकाळच्या रिवाजानुसार धारण केले, परंतू सीताराम ठाकरे (प्रबोधनकारांच्या पिताश्री) यांनी आपला पुत्र केशव याच्या जन्मदाखल्यात आणि शाळेत नाव घालताना आपले पारंपारिक ठाकरे आडनाव वापरले.

आजोबा भिकोबा यांना दोन पुत्र. एक प्रबोधनकारांचे वडील सीताराम आणि दुसरे विनायकराव. आजोबा भिकोबा भक्तिमार्गी होते. प्रबोधनकारांच्या जन्मापूर्वीच त्यांनी पेन्शन घेतली होती. त्यांची दिनचर्या म्हणजे, दोन वेळा भजन, पुराण वाचन, सकाळ-संध्याकाळ पनवेलच्या सर्व देवांचे दर्शन, गोठयातल्या गाईंची सेवा, बागबगीच्यातील झाडांना पाणी घालणे आणि पळसाच्या पानाच्या पत्रावळी खुर्ची फक्त न्यायाधीशाला असे, प्रबोधनकार तयार करुन विकणे. कुटुंबाच्या किंवा गावकीच्या कोणत्याही भानगडीत ते पडत नसत. ते खराटा घेऊन साफसफाई करायचे. भक्तिमार्गाने आणि शक्ती उपासनेने अशी काही विलक्षण शक्ती त्यांच्या अंगात आली होती, त्यायोगे ते अनेकांच्या व्याधी आणि संकटे दूर करीत. प्रबोधनकार सांगतात, ''पितामह तात्यांची शक्तिउपासना आणि मातुल आजोबा पत्की यांची उत्कृष्ठ शिवोपासना यांचा माझ्या चरित्र आणि चारित्र्यावर फार मोठा परिणाम झालेला आहे.'' आजोबा तात्यांनी काशीयात्रा करीत असताना गया या ठिकाणी आल्यावर अखेरचे महाश्राध्द करायचे ठरविले. महाश्राध्द करणे म्हणजे बेचाळीस पूर्वजांचा उध्दार झाला, असे मानण्यात येई. तेथील महंत श्राध्दाची बेडी काढण्यासाठी शंभरावर रुपये दक्षिणा मागू लागला आणि देत नसाल तर बेडी काढत नाही, असेही म्हणाला. त्यावर तात्यांनी हातातला फुलाचा हार फेकून दिला आणि म्हणाले,'' गाढवा, आमचे पूर्वज नरकात जाणार काय? आता तुलाच दाखवतो नरकाची वाट. एक रुपयापैकी कवडीही वर कुणी देवू नका. आला मोठा स्वर्ग नरकाच्या धमक्या द्यायला. आमच्या पूर्वजांच्या स्वर्ग-नरकाच्या किल्ल्या काय तुझ्या हातात आहेत काय? कोण लागून गेलास तू असा. यावर त्या महंताची त्रेधातिरपीट उडाली. त्याने लोटांगण घातले आणि माफी मागितली.'' हा प्रखर बाणा पुढे प्रबोधनकारांच्या अंगी आलेला दिसून येतो.

मातुल आजोबा वामनराव पत्की : प्रबोधनकारांचे मातुल आजोबा वामनराव पत्की व्यवसायाने वकील होते. त्यांची पनवेलच्या नावलौकिक कुलाबा जिल्ह्यात दुमदुमला होता. पैसाही रग्गड, प्रशस्त घर, जमीन, पत्की कुटुंबाची आर्थिक परिस्थिती