सविस्तर चरित्र

सत्यशोधक प्रबोधनकार मराठवाड्यातील गंगाखेड येथील प्रा. डॉ. विठ्ठल घुले यांनी प्रबोधनकारांवर पीएच. डी. केलीय. ‘प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे सत्यशोधक चळवळीला योगदान’ असे त्यांच्या प्रबंधाचे नाव आहे. प्रबोधनकारांचं चरित्र सांगणारा हा सविस्तर लेख त्यांनी‘प्रबोधनकार डॉट कॉम’साठी लिहिला आहे...

१९ व्या शतकाच्या मध्यानंतर आणि २० व्या शतकाच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात प्रामुख्याने सामाजिक सुधारणा वेगाने घडून आल्या. या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रासह संपूर्ण देशात राजकीय स्वातंत्र्य आणि सामाजिक सुधारणा यांसाठी मोठया प्रमाणात संघर्ष आणि लढे निर्माण झाले. महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीत ज्या व्यक्तींचे अग्रक्रमाने नाव घ्यावे लागते त्यात प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आहेत. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रभाव संपूर्ण शतकभर पडल्याचा दिसतो. आजही त्या निर्भीड आणि जाज्वल्य विचाराची गरज राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक आहे. त्या विचाराचे महत्व तसूभरही कमी झालेले नाही. त्यांच्या परखड आणि वर्मावर घाव घालण्याच्या लेखनशैलीमुळे त्यांनी चालविलेले 'प्रबोधन' हे पाक्षिक त्या काळात खूप गाजले. महाराष्ट्रात तीन हजारांच्या वर वर्गणीदार असणारे ते एकमेव पाक्षिक होते. त्यातूनच त्यांना लोक 'प्रबोधनकार' या टोपण नावाने संबोधू लागले. आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांना याच नावाने ओळखतो.

महात्मा नवसंजीवनी देऊन तो सामाजिक समतेचा आणि न्यायाचा विचार महाराष्ट्रात धुमधडाक्याने प्रसारित करण्याचे कार्य प्रबोधनकारांनी केले. त्यांचे विचार या देशाच्या नवनिर्मितीसाठी युवकांना प्रेरणादायी ठरणारे आहेत. अशा या महान समाजसुधारकाचे संक्षिप्त चरित्र लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. फुल्यांच्या मृत्यूनंतर क्षीण झालेल्या सत्यशोधक चळवळीला प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म कायस्थ प्रभू या जातीत १७ सप्टेंबर १८८५ रोजी पनवेल, जिल्हा ठाणे येथे वडील सीताराम आणि आई काशीबाई उर्फ ताई या सुसंस्कृत दांपत्याच्या पोटी झाला. ठाकरे घराण्याच्या पूर्वीच्या तीन पिढया या कर्तृत्ववान आणि सामाजिक बांधीलकी जपणा-या होत्या. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्याचा वसा घेऊन त्याचे आयुष्यभर पालन केले होते. ठाकरे घराणे मूळचे भोर संस्थानातील पाली या गावचे. मध्यंतरी धोप या किल्याच्या रखवालदारीवरुन त्यांच्या काही पिढयांना धोपकर या नावानेही ओळखू लागले. त्यांची वंशावळ थोडक्यात पाहू.

पणजोबा कृष्णाजी माधव उर्फ आप्पासाहेब : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे मूळचे भोर संस्थानातील पाली या गावचे. आजही त्या गावात काही ठाकरे आडनावाची कुटुंबे असतील, पण त्यांचा आणि प्रबोधनकारांचा आता काहीही संबंध नाही. प्रबोधनकारांचे पणजोबा कृष्णाजी माधव उर्फ आप्पासाहेब हे पाली येथेच राहत असत. आप्पा त्यावेळी घरात वडील होते. वडिलोपार्जीत शेतीवाडी, वाडा, गुरेढोरे,