आमच्याविषयी

आमच्याविषयी

प्रबोधनकार डॉट कॉम तयार करणा-यांची माहिती

सचिन परब

संपादक, संशोधन, संकल्पना

सचिन परब हे सोळा वर्षं पत्रकारितेत आहेत. नवशक्तिचे संपादक, मी मराठी बातम्यांचे कार्यकारी संपादक, महाराष्ट्र टाइम्सचे महानगर संपादक, महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमचे प्रमुख अशा अनेक पदांवर कार्यरत. राजकीय पत्रकार म्हणून महाराष्ट्र टाइम्स, सहारा समय राष्ट्रीय, ई टीवी मराठी, सी न्यूज येथे काम केले. अभ्यासपूर्ण तरीही शैलीदार लेखन ही त्यांची खासियत. विविध संस्थांमधे पत्रकारितेचं अध्यापन. संतसाहित्यावरील रिंगण या आषाढी एकादशी वार्षिकाचं संपादन.

ssparab@gmail.com

राहुल शेवाळे

निर्मिती प्रमुख

राहुल शेवाळे हे सध्या मुंबई महानगर पालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत. गेली सतरा वर्षं ते शिवसेनेचे सक्रिय आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून परिचित आहेत. शिक्षणाने सिविल इंजिनियर असणारे शेवाळे यांचं सामाजिक काम मुंबईतील अणुशक्तीनगर येथे शिवसैनिक म्हणून सुरू झालं. तिथपासून आजपर्यंत खूप तरुण वयातच त्यांनी मुंबईतल्या राजकारणावर आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षात तसेच महापालिकेत विविध पदांवर त्यांनी केलेलं काम आणि निर्णय नावाजले गेले आहेत. प्रबोधनकार डॉट कॉमचा सगळा आर्थिक भार त्यांनी उचलला आहे.

श्रीरंग गायकवाड

कार्यकारी संपादन (रिलॉन्चिंग)

गेली पंधरा वर्षे पत्रकारितेत. वारकरी परंपरा. लोकमत, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती ही वृत्तपत्रे तर आयबीएन-लोकमत, मी मराठी या चॅनेल्समध्ये काम. त्यापूर्वी पुणे विद्यापीठात अधिव्याख्याता म्हणून कार्यरत. मुंबईत पत्रकारितेचं अध्यापन. 'पत्रकार अत्रे' या विषयावर पीएच. डी. संतसाहित्यावरील रिंगण या आषाढी एकादशी वार्षिकाचं संपादन.

 

मराठी वेबसाईट्स डॉट कॉमः तांत्रिक निर्मिती संयोजन

सिद्धार्थ मोकळेः संपादन सहाय्य

अमित चिविलकरः नव्या डिझाइनची ग्राफिक रचना

प्रेरणा तळेकरः संपादन सहाय्य