निवडक बातमीदार: Page 7 of 50

आरपार बदलला. राजेशाहीचे माहात्म्य उमलून त्याचा चेन्दामेन्दा झाला. विज्ञानाच्या मुशींत देवाची कल्पना आणि संस्कृतीच्या कल्पना

आरपार हिणकस ठरल्या

श्रमजीवी जमातीना समाज-रचनेत अग्रपूजेचा मान मिळू लागला. कसेल त्याची जमिन नि काढील त्याचे पीक, या पुकाराने देशोदेशीची सरकारे आज घडत नि बिघडत आहेत. तरीहि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक समाजाच्या आद्यतत्त्वांचा अणूरेणूहि आज चळला ढळलेला दिसत नाही.

मानवतेची अभेद भावाची सेवा

हे फुल्यांचे तत्वच चालू घडीच्या सर्वकारणी आंदोलनाचा आत्मा म्हणून जागतिक तत्वज्ञानांच्या नि विचारवंतांच्या आदरास पात्र झालेले आहे.

समाज धर्म नि राजकारणी क्षेत्रांत आमचेच वर्चस्व अबाधीत असले पाहिजे. समाजनियमन आम्ही करणार, धर्माचा अर्थ आम्ही सांगणार, राज्यसत्ता सुद्धा आमचीच असली पाहिजे, आमच्याच

हुंकारा तुंकारावर

सर्व काही हालले चालले पाहिजे, अशा पिण्डप्रवृत्तीच्या धर्ममार्तंण्डांशी ज्योतिबाचा कर्कश संघर्ष झाला नसता तरच ते एक मोठे जागतिक आश्चर्य होते ते त्याला टाळता आले नाही. आज कोणाला टाळता येत नाही नि पुढे येणारहि नाही. शेकडो वर्षांच्या साम्राज्यवादी अहंकाराने फुरफुरलेल्या या वर्गाची बुद्धिमत्ता तीव्र नि चलाख असल्यामुळे, प्रसंगानुसार

पड खाऊन थप्पड देण्याची हिकमत

त्यांना चांगली अवगत असते. विरोधी पक्ष जोर दाखवू लागला म्हणजे त्याच्या तुणतुण्याशी आपला सूर एकजीव करून, त्याच्या रंगा ढंगांत एकजीव सामील होण्याचा बहाणा करण्याचे कौशल्य आजहि या वर्गात उत्कृष्ट दिसून येते. ज्योतिबाच्या वेळची त्यांची विरोधी हालचाल सध्या दिसणेच शक्य नसले, तरी विरोधाची भाषा, त्याचे रंग आणि मुखवटेच तेवढे बदलले आहेत, ही इतिहाससिद्ध मक्खी नजरेआड करून भागणार नाही.

काँग्रेजी अमदानीत राजद्रोहाच्या इंडियन पिनल कोडी कलमाला जे सरकारी महात्म्य होते, तेच नि तसलेच माहात्म्य आजकाल सत्तारूढ सर्वोदयी काँग्रेजी पक्षाने जातीयवादाच्या बिनबुडाच्या मुद्याला देण्याची कारवायी केली आहे. गिव्ह ए बॅड नेम अँण्ड हँग द डॉग (आधी शिवी हासडावी नि मग कुत-याला खुशाल फांशी द्यावे) अशी इंग्रेजीत एक म्हण आहे. एकाद्या व्यक्तीला अगर संस्थेला हयातींतून उठवावयाची असेल तर

तूं जातीयवादी आहेस

अशी शिवी हासडावी का काम बिनचूक फत्ते ! जातीयवादी या शिवीचा उपक्रम नवीन नाही. जुनाच आहे. सत्यशोधकांची आणि बामणेत्तरांची चळवळ --- करण्यासाठी साम्राज्यवादी धर्म मार्तण्डानी पूर्वी तिचा उपयोग भरपूर केलेला आहे. त्यांची धर्ममार्तण्ड सभा विश्वबंधुत्वाची ! जातीयवाद तेथे औषधाला मिळायचा नाही ! कशावरून ? तर त्यांच्या प्रशस्त दिवाणखान्यांत अस्पृश्यादि बामणेतरांच्या सभांना (रोख भाडे घेतल्यावर) बिनबोभाट जागा देण्यांत येत असते !  बामणेतरांचे कोणतेही कार्य संस्था अथवा वर्तमानपत्र मात्र बेलाशक जातीयवादी. जात जमातीचा सोस काय तो बामणेतराना धर्ममार्तण्ड सारे धुतलेले तांदूळ ! स्वजातिपुरस्कारासाठी त्यांनी काहीहि लिहिले बोलले तरी ते सार्वजनीक हितवादासाठी ! बामणेतरानी पारदर्शक बहुजनवादाचा नुसता शब्द काढला का ठरलेच ते जातियवादाचे महापाप ! हा जातियवाद नुसता ठराविक जातिभेदापुरताच मानायचा नाही, तर त्यात द्वेष मत्सर असूया वगैरे विषारी जंतू वळवळत असल्याचा आरोपहि ठसठशीत मिसळलेला असायचा.

एवढे मोठे मानवतावादी नि विश्वप्रेमी महात्मा गांधी ! त्यांनी ब्रिटिशांचा एवढा कां द्वेष करावा बुवा ?  या देशात हजारो भिन्नभिन्न धर्माच्या नि संस्कृतीच्या जमाती आहेत, त्यांत ब्रिटिश राज्यकर्ते राहिले तर काय बिघडते ? यच्चयावत जगातल्या मानवेतर प्रेमाचा वर्षाव करणारे गांधी एवढे महात्मा ! चले जाव चा सोटा उगारून कां ते इंग्रेजांना निकराचा विरोध करतात ? असल्या शंकेचे एकदा मोठे संभावीत काहूर उठले होते. त्याचा निरास करताना गांधी म्हणाले ''आंग्रेजावर मी प्रेमच करतो नि करणार, पण त्यांच्या साम्राज्यवादाला निकराचा विरोध करणार. '' बामण विरोधात ज्योतिबांचा दृष्टिकोण नेमका हाच नि एवढाच होता. बामणांचा सत्तालोभी साम्राज्यवाद नष्ट झाला का बामण-बामणेतर