निवडक बातमीदार: Page 5 of 50

या ना त्या पक्षाचे भराभर गंडेकरी होताहेत किंवा श्रमजीवी वर्गांतूनच जे नवीन पांढरपेशे ---- होताहेत, ते सारे या एकाच राज्यसत्तेच्या लोभासाठी.

पंथनिष्ठेचे खरकटे चाटीत

असतात. त्यांना मिशनरी कळवळ्याची जनसेवा नको. या देशात ब्रिटिश स्कॉटिश अमेरिकन क्रिस्ती मिशन-

-यांनी अनाथ आणि गुन्हेगार अस्पृश्य रोगी कुष्टी अशा लाखो अभागी हिंदी जीवांना माणुसकीच्या अस्सल तळमळीने पोटाशी धरले, त्याना साक्षर केले. उद्योगाला लावले, माणसांत आणून उभे केले. त्यांच्या त्या उद्धारांतच मिशन-यांनी आपल्या जीवनाचे सार्थक मानले. त्यातच मोक्ष आणि त्या लाखो लाखो जीवांच्या पुनरुद्धारातच परमेश्वर पाहिला. अशी

मानवोद्धाराची मिशनरी तळमळ

आज एकाहि पंथ पक्षात दिसून येत नाही. क्रिस्ती मिशन-याना आम्ही शिव्या दिल्या. त्यांच्या मानवधर्मी कार्याची टर टिंगल केली. त्यांच्यावर नि त्यानी देशभर जागोजाग चालविलेल्या संस्थांची हेटाळणी नि छळहि केला. पण त्यांच्या एवढे दलितोद्धाराचे कार्य गेल्या पासष्ट वर्षांत काँग्रेसनेहि केले नाही आणि इतर कोणत्याही हिंदुत्वाभिमानी किंवा कम्युनिष्ट सोशालिष्टादिकांनी करून  दाखविलेले नाही. आधी स्वार्थाचे वाटोळे करून मिटल्या तोंडी अनाथ अपंगांची निस्सीम सेवा करायची, तर त्यासाठी कसकसल्या अग्निदिव्यांतून जावे लागते, गेलेच पाहिजे, हे मिशनरी संप्रदायावरूनच शिकता येण्यासारखे आहे.

ज्योतिबा फुल्यांचा सत्यशोधक समाज याच मिशनरी स्पिरिटने निघाला होता. दलितोद्धार हे एकच ध्येय त्यांनी सतत डोळ्यापुढे ठेवले होते. त्यांनी सरकारी सत्तेचा मोह धरला नाही. अधिका-यांच्या कृपा अवकृपेची क्षिति बाळगली नाही. पांढरपेशा समाजाच्या सहानुभूतीची भीक मागितली नाही हे माझे ध्येय, माझे कार्य मी हे अस्से करणार, अस्पृश्याना स्वतःच्या घरांत आणून पोटच्या पोरांसमान पंक्तीला घेऊन जेवणार, हिंदू समाजाने निर्दयपणाने घराबाहेर हाकलेल्या विधवांची माझ्या आश्रमाच्या झोपडीत सोय करून त्यांच्या अब्रूवर

माझ्या सत्यधर्माचे पांघरुण

राखणार, तमाम शेतकरी कामकरी जनतेला श्रीगणेशा शिकवून साक्षर करणार, पांढरपेशा शहाण्या समाजांतल्या निरक्षर आया बहिणी मुलींनाहि लिहा वाचायला शिकवणार, पांढरपेशे खोटे, त्यांचा पांढरपेशी धर्म खोटा, सगळ्यांना मी माझा नवा सत्यधर्म आग्रहाने शिकवणार, माणसांना माणसांशी माणसासारखे कसे वागावे हे मी स्वतःच्या आचरणाने पटवून देणार, ज्यांना हे पटत असेल त्यानी यावे माझ्या सत्यधर्माच्या संप्रदायात, पटत नसेल त्यानी बाजूला व्हावे, अगर विरोध करावा, त्याला तोंड द्यायला मी खंबीर उभा आहे. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या सत्यशोधक संप्रदायाचे मिशनरी स्पिरिट हे असे होते. आत्ता शंभर वर्षांनी ते कोठे आम्हाला पटू लागले आहे. म्हणून यंदाचा त्यांच्या स्मृतिदिनाच्या उत्सवांत सर्व पंथ पक्षियानी

मुक्तकंठानी फुल्यांचे गुणगांन

करून, आपापल्या वाडवडिलांच्या फुलेद्रोहाचे जाहीर प्रायश्चित्त घेण्याचा शहाणपणा दाखविला.

हिंदुस्थानांत दलितोद्धाराच्या कार्याचे हिमालय पडले आहेत. पण त्याना चालू काँग्रेजी राजकारणाने कीड घातली आहे. समाजसंघटनेऐवजी जागोजाग विघटनेचे विकल्पांचे नि विध्वंसाचे ज्वालामुखी खडपे धुमसताहेत. काँग्रेससकट सगळे पंथ, नि संप्रदाय राजकीय सत्तालोभाने आंतून करपलेले आहेत. दलितोद्धाराच्या प्रत्यक्ष कार्यात आंग खरचटून घ्यायला कोणीहि तयार नाही. सरकारात मानाची खुर्ची मिळवण्याची प्रत्येक पुढा-याची धडपड आम्हाला निवडून द्या आम्ही सरकार बसवले का

हां हां म्हणता तुमचा उद्धार !

काँग्रेसने काढलेले सर्वोदय पंथाचे नवीन फिसाट याच धोरणाने काम करीत आहे. काँग्रेजी प्रचाराचे ते एक यंत्र आहे. दलितोद्धार केवळ राज्यसत्ता काबीज करण्यावरच खोळंबून राहिला आहे, हेच नि एवढेच रडगाणे प्रत्येक पंक्ष लोकांच्या कानी कपाळी बोंबलून सांगत असतो. निस्वार्थ जनसेवेचे मिशनरी स्पिरिट कोणत्याहि पक्षात अजून शिरलेले नाही.

दलितोद्धाराच्या कार्यात राजकारणी महत्वाकांक्षा फुरफुरू लागली म्हणजे राजकारणा बरोबरच दलितोद्धाराचीहि वाट कशी लागते हे पंचवीस वर्षांपूर्वीच्या सत्यशोधकी बाणणेतरी चळवळीच्या अधःपाताने ठसठशीत शिकवले असूनहि आजहि कोणाचे डोळे उघडत नाहीत. त्या चळवळीची कहाणी थोडक्यात सांगायची तर डोंगरदरीच्या पाचोळ्याने एकदम जसा पेट घेतला तसा तो एकदम विझाला. कपाळी लावायला राखसुद्धा उरली नाही. शिलकी कार्यकर्त्यांच्या पोरसवदा बजबजपुरीच्या वावटळीने तीहि हवेत उडाली. या बजबजपुरीचा धोरणी नि सत्तालोभी काँग्रेसने भरपूर फायदा घेतला. आत्मप्रतिष्ठेसाठी धाबावलेल्या