पंडिता रमाबाई सरस्वती : Page 31 of 31

रसायन आहे की ते सगळ्यांनाच सारखे एकजिनशी, एकरकमी मानवणारे किंवा पचनी पडणारे नाही. जो तो आपल्या मगदुराप्रमाणे त्याची निवड करतो आणि समाधान मानतो. त्याची इतरांनी चर्चा, चिकित्सा करण्यात स्वारस्य नाही. श्रद्धेच्या हट्टवादानेच सुखापेक्षा दुःखाची आणि समाधानापेक्षा असंतोषाची पेरणी मानव समाजात आजवर फार झालेली आहे.

 आजचे केडगावचे मुक्ती सदन

 रमाबाईंच्या अवसानानंतरही केडगावचे मुक्ती सदन संस्था आजही त्यांनी आकलेल्या नीतिनियमांप्रमाणे कदरबाज नि शिस्तवार चाललेली आहे. निरनिराळे उद्योग करून सुखासमाधानाने येथे राहत असलेल्या सात-आठशे बाया-मुलींच्या पूर्व नि उत्तर जीवनाचा विचार केला म्हणजे हा आश्रम नसता तर या आंधळ्या-पांगळ्या हतबल नि वेडसर जीवांना गावोगाव भीक मागण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता. येथे नाना कला, विद्या शिकून गावोगाव-शहरोशहरी तज्ञ म्हऊन अनेक सार्वजनिक कार्य करीत असणाऱ्या कोणत्याही तरुणींच्याही आयुष्याचे मातेरे झाले असते.  इंग्रजी काय किंवा काँग्रेजी काय, कोणत्याही सरकारला अनाथ, अपंगांचा नि निर्वासितांचा प्रश्न नीटसा सोडवता आलेला नाही. हिंदू समाजाने तर असल्या अभागिनींची कीव चुकूनही कधी केलेली नाही. कोणी करत असला तर त्याची अवहेलना मात्र रग्गड केलेली आहे. या सिद्ध सत्याच्या पायावर पंडिता रमाबाईंच्या मुक्ती सदनाची कामगिरी ठेवून पाहिल्यावरच या संस्थेचे वाजवी मोल, महत्त्व नि माहात्म्य पटणारे आहे.

 मुक्ती सदनात सध्या २०-२५ देशी परदेशी, अविवाहित भगिनी निरनिराळ्या विभागात कामे करीत असतात. कॅनडा, अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील आलेल्या कुमारिकांची सेवानिष्ठा वाखाणण्यासारखी आहे. येथे एक दवाखाना, एक शस्त्रक्रियागृह, प्रसूतिगृह असून त्यांचा फायदा आजूबाजूची सगळी खेडी नि गावे मोफत घेत असतात. नवनवीन विभाग सारखे निघताहेत नि त्यांच्या प्रशस्त इमारतींची कामे अखंड चालली आहेत.

 झाले ! येथे चरित्र संपले

 चार दिसांच्या लहान मुलापासून तो वृद्धावस्थेने जर्जर झालेल्या बायांपर्यंत सर्वांचा येथे पुरस्कार होत असतो. सर्वांना एकवार भेट देण्यासारखी ही संस्था आहे.

 ही खिरापत घ्या

 

पंडिता रमाबाईंच्या क्रांतिकारक तुफानी कर्तबगारीच्या चरित्राने फार वर्षांपूर्वी माझ्या मनाला जो आकर्षणाचा चटका बसला, तो मऱ्हाठबंधू भगिनींपुढे ९ प्रकरणांच्या शब्दांनी ठेवला आहे.

 उपेक्षितांच्या देवडीवरचा भालदार

 नात्याने हे एका थोर लोकोत्तर मऱ्हाठी वीरांगनेचे विस्मृत चरित्र प्रकाशात आणून ठेवीत आहे. त्याच्या वाचनाने अनेक भगिनींना उत्कट दिव्य-भव्य अशा नवनवीन कार्यक्षेत्रात हिरिरीने पाऊल टाकण्याचे चैतन्य मिळावे, त्यांनी यापुढे सालोसाल पंडिता रमाबाईंचा स्मृतीदिन साजरा करून, तिला आदराने प्रणाम करावे, एवढीच माझी आशा आहे.

 -    जय महाराष्ट्र -