पंडिता रमाबाई सरस्वती : Page 3 of 31

पूज्यते

महापंडीत म्हणून अनंतशास्त्रांचा नांवलैकीक पूर्वीच सगळीकडे फैलावला असल्यामुळे त्यांच्या शास्त्रशिणाची दीक्षा घेण्यासाठी आतुरलेल्या शेकडो तरूणांच्या पालकांनी त्यांचा शोध चालवला.  शास्त्रीबोवा गंगाराम अरण्यात आश्रम बांधून आहेत, असे कळताच शेकडो शिष्य रस्ता काढीत काढीत तेथे जमा झाले. हळूहळू त्या ठिकाणाला प्राचीन यज्ञवल्क्यादि ऋषींच्या आश्रमाचे मनोहर रूप प्राप्त झाले. शिष्यांनीही आपल्या झोपड्या उभ्या केल्या. आजूबाजूला फळाफुलांचे सुंदर बगिचे निर्माण झाले. धान्याची शेते डुलू लागली. रात्रंदिवस उद्योगाच्या जोडीने संस्कृत शास्त्राच्या पारायणाचे घोषध्वनी अखंड चालले आहेत. कोणी फळाफुलांची तर कोणी शेतीवाडीची मशागत करताहेत. आहारासाठी धान्य फळांची जमवाजमव नि टिपण निवड करताहेत. जी जागा पर्वी निर्जन होती, तीच आता आश्रमीय वैभवाने गजबजून राहिली. सातआठ माणसांचे कुटुंब, पाच पन्नास विद्यार्थी, शे दोनशे गुरेढोरे इतक्यांचा चरितार्थ चालेल एवढे कृषिक्षेत्र नि ज्ञानक्षेत्र सिद्ध झाले. लक्ष्मीबाईंनी संस्कृताचे अध्ययन पुष्कळच वाढवले असल्यामुळे, शास्त्रीबोवा परगावी जात तेव्हा त्याच विद्यार्थांना पुढचे पाठ देत असत.

गंगामूल आश्रमात शास्त्रीबोवा १३ वर्षे राहीले. त्यांना एकंदर सहा मुले झाली. पैकी कृष्णाबाई, श्रीनिवास आणि रमाबाई ही तीनच मुले जगली.

रमाबाईंच्या एक चरित्रलेखिका मिसेस पाँल अप्पासामी म्हणतात

जी लक्ष्मीबाई प्रथम येथे आली तेव्हा भितरी नि बुजट मुलगी होती. आणि अरण्यातील हिंस्र पशूंच्या आरोळ्या कानी पडू नयेत म्हणून डोक्यावरून पदर गुंडाळून घेत असे, तिनेच आता खरे चित्पावनी पाणी प्रगट करून आपला वाढता संसार आणि शिष्यांचा नि यात्रेकरूंचा परिवार यांचा गाडा कर्त्या सवरत्या गृहिणीप्रमाणे हाकिला. मुलेबाळे झाल्यावर त्यांना पवित्र संस्कृत भाषा शिकवण्याचे कार्य त्यांनी पार पाडले. मोठमोठ्या संस्था चालविण्याची पात्रता आणि कर्तबगारी जा पुढे रमाबाईंनी मोठ्या प्रमाणात लोकांच्या निदर्शनाला आणली, तिचे बिज गंगामूल अरण्यातल्या त्यांच्या मातोश्रीच्या या आश्रमीय धडाडीनेच त्यांच्यात पेरले गेले ”.

चारशे पंडितांना वादात चीत केले

महाविद्वान नि साधू असा अनंतशास्त्र्यांचा लौकीक आसेतू दक्षिण प्रांतात फैलावला. अनेक जुन्या सामाजिक रूढी, रीतीभाती, धर्मकल्पना यावर अनंतशास्त्रींनी हिरहिरीने हल्ला चढवीला. स्त्रियांना शिक्षण देण्यात तर त्यांनी प्रत्यक्ष आचरणाने कमालीचा पुढाकार घेतला होता. मुलींचे विवाह अल्पवयात मुळीच न करता, त्या शिकून सवरून चांगल्या प्रौढ झाल्यावर त्यांनी स्वता :च्या पसंतीने वरशोधन करावे इत्यादि मतामुळे, त्यांच्या पांडित्याच्या लौकिकाबरोबरच ठिकठिकाणच्या शास्त्रीमंडळींमद्धे मोठा गवगवा चालू झाला. शास्त्रीबोवांची असली सुधारकी मते त्यांचे विद्यार्थी पचनी पाडणार आणि ती ते सगळीकडे फैलावणार ! जुन्या मतांच्या लोकांना हा मोठा धोका वाटत होता.

अखेर शास्त्रीमंडळींनी शंकराचार्यांपुढे अनंतशास्त्र्यांविरूद्ध फिर्याद मांडली. शहरोशहरीचे चारशे पट्टीचे पंडित एका बाजुला आणि समोर एकटे अनंतशास्त्री त्यांना जाब द्यायला, असा मुकाबला उभा राहिला. जाब जबाबांचा लेखी वाद दोन महिन्यांपर्यंत दररोज अखंड चालू होता. अनंतशास्त्र्यांनी वेद उपनिषदे पुराणे स्मृत्यादि ग्रंथातून हजारो दाखले सभेपुढे मांडून आपल्या पुरोगामी मतांचे समर्थन केले आणि शंकराचार्यांसकट सर्व शास्त्रीमंडळाला त्यांचे आरोप मागे घ्यायला लावले. या शास्त्रनिर्णयावर त्यांनी अक ग्रंथहि लिहिला होता. शास्त्राच्या आधाराने अनंतशास्त्री या वादात जरी विजयी झाले, तरी त्यांच्या पुरोगामी विचार-उच्चार आचारांकडे पाहण्याची शास्त्रीलोकांची कोती नजर निवळली नाही ती नाहीच. त्यांनी अनंतशास्त्र्यांना बहिष्कृतासारखेच वागविले.

वाढत्या संसाराच्या वाढत्या भानगडी

आश्रमाचा पसारा सारखा वाढत गेला. स्वताचा संसार, शिष्य मंडळी यांचे पालन पोषण शिक्षण चालू असतानाच, काशि ते रामेश्वर भटकंति करणा-या यात्रेकरूंच्या टोळ्याहि आश्रमाच्या बि-हाडी आस-याला येउ जाऊ लागल्या. अनंतशास्त्री दिलाचे दिलदार. तशीच लक्ष्मीबाईहि. दोघेहि हाताची सरळ आणि सढळ. आल्या गेल्याचे कोठे काही उणे पडू द्यायचे नाही स्वता अर्धपोटी राहून पहिपाहुण्यांची सरबरायी राखायची. आपला हात नि जगन्नाथ ! हवे त्यांनी हवे ते मागावे आणि या नवरा बायकोने ते मुकाट्याने द्यावे.

मुलगी कृष्णाबाई १० वर्षाची झाली. तिचे लग्न करून टाका. घोडनवरी किती वाढणार ? असा नातेवाइकांचा, आश्रित