पंडिता रमाबाई सरस्वती : Page 11 of 31

ब्राह्मण खुशाल गोऱ्या इंग्रजांच्या हातचे अन्न खातात, स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाकडे आम्ही नवलाईने पाहू लागलो. पण ते सारे काय करतात हे काहीच उमगे ना. थोड्या वेळाने एका इसमाने एक पुस्तक उघडले, काही वाचले आणि एकदम सगळ्या स्त्री-पुरुषांनी भडाभड आपल्या खुर्च्या पुढे ढोपरे टेकून, डोळे मिटून, तोंडाने काही पुटपुटायला सुरुवात केली. ईश्वराची प्रार्थना करतायत ते असे आम्हाला कोणीसे सांगितले. ईश्वराची प्रार्थना ? त्यांच्या पुढे आम्हाला एकाही देवाची मूर्ती दिसे ना ! जणू काय ते आपापल्या पुढच्या खुर्च्यांचीच आराधना करीत आहेतसे आम्हाला दिसले. ख्रिस्ती अशी प्रार्थनेचा हा विचित्र प्रकार आम्हाला चमत्कारीच वाटला. मला आता नाव आठवत नाही, पण तेथल्या ऐका पोक्त गृहस्थाने संस्कृत बायबलाची सुंदर सोनेरी आकर्षक कव्हराची एक प्रत भेट दिली.

अंधारातले धुत्कार

रमाबाईंचा सर्वत्र असा सन्मान चालू असतानाच, पोथीनिष्ठ जुन्या मतांच्या लोकांना, ही एवढी बावीस वर्षांची ब्राह्मण तरुणी असून अविवाहित का राहिली ?’ याचे मोठे कोडे पडले. त्यांनी भलभलत्या कुटाळक्या फैलावल्या. पण एकदा का रमाबाई सभास्थानी आल्या, आपल्या धीट चमकदार नेत्रांनी श्रोत्यांची पाहणी करू लागल्या आणि त्यांची मुद्देसुद काव्यप्रचुर संस्कृत प्रवचनाची गंगा धो धो गर्जत वाहू लागली म्हणजे सगळ्या निदकांच्या जिभल्या गारठून पडत असत.

 रमाबाईंची कीर्ति पाहून, ऐकून बंगाल संयुक्त प्रांतात राहणाऱ्या काही दक्षिणी ब्राह्मण तरुणांनी त्यांना विवाहाच्या मागण्या घातल्या होत्या. पण जोवर माझा भाऊ श्रीनिवास माझ्या पाठिशी उभा आहे, तोवर मला विवाह करायचा नाही. भारतीय अबलांचा शिक्षणोद्धार आणि त्यांचे जीवन सुखी नि स्वावलंबी करण्यातच आयुष्य वेचावे, असा माझा निर्धार आहे, असा जबाब त्या देत असत.

 विवाहाच्या प्रश्नाबाबत पंडिता रमाबाई आपल्या आत्मवृत्तात लिहितात - माझ्या वडलांच्या मनातून मला उत्कृष्ट प्रकारचे धर्मशिक्षण द्यावयाचे होते म्हणून त्यांनी माझे लग्न केले नाही. या रूढीविरुद्ध त्यांच्या अट्टहासाबद्दल बाबांना घरचा नि दारचा पुष्कळ छळ सोसावा लागला. ब्राह्मणांनी तर त्यांना वाळीत टाकल्यासारखेच वागवले. पण बाबा मुळीच कचरले नाहीत. त्यांनी आपला हेतू पूर्ण तडीला नेला. विद्यार्जन करून धार्मिक वृत्तीने आयुष्य घालवण्याची त्यांनी मला दीक्षा दिली. म्हणूनच मी बावीस वर्षांची होईतोवर अविवाहित राहिले. या पूर्वी उत्तर हिंदुस्थान, मध्यप्रांत आणि बंगाल येथल्या पुष्कळ सुखवस्तू दक्षिणी ब्राह्मणांनी अनेकदा लग्नाची गोष्ट काढली, पण भावाचा मला आधार असल्यामुळे मी त्या मागण्या नाकारल्या.

 महाराष्ट्राचे रमाबाईंना आमंत्रण

 बंगाल, आसाम, बिहारकडे रमाबाईंचा होत असलेला जाहीर सन्मान नि सत्कार ऐकून, मुंबई पुण्याकडच्या पुरोगामी सुधारकांनी महाराष्ट्रात येण्याबद्दल तिला पत्रे पाठविली. काहीजण तिला प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देऊन गेले. एवढी लोकोत्तर पंडिताबाई तिकडे आली तर महाराष्ट्रात महिलाद्धोराच्या चळवळीचा खूप उठाव करता येईल अशी त्या सुधारकांची रास्त महत्त्वाकांक्षा होती. जुन्या मतांच्या लोकांनीही पंडितेच्या परप्रांतीय मानमान्यतेचे एक आकर्षण वाटतच होते. रमाबाईंना मात्र महाराष्ट्राविषयी तितकेसे आकर्षण वाटत नव्हते. जन्मापासून त्या मायभूमीने रमाबाईंविषयी किंवा तिच्या मातापित्यांविषयी काय अशी माणुसकीची आपुलकी दाखवली ?

 ब्राह्मण कन्येचा शुद्राशी विवाह ?

 अखेर विवाह संस्कार झाला

 रमाबाईंचा लौकीक बंगालबाहेर आसाम, बिहारकडे फैलावला आणि तिकडून त्यांना निमंत्रणे आली. स्नेहमंडळींचा परीघ वाढला. आसाम प्रांतातील सिलचर येथील बाबू बिपीनबिहारी दास मेधावी एम. ए. बी. एल. या तरुण हायकोर्ट वकीलाशी श्रीनिवासच्या मध्यस्थीने रमाबाईंचा परिचय झाला. बिपिनबाबू ब्राह्मणेत्तर होते. बंगाल, आसामकडे धर्मशास्त्री दोनच जाती मानतात. एक ब्राह्मण जात आणि बाकीचे सारे शूद्र. तेव्हा ब्राह्मणेत्तर म्हणजे शूद्र. हा जातीभेदाचा दंडक आजही तिकडे मानण्यात येतो. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातही हा प्रकार आजही आढळतो.

 या परिचयाच्या सुमारासच भाऊ श्रीनिवास ऐकाकी मरण पावला. या जगातल्या रमाबाईंचा अखेरचा आधार नष्ट झाला. परक्या मुलखात त्या पोरक्या पडल्या. शेवटी