सत्यशोधक भाऊराव पाटील: Page 10 of 16

दाबल्याप्रमाणे दिवे लागतात काय ! राजकन्येचे लक्ष त्या दीपोत्सवाकडे वेधते काय आणि विक्रमाचा भाग्योदय होतो काय ! साराच चमत्कार . ज्य कोल्हापुरात सिएडी एक वेळ अण्णासाहेब लठ्ठ्यांवर कडव्या कदरीची टेहळ ठेऊन बसले होते. त्याच कोल्हापुरात तेच लठ्ठे त्याच सिएडी ऑफीसरावर दिवाणगिरीच्या करड्या हुकमतीने कोरडे ओढीत असताना त्या पालखीच्या बैलांना काय बरे वाटत असेल ? भाग्योदय व्हावा तर तो असा ! क्षात्रजगदुगुरूनी राजाराम महाराज छत्रपतींना वेदोक्त राज्याभिषेक केला. तो विधी संपताक्षणीत अण्णासाहेब लठ्ठ्यांनी पुन्हा उभे राहून आणखी एक कसलासा अभिषेक केला. ही बातमी वृत्तपत्रांत वाचताक्षणीच आम्ही तर्क केला की भिंतीच्या निर्जीव हंसाने गिळलेला हार तो आज सावकाश उगाळीत आहे खास.  

पुढे थोड्याच अवधीत दिवाणगिरीची विचारणा ! अण्णासाहेबांचे चरित्र अशा प्रकारच्या नानाविध कुतूहलांनी रंगलेले पाहून विधिघटनेचे मोठे कौतुक वाटते. शाहू महाराजांनी भाऊरावांचा एवढा छळ केला की त्यातून पुनर्जन्म होणे हा केवळ दैवयोग मानला पाहिजे. इतके असूनसुद्धा भाऊरावाची शाहू महाराजांवरील भक्ती तिळमात्र कमी झालेली नाही. ब्रा म्हणेतर चळवळ सुरू झाल्यानंतर महाराज भाऊरावला अनेक वेळा भेटले. मसलती केल्या, पण सगळ्या ब्रिटीश हद्दीत भाऊरावांनी कोल्हापुरात पाऊल ठेवले नाही. मृत्यूपूर्वी काही दिवस, मिरज स्टेशनवर, सातारा जिल्ह्यातल्या मागसलेल्या वर्गात दुय्यम शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फंड जमविण्याची एक योजना दोघांनी ठरविली होती ती अशी. महाराजांच्या पदरी पुष्कळ मल्ल आहेत. ते नुसते पोळासारखे बसून असतात. महाराजांनी चार पाच जोड्यांचा खर्च चालवून त्या एका कमिटीच्या स्वाधीन कराव्या. लोकांना कुस्त्याची आवड फार. गावोगाव तिकिटे लावून मल्लांच्य कुस्त्या लढवायच्या आणि ते उत्पन्न शिक्षणप्रसारार्थ लावायचे तात्पर्य, कोणी कितीही छळ केला, निंदा केली, घातपात केले तरी भाऊराव म्हणतात, माझे ध्येयच इतके उच्च आहे की त्यापुढे या लौकिकी गोष्टी विचारात घ्यायला माझी लहरच लागत नाही. शाहू महाराज व दुसरे दीनोद्धारक राजर्षि. मी दुस-या दृष्टीचा उपसाक आहे. पहिल्याबद्दल मी कधी विचारच करीत नाही.

भाऊरावच्या चरित्रावर बंदी :

प्रबोधन मासिकाच्या १९२६ अंक ४ थामधून संपादकीय खुलासा

 सध्या पत्रकारांचा व्यवसाय मोठ्या जोखमीचा झाला. वेळी वाटल्यावर किंवा तलवारीवरही हवी तशी कसरत करता येईल. पण कायदेबाजीचे चाप चुकवून एखादे नियतकालिक चालवणे अशक्य होत चालले आहे. कायद्याचे हात जसे लांबलचक आहेत. तसा त्याचा देहसुद्धा हवा तेवढा लांब रूंद ताणता येतो किंवा तिळाएवढा संकुचित करता येतो. पानी तेरा रंग कैसा ? जिसमे मिलावे उस जैसा कायद्याची स्थिती जवळजवळ अशीच आहे. त्याची व्याप्ती हवी तेवढी ताणता येते. आणि त्यावर हवा तो रंग बेमालूम चढवता योते. वृत्तपत्राच्य बाबतीत तर कायद्याची दृष्टी इतकी चमत्कारिक रंगेल आहे की, त्याने एखाद्या मजकुरावर अमुक एका रंगाची नजर टाकण्याची खोटी का त्याचा रंग तसा पालटलाच पाहिजे. एखाद्या प्रेमाच्या मजकुराच्या लालभडक रंगावर कायद्याने मत्सराची हिरवी नजर फेकली की पुरे, तांबडा रंगसुद्धा पटकन हिरवा पडतो. दुर्बीण लावा किंवा सूक्ष्मदर्शक यंत्र लावा, मग हिरव्या रंगाशिवाय दुसरा कोणताच रंग पाहणाराला दिसायचा नाही. इतर रोगांच्या साथीप्रमाणे कायद्याच्या दृष्टीच्याही निरनिराळ्या साथी वृत्तपत्रांच्या क्षेत्रात येण्याचे हंगाम गेल्या ३०-३५ वर्षांत लोकांच्या आठवणीत असतील राजद्रोहाची दृष्टी विकसित झाली की जिकडे पहाल तिकडे राजद्रोहच ! जातीजातीतील वैमनस्याची नजर खुलली की सर्वत्र १५३-अ चा दराबेस्त थामान ! अब्रूबाजीच्या रंगाची लाट आली की सारी कोर्टे बेअब्रूच्या टल्यांनी गजबजून जायची !

ब्राम्हण-ब्राम्हणेतर वाद उतास जाऊ लागला की मग काय ? एखाद्या –हस्व दीर्घ वेलांटीतून सुद्धा त्राहि माम् त्राहि माम् किंकाळ्या मारीत एखादा गणित्या भटजी गव्हर्नर साहेबांच्या बुटापर्यंत लोळत जायचा ! अशा या नाना प्रकराच्या साथीत पत्रकारांच्या लेखणीतून उतरणा-या