सत्यशोधक भाऊराव पाटील: Page 9 of 16

मला या पाटील मास्तरांच्या विरुद्ध साक्ष द्यायला सांगता काय ? माझी मान तोडलीत तरी हा गणप्या मांग ही कसाबाची करणी करणार नाही. अरे, ज्याने माझ्या मांगाच्या पोराला विद्या शिकवून माणुसकी दिली, त्याची मान मी कापू ? जातीने मी मांग आहे. मी पाटील मास्तरशी बेमान नाही होणार. जातीवंत मांगसुद्धा जेव्हा पोलिसांपेक्षा माणुसकी दाखवू लागला, तेव्हा त्याला आणला तसा परत रवाना केला. ब्रिटीश गुप्त पोलिसांपाकी रा. मडूरकर नावाचे एक सभ्यवृत्तीचे सब इन्स्पेक्टर होते. त्यांनाही देशमुख फौजदाराप्रमाणे खोट्याची फार चीड असे. ते वरचेवर भाऊरावला जेलमध्ये भेटून धीर देत असत. इतकेच नव्हे तर, असा सप्ष्ट इशारा देत की कोणी वाटेल ते केले तरी खोटे कधी सांगू नकोस.

इकडे भाऊरावचे अपील दाखल झाले. घडलेल्या सर्व प्रकाराचाही गवगवा झाला. सातारचे कलेक्टर मि, ब्रांडन साहेब या प्रकरणाकडे सहानुभूतीन पाहू लागल . पोलिटिकल एजंटकडे त्याची तक्रार गेली. त्यांनीही खास चौकशी केली. तेव्हा होत असलेला साराच प्रकार शून्यातून ब्र म्हांड निर्माण करणारा आहे, असे त्यांना प्रत्यंतर पटले. कैदी भाऊरावची त्यांन पल्या बंगल्यावर कांती भेट घेऊन सर्व खुलासा काढला. त्याचा परिणाम अपीलावर होऊन भाऊराव माफीत सुटले. पण सुटेपर्यंत दीड महिन्यांची शिक्षा मात्र भोगली. या अपिलात सुटताच, कोल्हापूरच्या पोलीस कमिशनरने नवा तोंडी हुकूम काढला की, डांबर प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत भाऊरावने कच्च्या कैदेत राहिले पाहिजे.

हा हुकूम देऊन त्याला जेलकडे घेऊन जात असताना रेल्वेच्या कंपौडात त्याने उडी घेतली.  ‘मी ब्रिटीश हद्दीत उभा आहे. खबरदार माझ्या अंगाला हात लावाल तर. इतक्यात रेल्वेचा पोलीसही तेथे आला. त्याला भाऊराव म्हणाले,  ‘तुला वाटेलतर मला पकड. मी रेल्वेच्या किंवा ब्रिटीश पोलिसांच्या ताब्यात जायला खुशी आहे. माझ्यावर काही आरोप असेल तर ब्रिटीश कोर्टात होईल त्याचा निकाल. कोल्हापुरी पोलीस हात चोळीत गेले. रेल्वे पोलिसाने विचारपूस करून भाऊरावला सोडून दिले. पुढे लागलीच वडिलांनी कोल्हापुरी कायद्याची भूक शमविण्यासाठी जामीन दिला व येथेच हे प्रकरण विझले. या बाबतीत भाऊरावने मुंबई गव्हर्नरला एक मोठा विस्तृत तपशिलाचा अर्जही पाठविला होता. त्याची नक्कल अस्तित्वात आहे. तब्बल सहा महिने निष्कारण यमयातना भोगल्यामुळे भाऊरावांच्या शरीर प्रकृतीवर एवढा भयंकर परिणाम झाला होता की कोणालाही चटकन ओळख पटली नाही. पुनर्जन्मच तो !

भाऊरावांवर निष्कारण आलेल्या या भयंकर गंडांतराच्या घटनेवरून वचकांना पुष्कळ निर्णय काढता येतील. भाऊरावांच्या शिलातील कमावणी किती खडतर तपश्चर्येची आहे आणि आज त्यांनी जी त्यागी कंटक वृत्ती बनलेली आहे. त्यात जगातल्या कटू अनुभवाचा मसाला किती पडलेला आहे. याचा पुष्कळ उलगडा होतो. या कहाणीत रौद्र, बीभत्स, करुण आणि वत्सल रस अपरंपार भरलेले आहेत. जीव गेला तरी खोटे कर्म करणार नाही, या वृत्तीने भाऊरावाने हे एवढे भयंकर क्लेश ज्या अण्णासाहेब लठ्ठ्यांसाठी भोगले त्यांना प्रत्यक्ष त्रास किती झाला आणि डांबर –प्रकरणात त्यांना हकनाक लटकविण्यात शाहू महाराजांचा डाव कोणता होता, इत्यादी माहिती लठ्ठेच सांगतील तेव्हा जगाला कळेल. त्यांनी शाहू महाराजांचे चरित्र उत्तम तपशिलांनी कितीही रंगविले असले तरी शाहू महाराजांच्या राजधानीने खुद्द अण्णासाहेबांचे चरित्र मात्र फार बहारीच्या कुतूहलाने रंगविलेले आहे. यात मुळीच शंका नाही.

एके काळी ज्यांना राजद्रोहाचा शिक्का ठोकून रसातळाला नेण्यासाठी ज्या रियासतीच्या राजकारणाने आपले जंगजंग पछाडले व एकदा प्रत्यक्ष अटकही  केली होती, त्याच रियासतीच्या कर्तुमकर्तुमन्याथशकर्तुम दिवाणगिरीवर त्यांची अचानक नेमणूक झालेली पाहून, करणीच्या काळापेक्षा काळाचीच करणी अगाध खरी, असा कोणाच्याही तोंडून उद्गार निघेल. या डांबर प्रकरणात  ‘भिंतीचा निर्जीव हंस, त्याने गिळिले हारास हा चमत्कार स्पष्टच होता, पण पुढे पहावे तो हातपाय तोडलेला विक्रम तेल्याचा घाणा हाकतो काय, दीपराग आळवताच इलेक्ट्रिसिटीचे बटन