सत्यशोधक भाऊराव पाटील: Page 8 of 16

होती आणि त्यांच्या टेबलातून काही राजद्रोही वाङ्मय ही कोल्हापुरी चित्रगुप्तांनी पैदा करून त्यांचे पुराव्याच्या बरणीत लोणचे घालून ठेवले होते. कावळ्याच्या बंगल्यातून पुराव्याची प्रसूती होताच लठ्ठ्यांना कड्याबेड्या ठोकण्याची जय्यत तयारी होती, पण पुरावाच तयार होईना. कित्येक लाळघोट्या प्रतिष्ठित
अधिका-यांनी जेलमध्ये जाऊन भाऊरावला
सरकार म्हणतात तसे म्हणावे.  म्हणून आग्रह केला. वकीलपत्रावरही सही कबुलीपत्रावर उमटविण्याचा एक मराठी वकीलानेही कारवाई केली ; पण भाऊरावच्या आईच्या तत्कालिक दक्षतेने ते पत्रक चुलीत गेले. महाराजांनी तिला बोलावून भाऊराव जर योग्य ती जबानी देईल तर तुला पाच हजार रुपये रोख व जमीन देऊ. अशी गळ घातली. भाऊरावचीच आई ती, तिने स्पष्ट करारीने उत्तर दिले, महाराज, मला चार मुलगे आहेत. त्यातला एक मेला म्हणून समजेन. पण मी खोटे काम करणार नाही, आणि भाऊरावही करणार नाही. एक दिवस खास महाराजाकडून समजूत करून पहावी म्हणून पुन्हा भाऊरावला भेटीस नेले. पुष्कळसे व्याख्यान ऐकून घेतल्यावर भाऊरावने एकच उत्तर केले, ‘‘या जगात मला आता जर काही आश्रयाचे व संरक्षणाचे ठिकाण असेल तर ते एकच – मरण. तेवढे आपण द्यावे म्हणजे झाले मला जास्त बोलण्याची इच्छा नाही. ’’

जोपर्यंत भाऊरावावर निश्चित काही आरोप जाहीर करण्यात आलेला नव्हता. पोलिसी तपासाचेच फार्स चालत होते. तोपर्यंत त्यांच्या वडिलांना मित्रांना आणि हितचिंतकांना काहीच प्रयत्न करता येईना. अखेर मुख्य भानगडीचा मुद्दा बाजूस राहून जेव्हा आत्महत्येच्या प्रय त्नाबद्दल शिक्षा झाली, तेव्हा वडिलांनी अपील दाखल करण्याच खटपट सुरू केली. इकडे कोल्हापुरी पोलिसांचे प्रयत्न मात्र बंद पडले नव्हते. त्यांनी ब्रिटीश सरकारकडून दोन पटीत गुप्त पोलिस मदतीला बोलावले होते. त्यापैकी एकाने भाऊरावच्या सातारच्या राहत्या घरात राजद्रोही वाङ्मय पैदा करण्याचा विश्वामित्री घाट घालून, या खटपटीत सातारचे त्यावळचे फौजदार कै. अनंतराव गणेश देशमुख यांच्या सहकार्याची याचना केली. भाऊराव पाटील ही व्यक्ती कोण आहे आणि तिचा समाजिक दर्जा काय आहे, याची कल्पना सातारचे कलेक्टर मि. ब्रांडनपासून तो थेच एखाद्या अस्पृश्याच्या झोपडीपर्यंत सर्वांना स्पष्ट होती, आणि भाऊरावावर उद्भवलेल्या निष्कारण गंडांतराकडे सर्व काळजीपूर्वक नजर ठ वून होते. भाऊरावच्या घरात झ़डतीमध्ये पैदा करण्यासाठी आणलेला कोल्हापुरी कोलदांड्याचा बनावट पुरावा देशमुख फौजदाराने प्रथम हस्तगत करून घेतला आणि त्या गुप्त पोलिसांना दम भरला. या पुराव्याच्या जोरावर मी आता तुम्हाला अटक करून बेड्या ठोकतो, तुम्ही काय समजलात ? हरामखोर, खोटे पुरावे तयार करता ? लाज नाही वाटत तुम्हाला ? आत्ताच्या आत्ता साता-याची हद्द सोडून चालतचे व्हा, नाही तर तुमच्यावर खटला भरल्याशिवाय सोडणार नाही. गुप्त पोलिसांना देशमुखांची पायचाटणी करता करता पुरेवाट झाली व त्यांनी तात्काल तेथून पलायन केले.

हा डाव फसल्यावर दुसरा प्रयत्न झाला. औंध प्रकरणात प्रसिद्धीस आलेला सातारा जिल्ह्यातील गणपती मांग याला भाऊरावविरुद्ध कोल्हापुरी राजद्रोहाची साक्ष देण्यासाठी कोल्हापूरास नेले. त्याला पुष्कळ मथकवले आणि तोही कबूल झाला. भाऊ पाटील म्हणजे कोण प्राणी, ही त्याला प्रथम कल्पनाच येईना. असेल कोणी सोम्या गोम्या माझ्या साक्षीने मेला तर मरेना का. एवढीच त्याची समजूत, प्रत्यक्ष रुजुवात करून जबानी घेण्याची वेळ आली आणि कैदी भाऊरावाला गणप्या मांगापुढे आणून उभे केले मात्र, तो त्याला एकदम विलक्षण गहिवर येऊन त्याने कोण पाटील मास्तर ?’ म्हणून आरोळी ठोकून भाऊरावच्या पायाला घट्ट मिठी मारली. मोठमोठ्याने रडू लागला. काही केल्या पाय सोडीना. भाऊराव पाटील म्हणजे मांगवाड्यात येऊन आपल्या मुलाला श्रीगपासून ते  इंग्रजी ५व्या यत्तेपर्यंत मोफत शिक्षण देणारा दीनांचा पुरस्कर्ता  ‘पाटील मास्तर हे पाहून गणप्या मांग ओक्साबोक्सी रडू लागला. तो कडव्या उच्चारात पोलिसांना म्हणाला,