सत्यशोधक भाऊराव पाटील: Page 6 of 16

जातीतीलही बरेच उपद्व्यापी लोक त्यांच्य पाड वाचा प्रय त्न करीत होते. कित्येक कोल्हापुरी अधिका-यांना व पोलीस खात्यालाही प्रो. लठ्ठे यांनी वेळोवेळी टाइम्स वगैरेच्या कलमातून प्रतोदप्रहार लगावलेले असल्यामुळे. तेही त्यांच्यावर मनातून जळफळत असत. अशा लोकांना ही पुतळ्याचे डांबर म्हणजे प्रो. लठ्ठ्याविरूद्ध चालवायला एक उत्तम शस्त्रच सापडले. हितशत्रुंची अक्कल आणि पोलिसी शक्कल या दोन शक्ती एकत्र एकवटल्यावर काय घटना निर्माण होणार नाही ? निश्चित नप ुंसकावरची जबरी संभोगाचा आरोप सिद्ध होईल, मग सुविद्य सुसंस्कृत आणि विवेकी मनुष्यावर पुतळ्यावर डांबर ओतणे, पोलिसी अफवेच्या हातचा मळ !

प्रो. लठ्ठे या प्रकरणात अडकवायचेच इतके निश्चित ठरल्यावर, मग पुराव्याला काय तोटा ? पुराव्याने आरोपी हुडकण्याऐवजी, आरोपासाठी पुरावा हुडकण्याचे काम फार सोपे असते ; आणि या कामी बलिदानासाठी निश्चित ठरविलेल्या अजापुत्राचे जातभीच जर इतर हितशत्रूंसह अहमहमिकेने पुढे सरसावले, तर चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायला पोलिसांच्या बापाचे काय वेचते ? पुराव्यासाठी प्रो. लठ्ठ्यांच्या विरुद्ध सणा-या निदान आहेत अशा दिसणा-या व्यक्ती शळोधम्याची खटपट सुरू झाली. त्याचा क सूक्ष्म धागा १९०६ सालच्या जैन बोर्डांगातल्या दाढी प्रकरणाला जाऊन लठ्ठ्यांच्याविरूद्ध आहे. या (भ्रामक) भावनेने त्याला पुराव्याचा साक्षीदार म्हणून मथविण्याचा बेत ठरला. दाढीप्रकरणानंतर दुस-याही एका सामाजिक मतभेदाच्या प्रश्नात भाऊरावने अण्णासाहेब लठ्ठ्यांना मतभेदाची जोरकस टक्कर दिलेली होती. परंतु मतभेद म्हणजे हाडवैर अशा समजुतीच्या पिचणा-या कावळ्यांना या दोन विवेकी तरुणांच्या आत्मीय जिव्हाळ्याची काय कल्पना असणार ?

अण्णासाहेबांच्या विरुद्ध जे करस्थानी अ ब क ड मंडळ उभे राहिले, त्यातल्या एका क ने ला कोरेगावास त र पाठविली की जरूरीचे काम आहे, ताबडतोब येऊन भेटा. गरीब व गरजू मुलांना शिक्षणदान करण्यातच आनंदमग्न झालेल्या भाऊरावला या कोल्हापुरी कोलदांड्याची काय कल्पना असणार ? तार मिळताच भाऊराव कोल्हापुरला गेले. दिवस इकडच्या तिकडच्य गप्पात गेला. रात्री जेवण आटोपताच हळूच पोलिसी थाटात विषय निघाला. दीड महिन्यापूर्वी येथल्या एडवर्डच्या पुतकळ्याला डांबर फासण्यास आलेली आहे. पोलिसांनी तपास करून छडा लावला आहे. त्यात अण्णासाहेबा लठ्ठ्यांचा हात आहे, अशी त्यांची खात्री झाली आहे. महाराजांना मला खास सांगितले की या बाबतीत भाऊराव पाटलाने सरकारच्या बाजून साक्ष देऊन ण्णासाहेबांच्याविरुद्ध पुरावा केला पाहिजे. यात तुमचे कल्याण आहे. असे न कराल तर काय प्रसंग ओढवेल याचा नेम नाही. भाऊराव चकित झाले. क्षणभर विचार करताच त्यांना उमगले की आपण का भयंकर जाळ्यात येऊन पडलो आहोत. काय वाटेल ते करून अण्णासाहेबांना चिरडण्याचा हा राजमान्य कट आहे आणि या कामी खाटकाचे काम बळजबरीने आपल्या माथी लादण्याचा हा नातूशाही पेच आहे.

भाऊरावाने दोन्ही कानावर हात ठेवून च्या सूचनेचा शक्य त्या तीव्र शब्दात निषेध केला. त्या गृहस्थाची पुष्कळ निर्भर्त्सना केली. परंतु उपयोग काय ? प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पोलिसी पेच पडल्यावर नेहमीच्या व्यवहारातली निषेधी सभ्यता किंवा माणुसकीचा सात्विक अथवा तामसी त्वेष म्हणजे पालथ्या घड्यावरील पाणी किंवा नपुसकापुढे पद्मिनीचा शृंगारच ठरायचा ! भाऊरावला मथविण्यात कटवाल्याने जान जान पछाडली. महाराजांच्य क्रोधाची धमकी घातली. सर्व काही केले. पण तो काही वठेना. रात्री १२ चा सुमार झाला. ज्या घरच्या माडीवर आणि भाऊराव यांची शाब्दिक झटापट चालली होती. त्याच्या तळमजल्यावर एकाकी आग लागली म्हणण्यापेक्षा लावली म्हणणेच योग्य होऊल. जिकडे तिकडे धावाधाव होऊन आग विझली, त्याच गडबडीत  ‘ने पुकारा केला की,  ‘माझ्या एक हजार रुपयाच्या नोटा चोरीस गेल्या. पोलिसाने तक्रार टिपून घेतली. स्थिरस्थावर झाल्यानंतर भाऊरावला ठासून म्हणाला, आता वळणावर येतोस की हे आगीचे आणि चोरीचे त्रांगडे अडकवू तुझ्या गळ्यात ?’ भाऊरावने