सत्यशोधक भाऊराव पाटील: Page 5 of 16

आजही आपल्या पाटील मास्तर चे उपकार कृतज्ञतापूर्वक स्मरत असतात.

सन १९०९ साली वडिलांची बदली साता-यास झाली. त्यावेळी रूद्राजीराव राजे महाडिक मराठा समाजात जागृतीचे प्रयत्न करीत होते. त्यांच्याशी भाऊरावाने सहकार्य करून व्याख्यानाद्वारे पुष्कळच मदत केली. औद्योगिक व शेतकरी संवर्धक संस्था काढून, त्यांतील फायद्यावर मोफत शिक्षणाचे कार्य करता येईल, ही एक नवीन कल्पना भाऊरावला त्यावेळी आली ; आणि प्रयोगासाठी क प्टन रामचंद्रराव हरजीराव महाडिक, रा. सा. तात्या रावजी पाटील, पिलाजीराव शिर्के, रामभाऊ चिटणीस व बाबासाहेब चित्रे वकील, यशवंतराव प्रतापराव गुजर, दुधुस्कर मामलेदार इत्यादी मंडळीच्या सा हाय्याने

कृषिकर्म सुधारणा मंडळ

नावाची एक संस्था रजिस्टर करून घेतली. मि. ब्रॅन्डन कलेक्टरने मंडळाच्या डेप्युटेशनला सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले. कोरेगावचे भाऊसाहेब बर्गे यांनी पल्या मालकीची २०-२५ एकर जमी लांब मुदतीने व कमी दराने मंडळाला दिली. डॉ. मॅन साहेबाने पाणी व मातीचे अनालिसिस केले. अग्रिकल्चरल खात्याचे इंजिनिअर परांजपे व शूट साहेब यांनी लिफ्ट इरिगेशनचा सल्ला दिला. शेअरच्या विक्रीसाठी भाऊरावने पंजाबात कोहटपर्यंत प्रवास केला. पण इतक्यात भाऊरावावरच कोल्हापुरी राजकारण प्राणघातक गंडांतर आल्यामुळे या मंडळाला राम म्हणावा लागला.

कोल्हापुरी राजकारणी गंडांतर

अर्धवट आणि किंचित अस्पष्टच का होईना, पण १९१४ साली कोल्हापुरात एडवर्ड बादशहाच्या पुतळ्याला डांबर फासल्याचे जे एक भयंकर प्रकरण उपस्थित झाले होते त्याचा एक महत्त्वाचा भाग आजच प्रशमतः प्रबोधनात मुद्रणसंस्कार होऊन जगापुढे येत आहे. बोलून चालून ते राजकारण ! तेव्हा त्याच पापुद्रेही फार हलक्या हाताने सोलण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी घडलेल्या किंवा मुद्दाम घडविलेल्या अत्याचाराची मढी उकरण्यात अनर्थ नसला तरी अर्थ आहे. अनर्थ झाला तरी त्याची आम्हाला पर्वा नाही. खबरदारी एवढीच घेतली आहे की या अत्याचाराचे वणवे पेटविणा-या कित्येक जिवंत नरपशूंचा नामनिर्देश अज्जिबात गाळून त्यातल्या अत्याचाराच्या अध्यायात पूर्ण स्वाहाकर केलेला आहे.

कदाचित; त्यात त्यांचा स्वतःचा दुर्दैवी संबंध जोडण्याच्या कोल्हापुरी पोलिसांनी केलेल्या भानगडी या शूद्र राजमान्य  ‘पोलीसी पॉलिसी असल्यामुळे त्यांचे महत्त्व प्रो. लठ्ठे यांनी भावी दिवाणपदप्राप्तीच्या मुत्सद्देगिरीने डावलण्याची चलाखी दाखविली असावी, असे  आम्हाला वाटते. १९०७ सालच्य टिळकपंथी माथेफिरूंची अत्याचारी कारस्थाने कोल्हापुरात सुरू झाली. त्यामुळे संस्थानानेही यांना पायबंद घालण्यासाठी आपल्या उघड गुप्त पोलीस यमदुताच्या सेनेला सर्वाधिकारांची शस्त्रसामुग्री भरपूर दिली तेव्हा पासून कोल्हापुरी पोलीस म्हणजे प्रतिसृष्टीकर्त्या विश्वमित्राचे बाप आणि यमधर्माचे शिरजोर सावत्र भाऊच बनले होते. राज्यकर्त्यांचे कानच या महात्म्या च्य हाती पडल्यावर वाटेल त्या सावाचोरीची मान फासावर लटकविणे म्हणजे विडीच्या झुरक्या इतकीच त्यांची सहज लीला होऊन बसली. असल्या नाजूक परिस्थितीत १९१४ साली कोणी माथेफिरू माणसाने कोल्हापुरच्या बागेतील एडवर्डच्या पुतळ्यावर डांबर ओतल . जिकडे तिकडे हाहाःकार उडाला. पोलीशी ठाणी गदागदा हादरली. गुप्त दूतांची नाके व कान मैलमाल लांब वाढले. डांब-या बेरड हुडकून काढण्याच्या तगाद्याचा महाराजांचा हंटर पो. सु. फरनांडीझच्या पाठीवर दिवसातून २४ वेळा फडाडू लागला. गावातील रिकामटेकड्या उपद्व्यापी लोकांनीही पोलिसाशी गुप्तसेनेत प्रवेश करून घेतला. असे करण्यात या हरामखोरांचा उद्देश निराळात असतो. पोलिसांचे पाठबळ मिळाले म्हणजे अनेक सुष्ट-दुष्ट व्यक्तीवरील आपल्या खासगी किंवा व्यावहारिक व्यक्तिद्वेषाचा सूड भरपूर उगवून घेता येतो. ‘’

यावेळी लठ्ठे, डोंगरे आणि जाधव या तीन विद्वानांचे तेज कोल्हापुरात बरेच होते. प्रत्येक विवेकवादी तळवळीत हे पुढारी असत. जात्याच विद्वान, बहुश्रुत, व्यासंगी आणि चिकित्सक सल्यामुळे या तिघांपुढे कोल्हापुरातील सर्व ब्रा म्हण, ब्रा म्हणेतर शालशिष्ट, तेजोहीन झाले होते. सामाजि चळवळीबरोबरच राजकीय सुधारणेवि यी त्यांच्या स्पष्टोक्ती राजसत्तेला जवळजवळ डोईजड होऊ लागल्या होत्या. विशेषतः प्रो. लठ्ठे यांच्य वाग्लेखन शरचापल्यामुळे त्यांच्या हितशत्रूच्या पलटणी कोल्हापुरात ब-याच निर्माण झाल्या होत्या.