सत्यशोधक भाऊराव पाटील: Page 4 of 16

मास्तरास विचारले.

    मास्तर – ते एक महाराचे पोर आहे. शिकायला येते. त्याला आत कसे घ्यावे ?

भाऊराव – इतर मुलांना आत घेता तसेच घ्यावे. तो मुलगा माणूस नाही वाटतं ? विद्येच्या मंदिरात सुद्धा माणसांनी माणुसकीचा मान राखू नये काय ?

मास्तर – अहो पण तो महारा आहे. त्याला आम्ही कसे शिवावे ? काही धर्मबिर्म आहे की नाही ?

भाऊराव – बरं इतक्या लांब पायरीजवळ बसून त्याने शिकावे तरी कसे आणि काय ?

 मास्तर – अहे ही महारड्यांची पोरं. काय कर्म शिकणार ? सही करण्यापुरती अक्कल आली तर आली.

भाऊराव संतप्त झाले. त्यांनी त्या मुलाचा हात धरला आणि म्हणाले,  ‘‘बाळ तू या धर्मवान शाळेत जन्मभर बसलास, तरी काही फायदा होणार नाही. चल तू माझ्या घरी मी तुला स्वतः शिकवून विद्वान करतो. ’’ अस्पृश्यांचा हा कोण कैवारी आणि तो मज दीनावर कसा प्रसन्न झाला ? इत्यादी अनेक कल्पनातीत भावनांनी त्या मुलाचे हृदय भरून आले. तो टपटपा अश्रू गाळू लागला. भाऊराव त्याला तेथूनच घरी घेऊन आले. वडील मातोश्रींना हे हिंदू धर्माच्या लायकीचे व समत्व योग उच्यते चे जिवंत चित्र दाखविले. तेथून त्या मुलास कोल्हापुरास नेऊन मिस क्लार्क होस्टेलमध्ये घातले व त्याचे शिक्षण इंग्रजी ६ यत्तेपर्यंत सर्वार्थ त्यागपूर्वक पूर्ण केले, वाचकहो, ते महाराचे गरीब महत्त्वाकांक्षी पोर कोण ? माजी आमदार ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप M.L.C. हे होय, महाराष्ट्रीय अस्पृश्यांच्या विद्यमान चळवळीतला हाच पहिला कर्तबगार तरुण, यांनी मूकनायक नावाचे एक उत्कृष्ट साप्ताहिक चालवून, आणि कौन्सिलातही अस्पृश्यांच्या उद्धारार्थ पुष्कळ परिश्रम केले व सध्या करीत असतात. सांप्रत, साता-यास ते डिस्ट्रिक्ट लोक बोर्डचे व स्कूल बोर्डचे मेंबर आहेत हे उत्तम भाषक व लेखक आहे. अलीकडे अस्पृश्यांमध्येच जी भटी धाटणीची व्यक्तिद्वेषाची वावटळ सुरू झालेली आहे. तिला कंटाळून श्री. घोलपांनी सध्या भाषण लेखन तपश्चर्येत मूक वृत्ती झारण केलेली आहे. पण आम्हाला आशा आहे की अस्पृश्य समाज हिरा आणि गारगोटीतला भेद लवकरच जाणून, घोलपासारख्या स्वयंप्रकाशी पुढा-याच्या कर्तबगारीचा आत्मप्रबोधनार्थ योग्य तो उपयोग करून घेईल.

भाऊरावचे शिक्षणदानाचे कार्य केवळ स्पृश्य वर्गापुरतेच होते असे नव्हे. मराठे व तत्सम जातींतल्या अनेक मुलांनाही त्यांनी पदरमोडीने शिक्षण, कपडे, पुस्तके पुरवून आज चांगल्या प्रतिष्ठित स्थितीत आणून ठेवले आहेत. कोणी पोलीस सब इन्स्पेक्टर, कोणी वकील, कोणी शिक्षक, तर कोणी कारकून अशा नानाविध व्यवसायात ते आहेत. एका जैन परिषदेच्या प्रसंगी व्होलंटियरचे कॅप्टन होते. त्यावेळी त्यांची चलाखी, शिस्त, टापटीप वगैरे पाहून मुंबईचे सुप्रसिद्ध दानवीर शेठ माणिकचंद पानाचंदनी दरमहा ३० रु. स्कॉलरशिप देऊन हि-या मोत्यांची परीक्षा कशी करावी, याच शिक्षण देण्याकरिता मुंबईस स्वतःच्या पेढीवर नेले. त्याचवेळी दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये भाऊरावांनी अक ौंटन्सीचा कोर्स घेतला होता. पुढे आजारी पडून १९११ परत साता-यास आल्यावर भाऊरावांनी एका वर्षात इंग्रजी २ ते ३ इयत्ता शिकवण्याचा एक खाजगी वर्ग उघडला. या वर्गात मागासलेले ब्रा म्हणेतर व अस्पृश्यांची पुष्कळ मुले शिक्षण घेत असत. पण त्यात बराचसा भरणा मोफत विद्यार्थ्या चाच होता. कारण, गरजू विद्यार्थी आणि तो भाऊरावच्या दारात आला की पुरे, त्याची सोय झालीच. मग त्या पायी वाटेल ते नुकसान झाले तरी त्याची भाऊरावला पर्वा काय ? काले येथील बरेच विद्यार्थी या क्लासात असत. त्यांची हुषारी पाहून कित्येक आय.सी.ए. अधिका-यांनी त्यांना खासगी स्कॉलरशिप्स दिल्या व ते परत विलायतेला गेले तरी तेथून परस्पर त्यांच्या विद्यार्थ्यांना मनीऑर्डरी येत असत. भाऊरावाच्या प्रयत्नामुळे सातारा जिल्ह्यात काले हे सर्व उत्तम चळवळीचे केंद्र झाले आहे. या इंग्रजी क्लासामुळे पुष्कळ गरीब विद्यार्थी स्वावलंबी झाले व