सत्यशोधक भाऊराव पाटील: Page 3 of 16

आता बी.ए.एल.एल.बी. वकील होऊन साता-यास प्रॅक्टीस करीत असतात.

याच वर्षी भाऊरावला आणखीन एका विवेक अमान्य गोष्टीबद्दल बंड करावे लागले. प्रो. अण्णासाहेब लठ्ठे हे जैन बोर्डिंगचे सुपरिटेंडंट होते. एका संध्याकाळी काही मुलांना दाढ्या करण्याची लहर आली. पण ते धर्मबाह्य कृत्य म्हणून बोर्डिंगच्या नियमाविरुद्ध होते. भाऊराव म्हणाले,  ‘असला कसला हा नियम आणि हा धर्म ? सकाळी दाढी केली तर पुण्य ? संध्याकाळी केली तर पाप ? काय या पाप पुण्याच्या आचरट कल्पना बुवा. बस्स. प्रथम मी दाढी करणार नरकात गेलो तरी बेहत्तर !’ भाऊरावाबरोबर ५-६- मुलांनीही दाढी विधी उरकला. सुप. लठ्ठे यांना ही गोष्ट कळताच, त्यांनी गुन्हेगारांना बोलावून त्यांची हजेरी घेतली व शिस्त मोडल्याबद्दल चार-चार आणे दंड ठोठावला. बाकीच्या सर्व मुलांनी दंड भरला पण भाऊरावाने साफ नाकारले. तुमच्या बोर्डिंगची शिस्त मी मोडली असेल तर मला बोर्डिंगातून डिसमिस करा. संध्याकाळी दाढी केली म्हणून काय आकाश कोसळून पडले ? का धर्म बुडाला ? दाढ्या आम्ही स्वतः आणि त्याचा डबल चार्ज तुम्हाला काय म्हणून ? सुप. लठ्ठे यांनी अर्थात भाऊरावांची बोर्डिंगातून उचलबांगडी केली.

तेथून निघताच, महाराजांचे मेहुणे मामासाहेब खानविलकर यांनी आपले चिरंजीव बाळासाहेब यांचे कॅम्पनियन म्हमून भाऊरावांची राजवाड्यात सर्व व्यवस्था लावली. तेथे ते दोन वर्ष होते. या अवधीत त्यांचा सारा आयुष्यक्रम सरदारांच्य मुलांच्या श्रीमंती सहवासात गेल्यामुळे, बालपणातील गोरगरीब मित्रांच्या जीवनाकडे तुलनेने पाहण्याची त्यांची सत्यशोधक प्रवृत्ती अत्यंत चिकित्सक व न्यायनिष्ठूर बनली. त्यावेळी कोल्हापूरात शेणोलीकर मास्तर असत, ते भाऊरावची तरतरीत बुद्धी, कडवा बाणेदारपणा आणि तत्त्वनिष्ठा पाहून फार खूष झाले, ते दररोज भाऊरावला खाजगी मोफत शिकवीत असत. त्यांच्य उपदेशाचा भाऊरावच्या शीलकमावणीवर दीर्घ परिणाम झाला. याच सुमारास शाहू महाराजांच्या प्रेरणेने लठ्ठे, जाधव, डोंगरे प्रवृत्तीने सत्यशोधक समजाच्या पुनर्घटनेचे प्रयत्न चालू केले आणि महाराजांनी खास अस्पृश्यांकरिता मिस क्लर्क होस्टेल सुरू केले. या सर्व चळवळींचा भाऊरावाच्या मनावर योग्य तोच परिणार होऊन ते सत्यशोधक बनले आणि मागासलेल्या अस्पृश्य वर्गासाठी आपले तन मन धन वेचण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली.

१९०८ साली हायस्कूलचा मॅट्रिक पर्यंतचा अभ्यास करून भाऊरावाने कोल्हापूर सोडले ते उरूण इस्लामपूरला आले. तेथे त्यांचे वडील नोकरीवर होते. कोठेतरी रेव्हेन्यू खात्यात नोकरी धर असा त्यांनी पुष्कळ आग्रह केला, पण भाऊरावला तो पसंत पडला नाही.  ‘मला नोकरी करायची आहे, पण त्याची जागा हे रेव्हेन्यू खाते नव्हे. जन्माला यावे आणि बूकर टी. वॉशिंग्टनसारखे जगून अमर व्हावे. सेवावृत्तीच पत्करायची तर महाराष्ट्रात लक्षावधि अस्पृश्य बांधव जनावराच्या जिण्याने जगत आहेत ; त्यांना शिक्षणदान देऊन त्यांचा आत्मोद्धार केला तर ती सेवा देवाघरी कितीतरी रूजू होईल, व्यवहारदक्ष वडिलांना ही आपल्या चिरंजीवाची महत्त्वाकांक्षा एकपरी उत्तम वाटली, पण व्यावहारिकदृष्ट्या कशीशीच वाटली. बरे, भाऊराव म्हणजे एक नंबरचा हट्टी. म्हणेल ते करील. मान तुटेल पण हट्ट तुटणार नाही. तेव्हा तो जसा जाईल तसाच त्याला जाऊ देणे हाच मार्ग वडिलांनी पत्करला.

पहिला जीर्णोद्धार

मागासलेल्या वर्गात शिक्षणप्रसाराशिवाय आत्मप्रबोधन होणे शक्य नाही, आणि त्या दिशेने आपण स्वतःच काहीतरी झिजले पाहिजे, या एकाच उदात्त हेतूने भाऊरावचे  चित्त व्यग्र झाले ; आणि आजसुद्धा त्याच्या सर्व धडपडी या एकाच दिशेने चाललेल्या आहेत. उरूण-इस्लामपूरला एक दिवस तरुण भाऊराव  तेथील शाळेवरून जात असता, एक गरीबसा मुलगा पाटी पुस्तके घेऊन वर्गाच्या बाहेर दरवाजापाशी पायरीजवळ बसला होता. मास्तर खोलीच्या दुस-या टोकाला वर्ग शिकवीत होते. त्यांचे काही शब्द कानी पडले तर पहावे, आली काही विद्या तर ठीक, नाहीतर नशीब. ही विवंचना त्या दीनवाण्या मुलाच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होत, ताबडतोब भाऊराव  शाळेत शिरले. नमस्कार चमत्कार झाल्यावर हा मुलगा एकटाच तिकडे बाहेर का बसविला ?’ म्हणून