सत्यशोधक भाऊराव पाटील: Page 2 of 16

नाही की जीत भाऊराव पाटलांचे श्रम खर्ची पडलेले नाहीत. इतकी सर्वस्पर्शी व सर्वव्यापी चळवळ करणारी ही व्यक्ति कोण आहे, कशी आहे. कसल्या ध्येयाच्या मागे लागलेली आहे. इत्यादी सर्व तपशील महाराष्ट्रापुढे मांडण्याचा मान प्रथमतः प्रबोधनलाच मिळत आहे, हे या कलमाचे भाग्य होय, भाऊरावांचे चरित्र म्हणजे तरुण महाराष्ट्राला जितके हद्यंगम तितकेच ते आत्मप्रबोधक वाटेल, अशी आशा आहे. आमची अशी खात्री आहे की, भाऊराव जर ब्राह्मण असते, निदान भटाळलेले असते, तर भिक्षुकशाहीने त्यांना जला आकाशापेक्षाही उंच उचलून धरले असते.

घराणे आणि पूर्वसंस्कार

भाऊरावांची जन्मभूमी. यांचे घराणे तेथले वतनदार पाटील हे जैन धर्मी असून जात चतुर्थ. हे पाटील घराणे बरेच मोठे असून यांच्या नातेवाईकांच्या शाखा व उपशाखा विस्तृत पसरलेल्या आहेत. पिढ्यान पिढ्या चालत आलेला मुख्य धंदा शेतकी. अर्थात शेतकीशी सहकार्याने राहण्यास साठवलेल्या अक्षरशत्रुत्वाचाही पगडा या ऐतवडेकर पाटलावर बराच असे. परंतु भाऊरावांचे वडील पायगोंडा पाटील यांनी मराठी ७वी यत्तेची परीक्षा देऊन सरकारी नोकरी धरली. साक्षर होऊन सरकारी नोकरीत प्रवेश करणारे है जैनातील पहिलेच गृहस्थ. यांना २० रुपये पेन्शन मिळत असे. खुद्द भाऊरावच्या वंशावळीतले दोन पूर्वज सर्वज्ञानसंपन्न व सर्वसंगपरित्याग करून जिनसेन (जैनांचे जगद्गुरू) झाले होते. कमाल स्वार्थत्यागाची, शिक्षणज्ञानाची आणि बहुजन सेवेची भाऊरावांची जी प्रवृत्ती आज पूर्णत्वाने परिमत झालेली स्पष्ट दिसत आहे, तिचा उगम या पूर्व संस्कारातच आढळून येतो. भाऊरावांचे शिक्षण तासगांव, दहिवडी, विटे व कोल्हापूर वगैरे मॅट्रिकपर्यंत झालेले आहे. विद्यार्थी दशेतच त्यांना तालमीचा नाद लागला व ते सर्व ठिकाणी बंडखोर विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध असत. लहानसहान हक्कासाठी सामोपचाराचे सर्व प्रयत्न हरल्यावर गुंडगिरीची लाठी फिरवण्याचा प्रसंग आलाच, तर पहिला रामटोल्या भाऊरावचा असे. अमुक गोष्ट अन्यायी आहे एवढे त्यांना पटले की त्याविरुद्ध शक्य त्या रीतीने दंडुकेशाही चालविताना ते कोणाचीही व कशाचीही दरकरार बाळगीत नसत.

लहानपणापासूनच त्यांना लोकसंग्रहाची मोठी आवड आणि त्यांच्या सवंगड्यात शेतक-यांची व महार मांगादी अस्पृश्यांची मुले यांचा भरणा विशेष असे. स्पृश्यअस्पृश्य भेदाचा जुलमी वेदोक्तपणा त्यांना आपल्या विद्यार्थी दशेतच अटकळीत आणून त्याविरूद्ध शक्य तेवढा निकराचा विरोध करण्याचा उपक्रम चालू ठेवला होता. आपल्या अस्पृश्य मित्रांना सार्वजनिक विहिरीवर आणि पाणवठ्यावर लोक का येऊन देत नाहीत ; याचा बालभाऊरावला प्रथम प्रथम काही उलगडाच होईना ! पुढे खुलासा झाला की हिंदू धर्माची आज्ञाच तशी कडकडीत आहे. एका विहिरीवर ते आपल्य एका अस्पृश्य मित्रासह पाणी प्यावयास गेले. लोकांनी मित्राला मज्जाव केला. भाऊराव म्हणाले, या विहिरीवर आम्ही दोघेही पाणी पिणार. पिऊन देत नसाल तर मी तुम्हालाही पाणी काढून देणार नाही. गोष्ट हमरी तुमरीवर आली. तालीमबाज भाऊरावाने कडाड एका हिसक्याने विहिरीचे रहाटचाक उचकून मोडले आणि दिले दूर भिरकावून.  ‘काढा लेकाच्यानो कसे पाणी काढतो ते ! म्हणे आमचा हिंदूधर्म. उभा तिवाठ्यावर जाळला पाहिजे असला धर्म.

भाऊरावचा आजचा कडवा सत्यशोधक बाणा, अल्पवयातल्या असल्या प्रत्यक्ष सत्यशोधनांनी बनलेला आहे. सन १९०२ ते १९०८ पर्यंत इंग्रजी शिक्षणासाठी ते कोल्हापुरात जैन बोर्डिंगमध्ये रहात असत. तेथेही त्यांची बंडखोर प्रवृत्ती वाढत्या प्रमाणावर होती. विवेकाला ज्या गोष्टी पटायच्या नाहीत त्यांचा ठिकठिकाणी निषेध करायला भऊराव कधीच कचरत नसत. १९०६ सालापर्यंत कोल्हापुरची नेटिव जनरल लायब्ररी म्हणजे संपूर्ण भटाळलेली असे. मॅनेजिंग बॉडीत कजात सगळे ब्रह्मपुत्र. ही गोष्ट भाऊरावच्या नजरेस यायची. त्यांनी लागलीच आपल्या सवंगड्यांची सेना सज्ज करून, या भटी सवत्या सुभ्याला मोर्चे लावले व मॅ. बॉ. च्या इलेक्शनची संधी साधून गावात दांडगी चळवळ सुरू केली. शेकडो ब्रा म्हणेतरांना लायब्ररीचे मेंबर करून त्यांच्य बहुमताच्या जोरावर भटी सवत्यासुभ्याला कायमची मूठमाती दिली. या प्रसंग भाऊरावांच्या बरोबरीने रामभाऊ शिंदे या तरुणाने नेटाचा हल्ला चढवण्यात पुढाकार घेताल होता. हे