अखेरचे भाषण : Page 2 of 4

चालेना. बायला आमंत्रण आले. पण ती येण्यापूर्वी बाई बाळंत होऊन मुलगा झाला. बायला पाहताच डॉक्टर म्हणाले, बाय, आज तुझा चान्स मी घेतला. मुलगा झाला. बरं, आत जाऊन पहा, सारं ठीकठाक आहे ना ते. म्हातारी आत गेली. बाळंतिणीची तपासणी करून बाहेर आली. ये डॉक्टर ! माझा चान्स गेला काय ? जरा थांब !’ आणि आत जाऊन पंधरा मिनिटांनी दुसरा मुलगा घेऊन बाहेर आली. (हशा) डॉक्टर म्हणाला, अरे बाबा, पहिली सुटका झाली म्हणून गेला असतास, तर ही दुसरी भानगड कुणी रे निपटली असती ?’... बयला कधी नाट लागली नाय. बय जाईल तिथे यश हाय ! पुढे आम्ही दादरला आलो. आमच्याबरोबर ही म्हातारीही आली. तिथेही तिचं तेच ! तिच्या अंत्ययात्रेला किती तर लोक जमले होते. कोळी आले, ख्रिश्चन आले, माहीमचे मुसलमान आले. त्यातले काही बाजूला घेऊन मला म्हणाले, दादा! म्हातारीचे आमच्यावर खूप उपकार आहेत. तुमची जशी ती आजी, तशी आमचीही ती आई-आजीच. आमची एक इच्छा आहे. तुमचं धर्मकर्म..... मी म्हटलं, धर्म गेला खड्ड्यात ! काय ते बोला !’ म्हणाले, आमची सगळ्यांची इच्छा आहे की, म्हातारीला खांदा द्यावा. बयच्या अभेदी विचाराच्या शागिर्दीतच आम्ही सारे वाढलेले. तात्काळ होकार दिला आणि बयची प्रेतयात्रा अक्षरशः सार्वजनिक थाटाने दादरच्या सोनापुरात नेण्यात आली.

 

आमच्या मातोश्रींचं व्रत वेगळं. मुलांना शिस्त लावण्याच्या कामात ताईसारखी आई कुणाला मिळायची नाही. अभ्यास झालाच पाहिजे. इतके मार्क्स मिळालेच पाहिजेत. अहो, चौथी इयत्तेत इंग्रजी विषयात मला शंभरापैकी नव्वद मार्क्स मिळाले. आला आनंद व्हावा ना ! पण ताईने फा Sडकन दिली माझ्या मुस्कटात, म्हणाली, शंभर का नाहीत सांग ?’ म्हणायची, मुलांचे खाण्यापिण्याचे लाड करावेत. पण त्यांनी इकडची गोष्ट तिकडे ठेवली की, मला खपत नाही. सवय वाईट असते. तिथली वस्तू तिथेच ठेवली पाहिजे. अशी तिची शिस्त. तीही आपल्या सासूला प्रसूतीच्या कामात मदत करायची.

 

आमचाही एक संप्रदाय आहे. सत्यशोधनाचा, सामाजिक बदल घडवून आणणा-या प्रबोधनाचा, बाळनीही आपला एक संप्रदाय काढलाय. तो शिवसेना घेऊन हिंदुत्वासाठी झगडतोय. तो माझ्यापेक्षा शतपट पराक्रम गाजवील. याचा मला केवढा अभिमान वाटतो. (प्रचंड टाळ्या)

 

आज मी नव्वदीत प्रवेश केलाय. ह्या वयात नाना त-हेच्या गरजा असतात. पण माझ्या दोन्ही सुना – विशेषतः थोरली सून, तुम्ही तिला मीनाताई म्हणतात  - ती मागाल ते आणून देते. बोलायची खोटी, वस्तू हजर ! ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळेच वृद्धत्व सुखद झालंय.

 

मागच्या चार पिढ्यांचे आणि तुमचे माझ्या उपकारांचं ओझं आहे, तेवढंच ज्यांनी मला विरोध केला, प्रतिकार केला त्यांचेही माझ्यावर उपकार आहेत. कारण त्यांनी जर प्रतिकार केला नसता तर माझ्या वाणी लेखणीला धार कशी चढली असती ! (हशा) दांभिकता, अस्पृश्यता आणि खोटं बोलणं याची मला भयंकर चीड आहे. ती आली आणि लेखणी हातात असली, मग समोर कुणीही असो, त्याला मी उभा चिरलेला आहे. (टाळ्या) काय होणार काय ? तुझा-माझा संबंध तुटेल !... जातो कोण तुझ्याशी संबंध जोडायला ! (हशा) मला एवढंच सांगायचंय, तुझं चुकतंय.

 

कोल्हापूरच्या शाहूमहाराजांचा आणि माझा मोठा स्नेह ! काही ऐतिहासिक प्रश्न असतील तर ते नेहमी मला विचारायचे. अशा ऋणानुबंधाचा माणूस. पण त्याने एकच चूक केली. अंबाबाईच्या देवळामध्ये मराठ्यांची मुलं गेली आणि त्यांनी देवीची पूजा केली. महाराजांनी ताबडतोब तेथील एका हायस्कूलातील काही मराठा विद्यार्थ्यांना पकडून लॉकमध्ये डांबल्याची वर्तमानपत्रात बातमी आली. तो फार फसफसायला लागला.

 

इतका कडक लेख लिहिला की, लोक म्हणायला लागले, ठाकरे, तुमचा आणि कोल्हापूरचा आता संबंध