शिवाजी विद्यापीठाच्या पी. एच. डी. ( समाजशास्त्र )

शिवाजी विद्यापीठाच्या पी. एच. डी. ( समाजशास्त्र ) पदवीसाठी सादर केलेला प्रबंध
'' प्रबोधनकार ठाकरे यांचे महाराष्ट्रातील सामाजिक विचारांचे योगदान : एक समाजशास्त्रीय अभ्यास ''

* अभ्यासक *
श्री. नवनाथ एकनाथराव शिंदे

* अधिव्याख्याता *
आजरा महाविद्यालय आजरा, जि. कोल्हापूर.

* मार्गदर्शक *
डॉ. पी. बी. द्राक्षे
एम. ए. पी. एच. डी.

* प्रपाठक *
समाजशास्त्र विभाग
डॉ. घाळी कॉलेज गडहिंग्लज, जि. कोल्हापूर.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर - 2006

मार्च - 2006
* प्रतिज्ञा पत्र *

'' प्रबोधनकार ठाकरे यांचे महाराष्ट्रातील सामाजिक विचारांचे योगदान : एक समाजशास्त्रीय अभ्यास '' या विषयावरील प्रस्तुत प्रबंध मी शिवाजी विद्यापीठाच्या पी. एच. डी. (समाजशास्त्र ) पदवी परीक्षेसाठी लिहिला आहे. हा प्रबंध अथवा त्याचा कोणताही भाग मी अन्यत्र कोठेही, कोणत्याही परीक्षेसाठी सादर केलेला नाही.

आजरा.

दिनांक :
( श्री. नवनाथ एकनाथराव शिंदे )
अभ्यासक

* प्रमाणपत्र *

प्रमाणित करण्यात येते की, श्री नवनाथ एकनाथराव शिंदे यांनी '' प्रबोधनकार ठाकरे यांचे महाराष्ट्रातील सामाजिक विचारांसे योगदान : एक समाजशास्त्रीय अभ्यास '' या विषयावरील प्रबंध लेखनाचे संशोधन कार्य समाधानकारक रित्या पूर्ण केले आहे.
श्री. नवनात एकनाथराव शिंदे यांनी माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्रपणे हा प्रबंध लिहिला असून तो इतर कोणत्याही विद्यापीठात कुठल्याही अन्य परीक्षेसाठी सादर केलेला नाही. सदरचा प्रबंध शिवाजी विद्यापीठाच्या पी. एच. डी. ( समाजशास्त्र ) पदवी परीक्षेसाठी सादर करण्यास माझी अनुमती आहे.

गडहिंग्लज

दिनांक :
डॉ. पी. बी. द्राक्षे
मार्गदर्शक

* ऋणनिर्देश *

'' प्रबोधनकार ठाकरे यांचे महाराष्ट्रातील सामाजिक विचारांचे योगदान : एक समाजशास्त्रीय अभ्यास '' हा प्रबंध खूप दिवसांच्या अध्ययनानंतर आपल्या हाती देतांना मला अतिव आनंद होत आहे. हा प्रबंध लिहिण्याची प्रेरणा, मार्गदर्शन आणि सहकार्य ज्या ज्या व्यक्तींनी केले, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे त्याबरोबरच त्यांचे ऋण मानणे माझे अद्य कर्तव्य आहे.
प्रबंधासाठी ' प्रबोधनकार ठाकरे ' ह्याच विषयाची निवड करण्यापाठीमागे माझ्या आई-वडिलांच्या संस्काराचा आवर्जुन उल्लेख करणे आवश्यक आहे. एका अडाणी, अशिक्षित आणि दरिद्री परंतु सात्विक अशा कुटूंबामध्ये माझा जन्म झाला. तसे पाहिले तर माझी आई परंपरावादी ! माझा मूळचा पिंड परंपरेला छेद देणारा ! त्यामुळे तिच्या संस्काराचा संसर्ग मी मला होऊ दिला नाही. माझ्या वडिलांचा स्वभाव सत्यनिष्ठ आणि सात्विक ! त्यांनी माझ्या व्यक्तिमत्वाची अचूकपणे परिक्षा केलेली ! बी. ए. झाल्यानंतर मी एम. ए. ला कराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे प्रवेश घेतला. दरम्यानच्या काळात गावच्या पत्यावर मला पी. एस. आय. च्या परीक्षेचा कॉल आला. तो कॉल घेऊन वडील औरंगाबादला आले खरे ! परंतू त्यांच्या चेहऱ्यावर पूर्णपणे नैराश्य दिसत होते. ते कोणताही आडपडदा न ठेवता मनमोकळे पणाने म्हणाले.... '' नवनाथ! गडया ! दुसरी कसलीबी नोकरी कर, पण पोलीस खात्यातली नोकरी कांही करून नकोस '' का ? असा प्रश्न विचारताच वडील म्हणाले... '' हे बघ, पोलीस झाल्यानंतर एखाद्या आरोपीला तू बेडया घालून चालविलेस, तेवढयात समोरून त्याची बायका मुले रडत पडत आली, तर तू त्या आरोपीच्या हातातील बेडया काढून, बाबा तू जा तुझ्या बायका पोरांसोबत रात्रभर गप्पागोष्टी कर आणि उद्या निवांत ये असे म्हणून आरोपील सोडून देशील, आरोपी तिकडेच फरार होईल आणि हे बदमाश तुझ्या हातात बेडया ठोकतील.'' वडिलांचा सल्ला मला पटला आणि मी पोलीस खात्यामध्ये नोकरी करण्याचा नादच सोडून दिला.
बारामतीच्या ज्युनिअर कॉलेजमध्ये नोकरी करतांना मला पोस्ट ऑफिसमध्ये क्लार्कच्या नोकरीच्या ऑर्डर आली. मी अतिशय व्दंव्दामध्ये सापडलो. पी. एच. डी. झालेल्या तज्ञांनी सल्ला दिला की, '' शिंदे सर आहो ! सेंट्रल गव्हर्मेंटची ती नोकरी डोळे झाकून द्या या नोकरीचा राजीनामा आणि जा पोष्ट ऑफिसमध्ये ! '' मी पोष्ट ऑफिसमध्ये जाऊन पोस्ट मास्तरचा सल्ला घेतला. तेंव्हा ते म्हणाले... '' शिंदेसर दुसरी कोणतीही नोकरी करा पर पोस्ट खात्यात मात्र येऊ नका, आहो ! मी गेली

संदर्भ प्रकार: