प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे सत्यशोधक चळवळीला योगदान: Page 94 of 235

लिहून हा ग्रंथ यहुदी, हिंदी, ख्रिस्ती, मुसलमान वगैरे सर्व धर्मातील लोकांनी संग्रहास ठेवावा, अशी विनंती केली.''96
3.2.1.4 डॉ. संतुजी रामचंद्र लाड (1841-1916)
सत्यशोधक चळवळीतील फुले यांचे सहकारी म्हणून यांचे स्थान महत्त्वाचे आहे.
''धनगर समाजातील अलीकडच्या काळातील पहिले थोर पुरुष डॉ. लाड हे सत्यशोधक समाजाचे आघाडीचे नेते म्हणून प्रसिध्द होते. ज्योतिरावांबरोबर त्यांनी अनेक वर्षे मोठे मोलाचे कार्य केले.''97
त्यांचे शिक्षण ठाण्याच्या मिशनरी शाळेत झाले होते. डॉ. कीर्तीकर यांच्याकडे त्यांनी वैद्यकशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. 1885 च्या ठाणे येथील सत्यशोधक समाजाच्या वार्षिक उत्सवात त्यांनी सक्रिय भाग घेतला होता.
''दीनबंधूने 23 फेब्रुवारी 1896 च्या अंकात प्रथम भाषणकार असा त्यांचा उल्लेख केला आहे. दीनबंधू या वृत्तपत्राला त्यांनी आर्थिक मदत करून हे पत्र बंद पडू दिले नाही. दीनबंधू या पत्रासाठी लाड यांनी आपली सर्व स्वकष्टार्जित संपत्ती अर्पण केली.''98
''1912 साली नाशिक येथे भरलेल्या सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या परिषदेचे ते अध्यक्ष होते. फुले यांच्या उपदेशाची सत्यता, उपयुक्तता व आवश्यकता यांचा आपल्यावर प्रभाव पडला व त्यानुसार आपण वर्तन करतो, असे त्यांनी म्हटले. वि. रा. शिंदे यांनी काढलेल्या निराश्रित साह्यकारी मंडळाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. त्यांनी ठाणे येथे रात्रीची शाळा चालविली होती. ठाण्याहून स्वखर्चाने येऊन परळ येथे मिशनच्या शाळेतील मुला-मुलींना ते मोफत औषधोपचार करत. ठाणे येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या तिसऱ्या अधिवेशनाचा खर्च लाड यांनी केला.''99
3.2.1.5 गोविंद गणपतराव काळे (1871-1948)
म. पुफ्ले यांचे लेखनिक असलेले गोविंदराव काळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले. काळे यांच्यावर फुले, ग्यानोबा ससाणे, आई ताराबाई काळे यांचा प्रभाव पडला होता.
''फुले यांची दिनचर्या, त्यांचे सयाजीराव गायकवाडांशी संबंध, त्यांचे लिखाण, सावित्रीबाई फुले व यशवंत फुले यांचा मृत्यू, अंत्यसंस्कार यासंबंधी त्यांनी आठवणी लिहून ठेवल्या आहेत.''100
''सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तिकेत फुले यांना प्रश्न विचारणाऱ्यांपैकी काळे हे एक आहेत.''101
''1877 च्या दुष्काळात फुले यांनी दुष्काळग्रस्तांसाठी धनकवडी येथे जे अन्नसत्र चालविले होते, त्याला काळे यांनी बरेच सहकार्य केले. हडपसर येथे ससाणे यांनी काढलेल्या पतसंस्थेचे काळे अध्यक्ष होते. त्यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम चालविले.''102
काळे यांचे सार्वजनिक कार्य पाहून इंग्रज सरकारने त्यांना 'रावसाहेब' हा किताब दिला.
3.2.1.6 ग्यानोबा कृष्णाजी ससाणे
ससाणे हे फुले यांच्या सख्ख्या मावसभावाचे पुत्र व फुले यांचे अनुयायी होते. त्यांचे लग्न खुद्द फुले यांनी सत्यशोधक विवाह पध्दतीने लावले होते. त्यांची मुलगी राधा हिचा विवाह फुले यांचे दत्तक पुत्र यशवंत यांच्याशी झाला. फुले यांच्या सार्वजनिक कार्यात ससाणे यांचा कृतिशील सहभाग होता.
''दीनबंधू, शेतकऱ्यांचा कैवारी वगैरे पत्रातून अविद्या व दर्ुव्यसने यामुळे शेतकरी आपले संसार व शरीर याची कशी हानी करतात, शेतकरी लोकांची सुधारणा होण्यासाठी लोकांनी व सरकारने काय करावे, याबद्दल लेख लिहिले. त्यांनी हडपसर गावात मुला-मुलींच्या शिक्षणासाठी चौथीपर्यंत शाळा काढली. ते या शाळेत स्वत: शिकवीत.''103
''पुणे-मुंबईत भाजी, फुले ठोक भावाने विकण्यासाठी हडपसर येथे 1910 साली 'विविध को. ऑप. सोसायटी' त्यांनी स्थापन केली. त्या सोसायटीचे ते अध्यक्ष होते. (1910-16) हडपसर येथे पतपेढी स्थापन होण्यापूर्वी तेथील शेतकरी व सावकारी लोकांची देवघेव व पतपेढी स्थापन झाल्यानंतर शेतकरी वर्गात झालेले आर्थिक परिवर्तन यासंबंधीची माहिती कृष्णराव भालेकरांच्या खाजगी संग्रहातील एका टिपणात सापडते.''104
ससाणे यांच्या सहकारी सोसायटीच्या कार्यावरून त्यांनी महाराष्ट्रातील सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली, असे म्हणावे लागेल.
3.2.1.7 सावित्रीबाई फुले
म. फुले यांच्या शैक्षणिक उपक्रमात तसेच सत्यशोधक चळवळीत सावित्रीबाईंचा वाटा मोठा आहे. सत्यशोधक समाजाच्या दुसऱ्या वार्षिक समारंभाच्या हकिकतीत त्यांच्या नावे पंधरा रुपये जमा आहे. यावरून त्या सत्यशोधक समाजाच्या क्रियाशील सभासद होत्या, हे दिसून येते. अशिक्षित असूनही चिकाटी व ज्योतिबांचा आग्रह यामुळे 1847 साली त्या नॉर्मल स्कूलमधून इयत्ता चौथी परीक्षा पास झाल्या. सावित्रीबाईंचा अपवाद वगळता सत्यशोधक चळवळीत स्त्रियांचा फारसा सहभाग नव्हता. 1927 साली पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेल्या चरित्रग्रंथात

संदर्भ प्रकार: