प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे सत्यशोधक चळवळीला योगदान

विठ्ठल व्यंकटराव घुले
चिन्मय प्रकाशन, औरंगाबाद
© विठ्ठल व्यं. घुले

प्रकाशक :
सौ. दिपाली वि. कुलकर्णी
चिन्मय प्रकाशन,
द्वारा, सवनेकर,
जिजामाता कॉलनी,
पैठणगेट, औरंगाबाद.
भ्रमणध्वनी - 9822875219

अक्षरजुळवणी :
गौरव कॉम्प्युटर्स,
औरंगाबाद.
मो. 9158500052

प्रकाशन क्रमांक : 70
प्रथमावृत्ती : 1 जून 2010
मुखपृष्ठ : सरदार
मुद्रक : वेदान्त ऑफसेट, औरंगाबाद
मूल्य : 300 रुपये

1. पेशवाईचा अस्त व प्रबोधनाची सुरुवात
1.1 पेशवाईचा अस्त :
महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे पेशवाईचा अस्त. राजकीयदृष्टया आघातच म्हटले तरी सामाजिकदृटया पेशवाईचा अस्त झाला यात चित्पावनाखेरीज सर्व ब्राह्मण ब्राह्मणेतरांना हायसेच वाटले असेल. पेशवाई आणि प्रबोधन या दोन्ही परस्पर टोकाच्या गोष्टी. पेशवाईचा अस्त होणे म्हणजेच प्रबोधनाची सुरुवात होणे. पेशवाईच्या अस्तातच प्रबोधनाची बीजे पेरली गेली होती, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
1.1.1 पेशवेकालीन राजकीय परिस्थिती :
हिंदवी स्वराज्याचा उदय शिवाजीच्या काळात झाला. त्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर पहिल्या चार पेशव्यांनी केले. मराठा सरदारांना पराक्रमाची नवी क्षितिजे क्षेत्र निर्माण करून देणे आवश्यक आहे, हे बाळाजी विश्वनाथाने ओळखले. त्यानुसार योजना आखली गेली व त्यास शाहूनेही मान्यता दिली.
''ज्या भागात ज्या मराठा सरदारांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर प्रभाव निर्माण केला त्या सरदारांना वसुलीसाठी तो प्रदेश वाटून दिला. उदा.
कान्होजी भोसले - वऱ्हाड, नागपूर
सेनापती दाभाडे - गुजरात बागलाण
सरलष्कर निंबाळकर - औरंगाबाद, गंगथडी
प्रतिनिधी - हैद्राबाद, बीदर व औंध
फत्तेसिंह भोसले - कर्नाटक, अक्कलकोट
पेशवा - खानदेश, बालाघाट
आंग्रे - पश्चिम किनारा
संरक्षणाची फळी मजबूत व्हावी, सैन्याचा खर्च भागविण्यासाठी म्हणून कायम स्वरूपाची जहागिरी देण्याची पध्दत बाळाजी विश्वनाथाच्या काळापासून सुरू झाली.''1
याच काळात सरंजामदाराची निर्मिती झाली.
''मोगल प्रदेशातून चौथाई वसूल करण्याच्या निमित्ताने मुलुखगिरी, स्वाऱ्या सुरू झाल्या. ज्या सरदारांनी जो प्रदेश जिंकला त्यांना तो प्रदेश सरंजामास लावून दिला, असे सरंजामदार शिंदे, होळकर, पवार, गायकवाड, नागपुरकर, भासले हे आपापल्या प्रदेशाचे कालांतराने सत्ताधीश बनले.''2
या सर्व सरदारांमध्ये आपापसात कायमचे हाडवैर निर्माण झाले होते. आणि याच अंतर्गत दुहीमुळे साम्राज्य लयास गेले. याविषयी प्रबोधनकार ठाकरे म्हणतात,
''हिंदुस्थान आम्ही तलवारीच्या जोरावर जिंकले. ही आंग्रेज्याक्ती शालीण्याची द्योतक नव्हे काय? हिंदुस्थान इंग्रजांनी शक्तीच्या जोरावर जिंकलेला असो नाही तर युक्तीच्या जोरावर जिंकलेला असो, हिंदी लोक प्रथम आत्मद्रोही बनले, तेव्हाच त्यांची स्वराज्ये इंग्रज लोकांच्या बुटाखाली गेली.''3
इंग्रज हे मुत्सद्दी होते. येथील सर्व राजकीय परिस्थितीचा त्यांना पूर्णपणे अंदाज आला होता. मराठे सरदारांच्या आपापसातील वैराचा फायदा त्यांनी पूर्णपणे उठवला.
''मराठयांनी इंग्रजांची मदत घेऊन त्याचा हात आपल्या राजकारणात शिरू दिला ही त्यांची मोठी चूक झाली.''4
''मराठयाच्या राजकारणात इंग्रजांचा हात शिरकावण्याचा पहिला मान नानासाहेब पेशव्यास दिला पाहिजे. आपल्या एका वरचढ सरदाराचा पाडाव करावयाचा होता. इंग्रज हे आपले भावी प्रतिस्पर्धी हे नानासाहेबास पूर्णपणे माहीत असतानासुध्दा इंग्रजांच्या मदतीने आं
याला जमीनदोस्त करण्याचा मोह त्याला आवरता आला नाही.''5
''आपापसात भांडून आपल्या भांडणात परक्याची मदत घेतल्यामुळेच हिंदी लोकांचे स्वातंत्र्य नष्ट झाले. या बाबतीत लाभणारा दुरदर्शीपणा एकाही हिंदी मुत्सद्याच्या अंगी दिसून आला नाही. नानासाहेबाने याविरुध्द इंग्रजांची मदत घेतली, बाजीरावाने शिंद्यांविरुध्द घेतली, नाना फडणीसाने होळकराविरुध्द घेतली, नागपुरकर भोसल्याने शिंद्यांविरुध्द घेतली, मुसलमानांनी इंग्रजांची मदत आपापसाविरुध्द व पेशव्याविरुध्द घेतली. दिल्ली, बंगाल, औंध, हैदराबाद व कर्नाटक या ठिकाणी सर्व राजकारणी उलाढाली इंग्रज व फ्रेंच यांची मदत घेऊनच झाल्या.''6
मदतीचा कार्यभाग संपल्याबरोबर मदतनीसाला झाडून दूर करता आले नाही. उलट हे मराठा सरदार त्यांच्यावर जास्तीत जास्त विसंबून राहू लागले. या संदर्भात मन्रो. गं. ज. आपल्या पत्रात लिहितो -
''राजा कितीही दुर्बल किंवा नालायक निघाला तरी आमचा पाठिंबा त्यास निर्धास्त मिळत असल्याने तो आपली सुधारणा तर करीत नाहीच; परंतु परभारे इंग्रजाकडून संरक्षण होत असल्यामुळे तो जास्तच ऐदी, लोभी व क्रूर बनतो. त्यामुळे त्याचे व प्रजेचे प्रेम राहत नाही. अशा रीतीने आमची ही तैनाती फौजेची पध्दत देशाची धुळदान उडवीत आहे.''7
''ज्या राज्याच्या संरक्षणासाठी आम्ही आपल्या फौजा खुद्द त्यांच्या राजधानीत ठेवून दिल्या त्यापासून आम्ही त्या फौजेच्या धाकाने पाहिजे ते करार कबूल करून घेतले.''8
सर्व मराठे सरदार एकत्र आले नाहीत

संदर्भ प्रकार: