स्वाध्याय संदेश: Page 73 of 74

औषधोपचारासाठी वाटेत मुक्काम करण्याबद्दल छत्रपतींनी क्रिस्टॉल साहेबाची नानाप्रकारे विनवणी केली. ओव्हन्स रेसिडेंट हा जसा त्या वेळचा ओडवायर होता, तसाच त्याचा साथीदार हा नराधम क्रिस्टाल त्या वेळचा डायर म्हटला तरी चालेल. त्याने विनंतीचा अवमान करून मुक्कामाची दौड चालूच ठेवली. मात्र बाळासाहेबाला त्याने का स्वतंत्र मेण्यात चालविले होते. परंतु औषधोपचाराची तर गोष्टच राहूद्या पण विचा-याच्या नुसत्या अन्नपाण्याचीही कोणी व्यवस्था पाहिली नाही. अखेर एका मुक्कामावर क्रिस्टॉल साहेबांची सहज लहर लागली म्हणून मेणा उघडून पाहतात तो बाळासाहेबांचे प्रेत कुजून त्याला घाण सुटलेली! बाळासाहेबांचा मृत्यू होताच त्यांच्या पतिपरायण पत्नीने एक दोन दिवसांतच प्राणत्याग केला. अशा रीतीने बाळाजीपंत नाते आपल्या ब्राह्मण कारस्थानाच्या तिरडीवर आप्पासाहेब भोसल्यांच्या हातून बांधलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मुडद्याची प्रेतयात्रा बनारसला पोचेपर्यंत वाटेत अनेक हत्या घडल्या. बनारसला छत्रपति ह्यांना तुरुंगात ठेवले आणि अशा रीतीने सध्याच्या राष्ट्री पक्षांचे इतिहासप्रसिद्ध पूर्वज लोकमान्य बाळाजीपंत नातू, चिंतामणराव सांगलीकर, वगैरे भू-देवांचे स्वराज्यद्रोही कारस्थान परशुरामाच्या कृपेने तडीस गेले. बाळाजीपंत नातू याने कंपनी सरकारकडून जहागि-या मिळविल्या, अप्पासाहेब भोसल्याची दिवाणगिरी मिळविली, नौबदीचे अधिकार मिळविले, बाळा जोशी नावाच्या एका हलकट वाईकर ब्राह्मणाला त्याच्या `राष्ट्रीय’ खटपटीबद्दल जहागिरी बक्षिस दिली, आणि नातूचे परात्पर गुरु रेसिडेंट ओव्हन्स साहेब यांना मुंबई सरकारच्या शिफारसीवरून वार्षिक चारशे पौंडांचा जादा मलीदा सुरू झाला. सख्या थोरल्या भावाच्या सर्वस्व-घाताच्या रक्तांनी माखलेल्या अप्पासाहेब भोसल्याने १८ नोव्हेंबर १८३९ रोजी पणास राज्याभिषेक करून घेतला आणि रात्रौ दीपोत्सव करण्याच्या बाबतीत स्वराज्यद्रोही ब्राह्मणांनी कस्सून मेहनत घेतली. बांधवहो! स्वराज्याच्या अधःपाताचा हा इतिहास मी पणास फारच थोडक्यात सांगितला आहे. हा इतिहास मी लवकरच ग्रंथरूपाने बाहेर काढणार आहे; त्यावेळी स्वराज्यद्रोहाच्या रंगपटावर आणखी शेकडो ब्राह्मण वीर महावीर आणि त्यांची असंख्य अमानुष कारस्थाने आपल्या दृष्टीला पडतील. हा सर्व इतिहास जिवंत राखण्याचे श्रेय एका कायस्थ वीराने मिळविलेले आहे. प्रतापसिंहावर नातू कंपूने अनन्वित किटाळ उभारून त्यांना तुरुंगात टाकल्यानंतर या अन्यायाची दाद पार्लमेंटापर्यंत पोचविण्याकरिता हिंदवी स्वराज्याचे पहिले डेप्युटेशन विलायतेस घेऊन जाणारा सच्चा कायस्थ बच्चा रंगो बापूजी गुप्ते हा होय. याने सतत सोळा वर्षे विलायतेत झगडून न्याय मिळविण्याचा यत्न केला. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणा, की ज्या दादजी नरस प्रभूने आद्य छत्रपति शिवाजी महाराज यांच्याशी स्वराज्यस्थापनेची आणभाक केली, त्याच्याच अस्सल चौथ्या वंशजावर त्याच हिंदवी स्वराज्याच्या भिक्षुकशाहीकडून झालेल्या खुनाचा न्याय मिळविण्यासाठी विलायतेत जाण्याचा प्रसंग यावा हा योगायोग विलक्षण नव्हे काय? असो. रंगो बापूजीची विलायतेची कामगिरी हा एक स्वतंत्र विषय आहे. तो आपल्याला माझ्या पुस्तकातच पहावयाला मिळेल, इतके सांगून मी पुरे करितो. [विजयी मराठा, पुणे जून १९२२] टीप *१ – लुसिअड हे एक कामिअन्स नामक कवीने, हिंदुस्थानातील पोर्तुगिजांची सत्ता, या विषयावर पोर्तुगीज भाषेत लिहलेले महाकाव्य आहे. हे प्रथम १५७१ मध्ये प्रसिद्ध झाले. टीप *२ – ``Committing a literary suicide in their own manuscripts.’’ Isasc Disraeli टीप *३ – शनवार वाड्याची स्थापना कशी झाली याबद्दल एक आख्यायिका आहे. श्रीमंत बाजीराव पेशवे एकदा त्या वाड्याच्या मैदानावरून जात असता तेथे त्यांना एक ससा एका कुत्र्याची पारध करीत असताना दृष्टीस पडला. त्यावरून `आपल्या वाड्याला हीच जागा पसंत’ असे श्रीमंतांनी ठरवून त्या ठिकाणी शनवारचा टोलेजंग वाडा बांधला. परंतु प्रस्तुतच्या देशपरिस्थितीचा सूक्ष्मदृष्टीने विचार केला असता कुत्र्यांच्या मागे ससेच लागलेले दिसत आहेत. टीप *४ – A song for our banner? The watchword recall which gave the Republic her station : ``United we stand – Divided we fall!’’ It made and preserved us a nation! The union of lakes, the union of land, the union of states, none can sever the unioun of hearts – the unioin of hands. And