स्वाध्याय संदेश: Page 72 of 74

बाळाजीपंत नातूच्या डोळ्याचे पारण फिटले. परशुरामाचा वर पूर्ण झाला. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे प्रेत भिक्षुकशाहीच्या तिडीवर चढलेले पाहून रेसिडेंट ओव्हन्सला स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला. आप्पासाहेब भोसल्याचा घरभेदपणा कचकाऊन फळफळला. एक मिनिटाच्या आत सोजिरांच्या पहा-याखाली सत्याग्रही छत्रपतीची पालखी चालू लागली. प्रजाजन भराभर जमा होऊ लागले. मध्यरात्रीची वेळ, तरीसुद्धा सातारचा राजरस्ता नरनारींनी गजबजून गेला. आपला छत्रपति असा उघडा बोडका पकडून नेताना पाहून त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंचे धबधबे वाहू लागले. पण करतात काय? महाराजांची सत्याग्रहाची शपथ अक्षरशः पाळणे जरूर होते. इतक्यात कोणी एकाने धावत धावत येऊन, आपल्या घरातील एक शाल आणून महाराजंच्या अंगावर घातली. सातारच्या ब्राहणेतर प्रजेने छत्रपतींना अखेरचा मुजरा ठोकला आणि क्रिस्टॉल नावाच्या सोजिराच्या आधिपत्याखाली पालखी साता-याच्या हद्दपार झाली. इतक्यात आप्पासाहेब भोसल्याच्या चिथावणीवरून सेनापती बाळासाहेब भोसल्यांना काही सोजिरांनी पकडून धावत धावत छत्रपतीच्या पालखीजवळ नेले व ते सेनापतीचे पार्सल धाडकन त्याच पालखीत फेकून दिले. बाळासाहेबाने ताडकन पालखीच्या बाहेर उडी मारली आणि त्वेषाने म्हणाला, ``खबरदार, ज्या छत्रपतीच्या पायाला स्पर्श करण्याची आजपर्यंत कोणाचीही ताकद झाली नाही, त्यांच्या बरोबरीला बसून छत्रपतीच्य तक्ताची मी अवहेलना करू काय? मी जरी निःशस्त्र असलो तरी अशाही स्थिती मी पाच पन्नासांना लोळवायला कमी करणार नाही हे लक्षात ठेवा.’’ इंग्रजांच्या लोकविश्रुत पॉलिसीप्रमाणे छत्रपतींचा हद्दपारीचा शेवटला मुक्काम कोणालाही कळणे शक्य नव्हते. पहिल्या दिवशी क्रिस्टॉल कंपूने आठ मैलाची मजल मारून निंबगावात मुक्काम केला. त्या ठिकाणी गाई म्हशी बांधण्याच्या गोठ्यात, जेथे शेण आणि मूत्र सर्वत्र पसरलेले आहे, उंदीर, झुरळे, चिलटे, पिसवा वगैरेंचा सुळसुळाट आहे, अशा जागेत छत्रपतींना आणून बसविले. बांधवहो! या वेळची छत्रपतींच्या मनःस्थितीची आपणच कल्पना करावी हे बरे. दुस-या दिवशी मागोमाग महाराजांची राणी, कन्या सौभाग्यवती गोजराबाई वगैरे कबिले येऊन दाखल झाले. गाई म्हशीच्य गोठ्यात हिंदूंचा बादशहा हरामखोर ब्राह्मणांच्या कारस्थानामुळे अस्ताव्यस्त स्थितीत पडलेला पाहून राजवैभवात वाढलेल्या त्या राजस्त्रियांच्या अंतःकरणाची स्थिती काय झाली असेल याची कल्पना करवत नाही! पण कल्पना कशाला? इतिहास काही मेला नाही. राजहत्येबरोबर बाळाजीपंत नातूला भ्रूणहत्येचे पातक कमवायचे होते. त्या पातकाचा फोटोग्राफ इतिहासात उमटलेला आहे. नातूच्या वंशजांनी आणि त्याच्या स्वराज्यद्रोही राष्ट्रीय सांप्रदायिकांनी आपल्या बेचाळीस बापजाद्यांची पुण्याई जरी खर्ची घातली तरी तो ऐतिहासिक पुरावा नष्ट होणे शक्य नाही. आपला प्रियकर बाप, साता-याचा छत्रपति, हिंदी स्वराज्याचा हिंदू बादशहा गाई म्हशीच्या गोठ्यात वस्त्रांशिवाय बसलेला पाहून गोजराबाईने एक भयंकर किंकाळी फोडली व ती बेशुद्ध पडली. बांधवहो! यापुढील प्रकार अत्यंत भयंकर. गोजराबाई आठ महिन्यांची गरोदर होती. बेशुद्ध पडताच तिचा गर्भपात झाला. चहूकडे जंगल, वै-याच्या कैदत माणसे सापडलेली, अशा स्थितीत त्या बिचारीला कसले औषध आणि कसला उपचार! दैवाची खैर, म्हणून बिचारीचा जीव तरी वाचला. येथून मुक्काम हालताच तिकडे बाळाजीपंत नातूचे विचारयंत्र सुरू झाले. या महात्म्याने असा विचार केला की छत्रपतीच्या बरोब बाळासाहेब सेनापती असणे ही मोठी घोडचूक. चिटणीसाला जसा अचानक उचकून फेकून दिला, तशी बाळासाहेब सेनापतीची वासलात लावली पाहिजे. नाही तर हा छत्रपति त्याच्या साहाय्याने एकादे नवीन स्वराज्य देखील निर्माण करायचा! म्हणून बाळाजीपंताने आपला कुळस्वामी ओव्हनसाहेब याच्याकडून सेनापतीला पकडण्याचे वारंट सोडले. वारंटातील मजकूर असा होता की, साता-यात तुम्हाला लाखो रुपयांचे देणे आहे ते फेडल्याशिवाय तुम्हाला साता-याबाहेर जाता येत नाही. हा आरोप बनावट होता हे सांगणे नकोच. तथापि दुस-या मुक्कामावर वारंटाची टोळी येताच सेनापतीने आपल्या व सेवकांच्या अंगावरील उरलेले काही दागदागिने देऊन त्या शिपायांचा काही तरी समजूत करून (कारण हे शिपाई पूर्वी सेनापतीच्या हुकमतीखाली होते व त्यांना ख-या गोष्टी माहीत होत्या.) त्यांना साता-यास परत रवाना केले. मुक्काम दर मुक्काम घोडदौडीची पायी चाल करून वाटेत बाळासाहेब सेनापतीला आमांशाचा रोग जडला व रक्त पडू लागले. म्हणून