स्वाध्याय संदेश: Page 71 of 74

गव्हर्नरच्या तोंडी धमकावणीने प्रतापसिंहाचा प्रताप जेव्हा केसभरसुद्धा डळमळला नाही, तेव्हा इंग्रजी सैन्याच्या हिंमतीवर छत्रपतीला अचानक पकडून हद्दपार करण्याचा बळजबरीचा बेत नातूकंपूने ठरविला. या बेताची कुणकुण महाराजांना लागताच, त्यांनी या जय्यत तयारीला तोंडघशी पाडण्याचा निश्चय केला. त्यांनी विचार केला की, जर मी सर्वस्वी निष्कलंक आहे, तर कंपनी सरकारच्या सशस्त्र प्रतिकाराची मी कशाला पर्वा ठेवू? ज्यांनी आपल्या न्यायबुद्धीचाच खून पाडलेला आहे; सांगलीकर, नातू, किब्यासारख्या राज्यद्रोही हरामखोरांना जहागिरीचा मलीदा चारून माझ्याविरुद्ध उठविलेले आहे, त्यांनी माझ्यावर शस्त्र चालवून माझा घात केला. तर त्यात काय आश्चर्य? ताबडतोब महाराजांनी सेनापती बाळासाहेब राजे भोसले, यांच्याकडून स्वतःच्या सैन्याची कवाईत करविली, आणि आपण स्वतः सैनिकांच्या हातातली सर्व शस्त्रे काढून घेतली. बाळासाहेब सेनापतीच्या कमरेची समशेर काढून घेऊन त्याला निःशस्त्र केले. राजवाड्यातल्या पटांगणातल्या सर्व तोफातील दारू काढून त्या पाण्याने धुऊन रिकाम्या केल्या आणि सर्व सातारा शहरभर निःशस्त्र सत्याग्रहाचा जाहिरनामा पुकारला. प्रजाजनांना आपल्या गळ्याची शपथ घालून महाराजांनी असे विनविले की आज रोजी कंपनीसरकारच्या गो-या सोजिरांनी जरी तुमची घरेदारे लुटली, तरी कोणीही आपला हात वर करता कामा नये. बांधवहो, निःशस्त्र सत्याग्रहाची मोहीम महात्मा गांधींच्याही पूर्वी शंभर वर्षे आपल्या प्रतापसिंह छत्रपतींनी एक वेळ या खुद्द साता-यात आणि तीही अशा काळात की हुं म्हणताच कंपनीच्या साथीदारांची व सैन्याची एकजात कत्तल करण्याची धमक मावळ्यांच्या मनगटात रसरसत होती, अशा स्थितीत शक्य करून दाखविली, हे ऐकून अंतःकरणात कौतुकाचा व अभिमानाच दर्या खळबळणार नाही, ते अंतःकरण मर्द मावळ्याचे नसून कारस्थानी भटाचेच असले पाहिजे. ता. ४ सप्टेंबर १८३९ ची संध्याकाळ झाली. आज बाळाजीपंत नातूच्या कारस्थानामुळे, सातारच्या राजधानीत शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा भर मध्यरात्री मुर्दा पडणार, या कल्पनेने अस्तास जाणारा सूर्यनारायण रक्ताची अश्रु टपटपा गाळीत रक्तबंबाळ होऊन सह्याद्रीच्या शिखराआड नष्ट झाला. स्वराज्यद्रोही आप्पासाहेब भोसला, आणि महाराष्ट्राच्या मानेवर सुरी फिरविणारा कसाब बाळाजीपंत नातू या दोघांच्या अधिपत्याखाली गो-या सोजिरांच्या पलटणी सातारा शहराची सर्व नाकी अडवून उभ्या राहिल्या. रेसिडेंट ओव्हन्स साहेबांची अश्वारूढ स्वारी इकडून तिकडे भरा-या मारू लागली. पण साता-यात त्यावेळी काय होते? जिकडे तिकडे सत्याग्रह! शुद्ध स्मशानशांतता! प्रतिकाराची उलट सलामी छत्रपती देतील, ही नातूची कल्पना फोल ठरली. प्रजाजनांनी आपापली भोजने उरकून यथास्थितपणे निद्रेची तयारी केली. खुद्द छत्रपती भोजनेत्तर आपल्या महालात खुशाल झोपी गेले. निष्कलंक मनोवृत्तीला निद्रादेवी कधीही बिचकत नाही, याचे प्रत्यंतर येथे दिसले. शनिवार वाड्यावर झेंडे फडकविणारे राष्ट्रीय पक्षाचे ब्राह्मण वीर लोकमान्य नातू मध्यरात्रीच्या सुमारास ओव्हन्सच्या कानाला लागले. राजवाड्याला सोजिरांचा गराडा पडला. घरभेद्या आप्पासाहेब पुढे, पाठीमागे रेसिडेंट ओव्हन्स आणि चार पाच गोरे सोजीर, अशी ही चांडाळ चौकडी, आज आपण ज्या राजवाडयासमोर जमलेले आहोत त्या राजवाड्याच्या छातीतला प्राण हरण करण्याकरिता यमदूताप्रमाणे आत घुसली. त्यांनी देवघराचे पावित्र्य पाहिले नाही, त्यांनी झनान्यातील राजस्त्रियांच्या अब्रूकडे पाहिले नाही. ते खाडखाड बूट आपटीत छत्रपतीच्या शयनमंदिराकडे गेले. आप्पासाहेबांनी `हे आमचे दादा’ असे बोच करून दाखविताच त्यावेळचा महाराष्ट्राचा ओडवायर कर्नल ओव्हन्स झटदिशी पलंगाजवळ गेला आणि गाढ निद्रेत घोरत असलेल्या छत्रपतीला त्याने मनगटाला धरून खसकन पलंगावरून खाली ओढले आणि `तुम हमारे साथ चलो’ असे म्हणून तो त्यांना खेचू लागला. सत्याग्रही छत्रपति काहीही प्रतिकार न करिता मुकाट्याने चालू लागले. त्यावेळी ते फक्त एक मांडचोळणा नेसलेले होते. त्याशिवाय अंगावर दुसरे काहीही वस्त्र नव्हते. छत्रपतींची अशी उघड्याबोडक्या स्थिती उचलबांगडी झालेली पाहून झनानखान्यात हलकल्लोळ उडाला. चाकर माणसे भयभीत होऊन हातात दिवट्या घेऊन सैरावैरा धावपळ करू लागली. एकच आकांत उडाला. सर्व लोक निःशस्त्र, त्यातच खुद्द छत्रपतींची सत्याग्रहाची शपथ, यामुळे कोणाचाच काही उपाय चालेना. महाराजांच्या दंडाला धरून ओव्हन्सने त्यांना राजवाड्याबाहेर आणले, आणि तयार असलेल्या पालखीत त्यांना कोंबले. जवळच उभे असलेल्या