स्वाध्याय संदेश: Page 70 of 74

have a Brahmanical object to carry. Everything which is likely to promote their views, however unprincipled, is then resorted to, for they think that, in such a cause the end hollows the means…… I believe among his many enemies, His Highness considers the Brahmin tribe as the nost numerous, virulent and influential. I may state that, upon political grounds, there exists mush jealousy and ill will on the part of that race to his Highness, merely because his restoration to the possession of that small share of power and importance which he now enjoys, results from the political overthrow of the Brahmin power. (भावार्थ – राजाचे आणि ब्राह्मण लोकांचे भयंकर हाडवैर होते. विशेषतः त्याचे मूळ धर्मविषयक तंट्यांत असल्यामुळे तर भिक्षुकशाही त्याच्यावर जळजळीत आग पाखडीत असे. मी असे स्पष्ट म्हणतो की, या भटांना एकादी भटी कावा साधायचा असला म्हणजे ते काय काय अत्याचार व भानगडी करतील याचा नेमच नाही. त्यांचे बेत साधण्यासाठी करू नये त्या गोष्टीसुद्धा करायला ते मागेपुढे पाहत नाहीत; कारण त्यांना पक्के माहित असते की हेतू साध्य झाला की साधनांच्या बरेवाईटपणाची चौकशी होते कसली?...... राजाच्या दुष्मानांत ब्राह्मणांचा नंबर अगदी पहिला. शिवाय ते बरेच असून जितके ते राक्षसी व दुष्ट आहेत. तितकेच वजनदारही आहेत. राजकारणाच्या बाबतीतसुद्धा ब्राह्मणांचा द्वेष कमी भयंकर नाही. त्या दृष्टीने तर ब्राह्मण लोकांच्या डोळ्यात तो रात्रंदिवस सलत असतो. याचे कारण काय, तर पेशव्यांची ब्राह्मणी राज्यसत्ता नष्ट झाली व या राजाची थोडीबहुत राज्यसत्ता जिवंत राहिली, हेच) सन १८४० सालचे हे उद्गार चालू घटकेलासुद्धा पुण्याची राष्ट्रीय भिक्षुकशाही व कोल्हापूरचे श्री शाहू छत्रपति यांच्या झगड्यात किती सापेक्ष रीतीने सिद्ध होत आहेत, याचा आपणच नीट विचार करा.या हिंदुस्थानात मराठ्यांचे किंवा एखाद्य ब्राह्मणेतरांचे एकही राज्य कोठे शिल्लक राहू नये, जिकडे तिकडे सारी भटभिक्षुकशाही माजावी, ब्राह्मणेतरांवर ब्राह्मणांची सनातन कुरघोडी असावी, यासाठी या राष्ट्रीय गुंडांची केवढी धडपड चाललेली असते, हे जर आपण जरा लक्षपूर्वक विचारत घ्याल, तर राष्ट्रीयांच्या स्वराज्याच्या गप्पा म्हणजे ब्राह्मणभोजनाच्या खरकट्या पत्रावळी असे जे मी म्हणतो, त्याचा तुम्हाला तेव्हाच उलगडा होईल. तागडीच्या जोरावर सबंध हिंदुस्थानभर तंगड्या पसरणा-या कंपनी सरकारालासुद्धा छत्रपतीसारखा पाणीदार राजा व त्याचे संस्थान शिल्लक ठेवणे जिवावरच आले होते. तशात स्वदेशातलेच ब्राह्मण लोक जर एकमुखाने स्वदेशी राजाला जिवंत गाडण्याची चळवळ करीत आहेत, तर त्या चळवळीचा फायदा घेऊन परस्पर पावणे तेरा या न्यायाने नातूकंपूने शिजविलेल्या बनावट राजद्रोहाच्या हांडीने छत्रपतीचा कपाळमोक्ष होत असल्यास कंपनी सरकारला ते हवेच होते. म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी नातू कंपूने कंपनी सरकारला व कंपनी सरकारने नातकंपूला परस्पर मिठ्या मारण्यात व्यभिचारी राजकारणाचे बेमालूम डावपेच दोघेही खेळले, हाच इतिहासाचा पुरावा आहे. असो. कंपनीसरकार आपले काही ऐकत नाही, न्यायाचा प्रश्नसुद्धा ते विचारात घेत नाही, उलट हरामखोर ब्राह्मणांच्या पूर्ण पचनी पडून पदभ्रष्ट करण्याच्या धमक्या देत आहेत, अशा परिस्थितीत केवळ सत्यावर भरवसा ठेवू, परमेश्वरी इच्छेच्या हातात आपल्या दैवाचा झोला सोडून, प्रतापसिंहाने निःशस्त्र सत्याग्रह करण्याचे ठरविले. कंपनी सरकारच्या सैन्यबळापुढे छत्रपतीचे सैन्यबळ जरी काहीच नव्हते, तरी छत्रपतीच्या तक्तासाठी रक्ताचा थेंब न् थेंब खर्ची घालणारे मावळे-मराठे व ब्राह्मणेतर लोक वेळ पडल्यास मधमाशीच्या झुंडीप्रमाणे भराभर बाहेर पडण्यास कमी करणार नाहीत, याची जाणीव कंपनी सरकारला होती. नातूनेसुद्धा छत्रपतीचे उच्चाटन करण्यासाठी इंग्रजी सैन्याची जय्यत तयारी करण्याचा मंत्र रेसिडेंट ओव्हन्सच्या कानात फुंकला होता. आणि त्याप्रमाणे तोफखाना, घोडेस्वार यांसह ग्रेनेडिअरची पंचविसावी पलटण ३१ ऑगस्ट १८३९ रोजी पुण्याहून निघून ४ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता साता-यास येऊन थडकली, ग्रामण्याच्या तंत्रमंत्राने, राजकारणाच्या कागदी बुजगावण्याने किंवा, मुंबईच्या