स्वाध्याय संदेश: Page 69 of 74

करण्याचे त्यांनी ठरविले. ता २२ ऑगस्ट १८३९ रोजी मुंबईचे गव्हरनर सर जेम्स कारनॅक आपल्या लवाजम्यानिशी नातूकंपूने शिजवून ठेवलेली गुप्त कटाची हांडी फोडण्यासाठी साता-यास येऊन दाखल झाले. महाराजांना निमंत्रण जाताच दुपारी तीन वाजता ते त्यांच्या भेटीस गेले. त्यावेळी त्यांचे झालेले संभाषण सारांशाने असे होते. – सर जेम्स :- तुम्ही आमच्या विरुद्ध गुप्त कट चालविलेला आहे, आणि त्याचा सर्व पुरावा माझ्यापाशी आहे. महाराज :- काय? आपल्याविरुद्ध मी गुप्त कट केला आहे? अगदी बनावट गोष्ट! आपण या बाबतीत वाटेल तर माझी उघड चौकशी खुशाल करावी. सर जेम्स :- त्यात काय चौकशी करायची. ख-या गोष्टी मला सर्व माहीत आहेत. याउपर चौकशीची यातायात करण्याची आम्हाला जरूर नाही. आता आपल्या एकच मार्ग मोकळा आहे, आणि तो हाच की, मी सांगतो या जबानीपत्रकावर आपण मुकाट्याने सही करावी. घासाघीस करायला मला वेळ नाही. महाराज :- आपल्याला वेळ नसेल तर मी सर्व कागदपत्र ओव्हन्स साहेबाला दाखवून त्यांची खात्री पटवून देईन. माझ्यावरील किटाळाचा समतोल बुद्धीने उघड न्याय व्हावा हीच माझी इच्छा आहे. कंपनी सरकारशी दुजाभावाने मी कधीही वागलो नाही. इंग्रज सरकारच्या मैत्रीसाठी मी विहिरात उडी घ्यायलाही कमी करणार नाही. परंतु माझ्या कल्पनेतही कधी न आलेल्या ज्या घाणेरड्या गोष्टी केल्याचा आरोप माझ्यावर आलेला आहे, त्याबद्दल माझा प्राण गेला तरी मी कबुलीजबाब देणार नाही. सत्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर! सर जेम्स :- महाराज, मी काय म्हणतो ते मुकाट्याने करा. त्यात तुमचा फायदा आहे. नाहीतर तुमचे राज्य राहणार नाही हे लक्षात ठेवा. महाराज :- मी राज्याची कधीच अपेक्षा केलेली नाही. इंग्रज सरकारच्या दोस्तीचा मात्र मी चाहता आहे. परंतु बिनचौकशीने घाणेरडे बनावट आरोप कबूल करून या राज्यावर राहण्याची माझी मुळीच इच्छा नाही. तुमची इच्छा असेल, तर माझे राज्याधिकार आताच घ्या, मी खुशाल भीक मागून आपले पोट भरीन. माझ्या चिटणिसाप्रमाणे मला उचलून तुरुंगात टाकावयाचे असेल, तर खुशाल टाका. तुमच्या संत्रीच्या देखरेखीखाली मी भिक्षा मागून राहीन, आता मी आपल्या बंगल्यावरच आहे. मी येथून घरी परतच जात नाही, म्हणजे झाले! सर जेम्स :- असे करू नका. मी सांगतो याप्रमाणे या कागदावर मुकाट्याने सही करून मोकळे व्हा. नाहीतर मला निराळीच तजवीज करावी लागेल, महाराज :- तुम्हाला काय वाटेल ती तजवीज करा. ज्या गोष्टी मी केल्या नाहीत, त्या केल्या म्हणून आपल्याला लेखी जबानी देऊ काय? ही गोष्ट प्राणांतीही होणार नाही. प्रतापसिंह महाराजांच्या या सत्यप्रिय आणि बाणेदार वर्तनाचे स्पष्टीकरण करताना त्यावेळी पार्लमेंटपुढे व्याख्यान देताना मेजर जनरल रॉबर्टसननी जे उद्गार काढले तेच मी आपणास सांगतो. ते म्हणाले, The conduct of the Raja of Satara would do honour to the best days of ancient Rome, and is, in my opinion, in itselt a sufficient refutation of all that has been urged against him. (भावार्थ – प्राचीन रोमन साम्राज्याचा नैतिक सुवर्णयुगाला साजेशोभेसे वर्तन महाराजांनी केले व त्यांच्या सत्याग्रही तडफीतच त्यांच्याविरुद्ध रचलेल्या बनावट किटाळांचा फोलकटपणा सिद्ध होत आहे.) महाराजांविषयी भिक्षुकशाहीच्या ज्वलज्जहाल द्वेषाची परिस्फुटता करताना रॉबर्टसननी काढलेले उद्गार चालू घटकेलासुद्धा विचार करण्यासारखे आहेत. राष्ट्रीय गुंडांच्या स्वराज्यपुराणांच्या चालू धामधुमीत ते उद्गार तुम्ही नीट मनन करा. The Rajah had many reekless and influential enemies, and particulary that he had incurred the enmity of the Brahmins, and as it was on religious grounds that their enmity was founded, their hostility partook of all that deadly hatred which is so often mixed up in polemical disputes. I may add also, that there are no persons so unscrupulous as Brahmins when they