स्वाध्याय संदेश: Page 68 of 74

थत्ते यांच्या अर्ध्वयुत्वाखाली ब्राह्मणेतरांना, विशेषतः मराठ्यांना व कायस्थ प्रभूंना `शूद्राधम चांडाळ’ ठरविणारे (अ)धार्मिक ग्रंथ लिहून प्रसिद्ध करण्याची एक मोठी गिरणीच सांगलीला काढली. छत्रपतीकडून होणा-या ब्राह्मणांवरील अत्याचारांच्या बनावट हकीकती जिकडे तिकडे बेसुमार पसरविण्याच्यe कामगिरीने त्यावेळच्या ब्राह्मण स्वयंसेवकांनी अद्भूत `राष्ट्रीय’ कामगिरी बजावली. विशेष चीड येण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्याशिवाजी महाराजांनी या कृतघ्न ब्राह्मणांच्या बापजाद्यांची जानवेशेंडी रक्षण केली, त्याच शिवाजीचा अस्सल वंशज प्रतापसिंह छत्रपति हा `हिंदूच नव्हे, हा हिंदु धर्माचा वैरी आहे,‘ अशा अर्थाचे मोठमोठे जाहीरनामे चिंतामणराव सांगलीकराने शहरोशहरी व खेडोखेडी सर्व हिंदुस्थानभर फडकविण्यात बिलकूल कमतरता केली नाही! इतके झाले तरी नातूकंपूच्या मार्गात एक मोठा काटा अजून शिल्लकच होता, आणि तो मात्र कसल्याही लाचलुचपतीला बळी न पडण्याइतका भक्कम व सडेतोड होता. तो कोण म्हणाल, तर ज्याला आद्य छत्रपति शिवाजी महाराज `बाळाजी माझा प्राण आहे’ असे म्हणत असत, त्या बाळप्रभू चिटणिसाचा अस्सल वंशज बळवंतराव मल्हार चिटणीस हा होय. बळवंतराव जर आपल्या चिटणीशीवर चुकूनमाकून कायम राहता, तर त्याच्या चिटणीशी लेखणीच्या घोड्यांनी नातूकंपूच्या घरादारांवर गाढवांचे नांगर फिरविले असते! परंतु चित्पावनी काव्याची पोच जबरदस्त! बळवंतरावांचा पराक्रम नातू जाणून होता. चिटणीस कायम असेपर्यंत छत्रपतीचा रोमही वाकडा होणार नाही, ही त्याची पुरी खात्री होती. चिटणीशी लेखणीपुढे परशुरामाच्या वरप्रसादाची पुण्याई वांझोटी ठरणार हा अनुभव त्याच्या डोळ्यांपुढे होता. म्हणून हा चिटणीशी कांटा उपटण्यासाठी नातूने कर्नल ओवन्सकडून बळवंतराव चिटणिसाला एकाकी अचानक पकडून बिनचौकशीचे पुण्याच्या तुरुंगात फेकून दिले. बिनचौकशीने अटक करण्याच्या ब्रिटिश नोकरशाहीच्या पद्धतीविरुद्ध `अन्याय’ `अन्याय’ म्हणून कोलाहल करणा-या राष्ट्रीयांनी आपल्या संप्रदायाच्या पूर्वजांचे हे हलकट कृत्य विचारात घेण्यासारखे आहे. चिटणीसाचा काटा अशा रीतीने उपटल्यावर नातूचा मार्ग बिनधोक झाला. छत्रपतीच्या राजवाड्यातील अनेक प्रामाणिक नोकरांना पकडून, लाच देऊन, मारहाण करून नानाप्रकारचे खोटे दस्तऐवज पुरावे तयार केले, व रेसिडेंटापुढे खोट्या जबान्या देवविल्या. काही नातूच्या कारस्थानास बळी पडले व काही स्वामिनिष्ठेला स्मरून आनंदाने तुरुंगात खितपत पडले. बाळकोबा केळकर या कुबुद्धिमान गृहस्थाने बनावट सह्या शिक्के बनविण्याचे राष्ट्रीय कार्य हाती घेतले. प्रतापसिंह छत्रपति हा ब्राह्मणांचा भयंकर छळ करतो, या नाटकाची उठावणी चिंतामणरावाने आपलेकडे घेतली होती आणि या कामी त्यांनी शंकराचार्याच्या नरडीवरसुद्धा गुडघा देऊन खोटी आज्ञापत्रे बळजबरीने लिहून घेण्यास कमी केले नाही. राजकारणाच्या बाबतीत छत्रपतीच्या गळ्यात कंपनीसरकारविरुद्ध गुप्तकटाची राजद्रोहाची घोरपड लटकविण्याचे पुण्य कार्य मात्र खुद्द महात्मा नातूनी आपल्या हाती ठेवले होते. या कामी बनावट राजद्रोही पत्रे, खलिते, अर्ज्या या निर्माण करण्याच्या कामी हैबतराव व आत्माराम लक्ष्मण उर्फ अप्पा शिंदकर या दोघा ब्राह्मणेतर पात्रांना हाती धरून बाळाजी काशी किबे आपल्या कल्पनकतेची कसोशी करीत होता. अखेर नातू कंपूचे सर्व कारस्थान शिजून तयार झाले. गोव्याच्या पोर्जुगीज सरकारकडे प्रतापसिंहाने गुप्त संधान बांधून त्यांच्या मदतीने इंग्रजांना हुसकून देण्याच्य बनावट कटाबद्दल कंपनी सरकारच्या गव्हर्नराची `वेदोक्त’ खात्री पटली. ब्राह्मणांच्या छळाविषयी कंपनीसरकारने जरी कानावर हात ठेविले – कारण धार्मिक, सामाजिक बाबतीत तोंड न बुचकळण्याचा त्यांचा निश्चय जगजाहीरच – तरी पण छत्रपतीविरुद्ध स्वराज्यद्रोहाचा आरोप बळकट करण्याच्या कामी चिंतामणरावांचा राष्ट्रीय शंखध्वनी अगदीच काही फुकट गेला नाही. प्रतापसिंहास या सर्व गोष्टी कळत नव्हत्या, अशातली गोष्ट नव्हती. परंतु त्या वेळी घरभेदेपणा अतोनात माजल्यामुळे, आणि नातूच्या राष्ट्रीय पक्षाकडूनफंदफितुरीचा भयंकर सुळसुळाट झाल्यामुळे महाराजांच्या आत्मविश्वाने कच खाल्यास त्यात नवल ते काय? तथापि, काय वाटेल ते होवो आपण जर कोणाचे वाईट करीत नाही, सत्य मार्गाने जात आहोत आणि कंपनी सरकारशी कोणत्याही प्रकारे दुजाभावाने वागत नाही, तर माझे कोण काय वाकडे करणार? अशा प्रामाणिक समजुतीवर महाराजांनी नातुकंपूच्या वावटळीस तोंड देण्याचा निश्चय केला. चिटणिसाची अचानक उचलबांगडी झाल्यामुळे त्यांचा धीर बराच खचला. सरतेशेवटी दैवावर हवाला ठेवून सत्यासाठी येतील ती संकटे निमूटपणे सहन