स्वाध्याय संदेश: Page 4 of 74

अर्थहानि न होता किंवा द्विरुक्तीचा दोष न येता सहज अनुप्रास साधल्यास तो आनंददायी होतो ही गोष्ट खरी आहे, पण कृत्रिमता व पुनरुक्ति दोष व अर्थहानि हे दोष ललित वाङ्मयात न येण्याची खबरदारी लेखकाने घेतली पाहिजे. रा. ठाकरे यांची भाषापद्धती ओजस्वी आहे, त्यांच्या भाषेचा ओघ अमोघ आहे; त्यांत चमत्कृतीही पुष्कळ आहे व वर निर्दिष्ट केलेले दोष होऊ न देण्याची खबरदारी रा. ठाकरे घेतील, तर त्यांचे लेख जास्त सरस व जास्त परिणामकारक होतील यांत शंका नाही. असे जास्त सरस व जास्त परिणामकारक वाङ्मयात्मक लेख रा. ठाकरे यांच्या लेखणीतून उतरोत व त्यांच्या स्वाध्यायसंदेशाचा ध्वनि सर्व महाराष्ट्रभर दुमदुमत राहो, अशी इच्छा करून ही घाईघाईने लिहिलेली प्रस्तावना पुरी करतो. विलिंग्डन कॉलेज, सांगली ता. १४ जानेवारी १९२३ गोविंद चिमणाजी भाटे 000 स्वाध्याय – संदेश अनुक्रमणिका पृष्ठ १ कृष्णं वन्दे जगद्गुरुम् । १ २ बरोबर २९३ वर्षांपूर्वी! ९ ३ बुद्धदेवाची कामगिरी १३ ४ शिवरायास आठवावे २० ५ प्रेस आक्टाची पूर्वपीठिका २८ ६ लोकसंग्रह आणि राजकारण ४४ ७ पावनखिंडीचा संदेश ५३ ८ फोनोग्राफचे व्याख्यान ५७ ९ ऋग्वेदकाळचे हिंदू ६१ १० आई ६७ ११ उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ७१ १२ मुके गुरू ७५ १३ धन्य पार्वतीबाई धन्य ८१ १४ अटकेला फडकलेला भगवा झेंडा ८४ १५ उत्तिष्ठत जाग्रत! उठा, जागे व्हा!! ९१ १६ चिरंजीव कोण? ९५ १७ शिवराया प्रणिपात कराया ब्रिटानिया आली ९८ १८ कल्पनाशक्ति १०५ १९ दिग्विजयासाठी सीमोल्लंघन केलेच पाहिजे १०६ २० सर्वसमर्थ कोण? ११३ २१ सत्ता, सत्ताधीश व सत्ताधीन ११९ २२ नाना शंकरशेट १२३ २३ हिंदवी स्वराज्याचा खून (व्याख्यान) १२७ 0000 कृष्णं वन्दे जगद्गुरुम् आज गोकुळात आनंदीआनंद चालू आहे. संसारचक्रात रात्रंदिवस सुरू असलेल्या आधिव्याधींना दूर लोटून, एक दोन घटकाच का होईना, आबालवृद्ध हिंदुधर्मी नरनारीजन जय कृष्ण कृष्ण जय, जय कृष्ण कृष्ण जय या पुण्य नामस्मरणात तल्लीन झाले आहेत. आजचा आनंद निर्व्याज. सूर्योदयाबरोबर अमरणा-या कमळाप्रमाणे शुद्ध, सात्विक आणि प्रत्येक मनाची कळी विकसित करणारा हा आनंद बिनतोड आहे. शेकडो शतकांच्या पूर्वी भारतीय इतिहासाच्या पृष्ठाला भाग्यवान करणारी ती श्रीकृष्णजयंती, जणू काय अगदी आजच पहिल्यांदा साजरी हत आहे, अशा कल्पनेचा भडक भाविक रंग आजच्य आनंदात भरपूर मिसळल्यामुळे तर त्याची गोडी गोडपणातच अमृताशी खात्रीने स्पर्धा करील. आज कोठेही कान द्या, तेथून कृष्ण भगवंताच्या पुण्य नामसंकीर्तनाच्या मुरलीचा मधुर ध्वन ऐकू येईल. आज कोठेही दृष्टी फेका, त्या पूर्णावतार परमात्म्याचा जयंत्युत्सव लहान मोठ्या प्रमाणावर साजरा होत असल्याच डोळ्यांना दिसेल. आसेतुहिमाचल एकूण एक हिंदू देवमंदिरांत `गोविंद घ्या हो, गोपाळ घ्या हो’ या विशुद्धतम प्रेमाच्यादहगीकाल्याची आग्रहाची देवघेव अहमहमिकेने चालू आहे. शेकडो शतकांपूर्वी श्रीकृष्णाने केलेल्या-केल्या असे सांगितलेल्या-बालक्रीडांच्या नकरला कोठे वठविल्या जात आहेत; तर कोठे दहीहंडी फोडून त्याखाली लहान लहान मुले `गोविंदा गोविंदा’ कल्लोळात अनुपमेय हर्षाच्या लहरींवर बेभान नाचत आहेत. रास्क्रीडेची हुबेहूब नक्कल वठवायला गोपींची मोठी अडचण; पण, काही पुरुषांनाच तात्पुरत्या गोपी मानून, त्यांच्याबरोबर दहा किंवा एकवीस पदरी गोफ टिप-यांच्या ठेक्यावर विणण्यासाठी कोठे काही नर्तनकुशल बंधू आपल्या लवचिक अंगाच्या वळणदार घडीची कसरत दाखवून प्रेक्षकांना थक्क करीत आहेत; तर कोठे मल्लविद्याविशारद तरुण जवान स्वतःला श्रीकृष्णाचे खास सवंगडी समजून, आडाखेबाज कुस्त्यांच्या पेचांनी आपापल्या आखाड्याचे नाव राखण्यासाठी हमरीतुमरीच्या दंगलीत दंग झाले आहेत. ठिकठिकाणी कृष्णजन्माच्या इतिहासाचे आख्यान लावून, त्यावर गानाभिनयकुशल हरिदास साग्रसंगीत कथेचे व्याख्यान करीत हेत. आज प्रत्यक्ष आपल्या दृष्टीसमोर श्रीकृष्ण भगवंताचा जन्म झाला आहे, त्याला हरिदास आता मंगलस्नान घालतील, काजळ तीट उटी लावतील. बाललेणे चढवतील, मग पाळण्यात घालून त्याला झोके देतील, या सर्व गोष्टी आता आपण पाहून, त्या पाळण्याच्या झोक्याबरोबरच आनंदाच्या डोल्हा-यांत क्षणभर आपल्या आत्मारामालाही