टाकलेलं पोर: Page 40 of 40

शिर करि पदीं या ।। हिरडा : प्रणय फुलां । गुंफुंनिया । तुला वाही सजणे सदा ।।१।। [---मानकर] पान १६७, ओळ २, कुंती :- ‘म्हणून कां माझा राजहंस’ [‘माझ्यावर रागावला आहे’ यानंतर---] कुणा कळावा । कुणा दिसावा । मम हृदयीचा बाळ विसावा ।।१।। अनुढा माता । ठरते पतिता । समाजबंधनीं । तिज ना त्राता । मातृस्तनी या फुटला पान्हा । कुठले कौतुक । त्यजिला तान्हा ।।२।। [---मानकर] [पान १७४, हिरडा -- ‘पागलपणाकडं पाहून हासत आहेत’ नंतर---] हास जरा वा नाच जरा । शीळ जरा लल्कार । हलका कर हासून पुरा । जगण्याचा जडभार ।। हसणारा हसविल दुनिया । रडणारा रडवील दुक्खावरतीं पसरिल छाया । हसणारे सत्शील ।। श्रम थोडे वेतन थोडें । बाकीच्या संतोष ।। रम्यतेंत कर मन वेडे । त्यांतच हो बेहोष ।। असतां असतां हासच अथवा । हसता हसता डोल । आनंदाचा असला ठेवा । हें जगण्याचे मोल ।। [कवि ‘आनंद’ चिपळूण] [पान १७६, ओळ १७, हिरडा --- ‘खरी खुमारी असते’ नंतर ---] हिरडा :-- जगीं मोहवाया । सुरा दे विधाता । सुखा या सुधारा ।।धृ.।। सुरासुरां प्रिय ही मदिरा । मधुरस खुलवित । झुलवित मम मन ।।१।। [---मानकर] अथवा हे पद. [चाल – जो पिया आया.] मधुर वारुणी । स्वर्ग-सौख्यास देइं नराप्राशनीं । जाया युवा जैं प्रिया ही जनीं ।।धृ.।। निधी-मंथनीचे अमृत त्या शक्ति नसे ।। सुरा मुक्ति तरां देइं करा श्री भासे । तरुणि-नयना हिची उपमा । कवि-कल्पना देतसे जनीं ।।१।। [ठाकरे]