शिवाजीचा वनवास : Page 2 of 4

तत्कालीन घडामोडीची संगती जुळते.’ असे ठणठणीत विधान केले आहे. शिवाजीचाच पिण्ड असा बंडखोर का बनला? घाटमाथ्यावरच्या एकूणेक समशेर बहाद्दर पराक्रमी मराठे सरदारांची, अगदी शिवाजीचा बाप शहाजीपर्यंत, कर्तबगारीची एक परंपराच ठरून गेली होती. पांच सुलतानशहांपैकी जो कोणी यांना सन्मानाने पाचारण करील, त्याच्यासाठी हे आपल्या मुत्सदेगिरीचा, समशेर बहाद्दरीचा नि निष्ठेचा फुलवरा मनसोक्त उधळायला एका पायावर तयार.

यांच्या निष्ठासुद्धा वारांगनेसारख्या चवचाल. एका शाहीत जुगैल जमले नाही का चालले जुगैल जमेल त्या शाहीकडे. त्यांनी आपल्या पराक्रमांच्या घाऊक नि किरकोळ विक्रीच्या वखारीच उघडल्या होत्या म्हणा ना. पण या सर्व लहानमोठ्या शाह्या आपण मराठे सरदारांच्याच पराक्रमावर गाजत वाजत आहेत. तर आपण सगळे मराठे सरदार ऐकजीव एकवटलो, तर आपल्या एकजूट हलकल्लोळाने उभ्या दक्खनमधून इस्लामी सत्तेचे बुजगावणे कायमचे निपटता येऊन, येथे आपली जबरदस्त हिंदवी सत्ता प्रस्थापित करता येणार नाही काय? असला विचार एकाच्याही मनाला चुकून चाटून गेला नाही. मग एकट्या शिवाजीचाच पिण्ड प्रतिकाराच्या हिरिरीने अचानक भडकला का? या कां मध्येच शिवाजीचे सारे शिवाजीपण ठासून धुमसत होते. एकाही प्रज्ञावंत इतिहास संशोधकाने त्या कां चा शोध घेण्याचा यत्न केला नाही. ते आपल्याअसायचा. कल्पना विलासातच मग्न ! बरे बखरकारांकडे पहावे, तो ते सगळे शिवराज्याभिषेकाची थोरवी गाणारे. उगवत्या सूर्याला अर्घ्य प्रदान करणारे! अशी होती शिवनेरीची अवस्था जिजाबाईने शिवनेरी दुर्गात आश्रय घेतला. त्यापूर्वीचा इतिहास सर्वश्रुत आहे. जे काही थोडेबहुत निष्ठावंत सेवक बरोबर होते, ते किल्ल्याच्या अर्धवट उद्ध्वस्त बुरुजांचे संरक्षण करीत होते. किल्ल्याच्या तटापलिकडे वैराण नि उदास जंगल पसरलेले. गडावर पाण्याची सोय नाही. भल्या पहाटे, अतिशय जपून तटाचे दरवाजे उघडून, किल्ल्यातल्या स्त्रिया जवळच्या झऱ्यातले पाणी आणायला एका रांगेने निघत. किल्ल्याभोवतालच्या उजाड प्रदेशांत जंगली क्रूर जनावरांचा संचार सारखा चालू जगदंबा शिवाईच्या छोटेखानी भक्कम बांधणीच्या मंदिराशिवाय गडावर एकही इमारत नव्हती. या इमारतीच्या पायांच्या निशाण्याही आज तेथे नाहीत. म्हणजे, तेथल्या वस्तीसाठी जिजाबाईला झोपडपट्टी बांधल्याशिवाय रहायला जागाच मिळणे अशक्य होते. अरण्यातील अशा या एकाकी प्रदेशात जिजाबाईला राहण प्राप्त होते. आपले पूर्ववैभव आणि आलेली परिस्थिती यांची तुलना तिच्या मनाला काय क्लेश देत असेल, याची कल्पनाच करावी. कुठे तिच्या वडिलांचा सर्व सुखसोयींनी सजलेला असा महाल आणि कुठे तिची सध्याची दरिद्री झोपडी! कुठे ते अमर्याद वैभव आणि कुठे हे गडाच्या बुरुजांच्या आतले ठाणबंदी झोपडपट्टीचे बंदिस्त जीवन.

गडाच्या तटापासून फार दूरवर जाण्यातही अनेक धोके, जंगली श्वापदांच्या अनिरुद्ध संचाराबरोबरच, मोगली सैन्याच्या लुटारू टोळ्यांचा धुमाकूळ अखंड चालू. शहाजी तर निसटला, पण त्याची बायको कुठे लपून राहिली आहे, याचाही शोध मोगली टोळकी सारखी घेत असायची. अशा सर्वस्वी विपन्न अवस्थेत दि. ६ एप्रिल सन १६२७ रोजी शिवनेरीच्या झोपडीत शिवाजीचा जन्म झाला. हाती असलेल्या तुटपुंज्या साहित्याने माता जिजाईने त्याचे सारे विधी पार पाडले. शिवजन्माची बातमी शिवनेरीच्या तटाबाहेर कोणालाही कळली नाही. गडावरल्या एकूणेक स्त्री-पुरुषांनी गुप्तता राखण्याची मनस्वी शिकस्त केली. अखेर गुप्ततेचा फुगा फुटला तब्बल सहा वर्षे जिजामातेने बालशिवाजीला काळजाचा पाळणा करून, शिवनेरीच्या झोपडपट्टीत सांभाळला. तेवढ्या काळात तिने त्याला आपल्या परिस्थितीच्या विलक्षण बदलाबद्दल अनेक गोष्टी सांगून, त्याचे मन चांगलेच तयार केले असावे. आधीच मोगल अधिकारी त्या मायलेकाला घालीन पृथ्वी पालथीच्या हिरिरीने शोधीतच होते. तशात आता तर ती दोघे नक्की शिवनेरीवरच्या झोपडीत असल्याची बातमी मिळताच, मग हो काय, मोगलाचा एक अधिकारी, म्हालदारखान निवडक शिवायी बरोबर घेऊन मायलेकांना पकडण्यासाठी शिवनेरीवर येऊन थडकला. जिजाबाईने भविष्याची बिनचूक अटकळ बांधून, सगळी व्यवस्था आधीच लावली होती. म्हालदारखान सभ्य नि समजूतदारपणे वागत होता. जिजाबाई त्याच्याशी वादविवाद घालीत होती. चांगला तास-दीडतास गेल्याव, तिला ठरावीक खुणेचा इशारा मिळाला आणि ती मोगलाबरोबर जायला निघाली. तिला सन्मानाने पालखीत बसवून मोगल अधिकारी त्र्यंबकेश्वराकडे