शिव – जन्म – तिथीचा वाद: Page 9 of 23

व बाळाजी आवजीवरील इतराजीचा उल्लेख ज्याअर्थी यांत नाही त्या अर्थी ही बखर दत्ताजीपंत वाकेनविसाने सन १६८० च्या एप्रिल नंतर व सन १६८१ च्या मेच्या पूर्वी केव्हातरी लिहिली व वेळोवेळी त्यात भर पडली असावी, असे ठरते. या प्रमाणांविरुद्ध तुमचे काय म्हणणे असेल ते सांगा! ‘शिवछत्रपतीची एक्याण्णव कलमी बखर’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत [पृष्ठ १९] या संबंधीचे विवेचन आहे. वि. स. वा. राजवाडे - हा एकंदर विचार करूनच या एक्याण्णव कलमी बखरीत दिलेली शिवजन्मतिथी मी विश्वसनीय धरली आहे. करंदीकर – शके १५४९ ला क्षय संवत्सर येत नसून प्रभव येतो, ही मोठीच हरकत आहे. गद्रे - बखरीमधील कालाच्या उल्लेखात शके, संवत्सर, तिथी, वार, यांचा मेळ नाही असे म्हणता पण ते खरे नव्हे. द्वीतीयाच असून नकलकाराने पंचमी केली असावी. क्षय-प्रभव हा तर मुळीच भेद नाही.

गत-वर्तमान यांपैकी कोणता तरी एक संवत्सर देण्याची वहिवट फार प्राचीन आहे. आता वारासंबंधाने जो फरक आहे त्याला कारण असे आहे की सायन-निरयण वाद आजचा नसून त्याचा उगम शिवकालापर्यंत जातो. आज छापण्याची कला असूनही अनेक पंचांग प्रचलित आहेत त्यामुळे निरनिराळे तिथी वार व अधिक मास आलेले आपण पाहतच आहोत. अशीच स्थिती शिवकालीही होती. छापण्याचे साधन तेव्हा नसल्याने कोणी एकाने पंचांग तयार करावे व त्यावरून लोकांनी तिथिवारांची माहिती मिळवावी, असा प्रघात असे. त्यामुळे निरनिराळ्या गावची निरनिराळी पंचांगे असत व तिथिवारांतही साहजिकच फरक पडत असे. त्यामुळए आज आपण थोडेसे घोटाळ्यात पडतो. पण पूर्ण विचारांअंती ते तिथिवार अविश्वसनीय आहेत असे म्हणता येणार नाही. वाकसकर – शिवजन्म शके १५४९ च्या वैशाखात झाला, असे सांगणाऱ्या दहा पंधरा बखरी हेत. या बखरीत प्रतिपदा, द्वीतीया, तृतीया, पंचमी, पौर्णिमा अशा भिन्न तिथी दिलेल्या आहेत, यावरूनच हे स्पष्ट सिद्ध होते की, या बखरी एकमेकींच्या नकला नसून स्वतंत्रपणे पृथक् पृथक् लेखकांनी लिहिलेल्या आहेत, आणि जेधे शकावली, देशपांडे शकावली, फोर्ब्स कलेक्शन, गदाधर प्रल्हाद शकावलवी, या सगळ्या शकावल्या कसल्या तरी एका मूळाच्या नकलाच आहेत. म्हणून प्रत्येक शकावलीस स्वतःप्रामाण्य राहिलेले नाही हेही आपण विसरता कामा नये. दत्तोपंत – निरनिराळ्या शकावल्यांत काही नोंदी अगदी सारख्या आहेत, काही थोड्याशा मतभेदनिदर्शक आहेत व काही प्रत्येक शकावलीत अगदी स्वतंत्र व निराळ्या आहेत; त्यावरून सर्व शकावल्यांचे मूळ एक, हा सिद्धांत चुकीचा ठरतो. रा. बेंद्रे यांनी या बाबतीत अधिक काळजीपूर्वक अभ्यास केलेला आहे, तेव्हा तेच या गोष्टीची साक्ष देतील. बेंद्रे - या विषयाचा मी जो अभ्यास केला आहे त्यावरून माझी अशी खात्री झाली आहे की, मुसलमानी राज्यांतून चालू असलेली तवारिख अगर आत्मचरित्रवजा रोजनिशी अगर पातशहाच्या कारकीर्दीतील हकीकतीची टिपणे वेळचे वेळी मिळवून नोंद करून ठेवण्याची वहिवाट शिवाजीपासून नंतरचे काळी मराठ्यांचे दरबारात उचलली गेली. ही वहिवाट ज्यावेळी शिवाजी महाराजांनी आपली राज्यव्यवस्था मुक्कर केली, त्याच वेळी सुरू केलीसे वाटते. अशी राज्यव्यवस्था सन १६५६मध्ये शिवाजीने केली व सन १६५७-५८ पासून तो स्वतःस राजा म्हणवू लागला. अर्थातच व्हापासून मुसलमानी तवारिखांप्रमाणे आपल्याही हालचालीची टिप्पणे करून ठेवण्याची पद्धत चालू करणे महाराजांना इष्ट वाटल्यामुळे, आपण जिला शकावली म्हणत आहो त्या राजकीय घडामोडीच्या जमाखर्चाच्या कीर्दीस सुरुवात झाली. याच कीर्दीच्या नकला आपणांस आज शकावलीच्या रूपाने पाहावयास मिळतात. प्रथम प्रथम जरी मूळ कीर्दीवरून नकला करून घेण्याचा प्रयत्न झाला असला, तरी नंतर नकलेवरूनच नकला होणे अगदी साहजिक होते. सारांश भाऊबंदकीचे खटले जसजसे वाढू लागले, तसतसा या शकावल्यांचा प्रसार प्रत्येक घराण्यात अधिकाधिक होऊ लागला.

वाकसकर – शकावलीचे तज्ज्ञ म्हणून दत्तोपंतांनी आपल्या तर्फे आणिलेल्या बेंद्र्यांची साक्ष फराच महत्त्वाची आहे. बेंद्रे म्हणतात – १. सर्व शकावल्यांचे मूळ राजकीय कीर्दीत सापडते. २. या राजकीय कीर्दी इ. स. १६५७-१६५८