शिव – जन्म – तिथीचा वाद: Page 8 of 23

अत्यंत भिन्न आहे; इतकेच नव्हे तर इ. स. १७६३ त लिहिलेल्या भाऊसाहेबांच्या बखरीतल्यापेक्षाही ह्या बखरीची भाषा जुनाट दिसते.

ह्यावरून असा तर्क काढण्यास हरकत दिसत नाही की, यद्यपि ही बखर सन १८१८त आहे या रूपाने प्रसिद्ध केली गेली, तथापि हिच्यातील मजकूर पूर्वीच्या एखाद्या जुन्या बखरीतून घेतला असावा. बारनिश्या, दाखले, पत्रे व जुने ग्रंथ, ह्यांच्या आधाराने आपण लिहीत आहोत, असे हा बखरनवीस आपल्या बखरीच्या १४८व्या, १८८व्या व ३८१व्या पृष्ठांवर वारंवार म्हणतो. त्यावरून वरील विधानाला दुजोरा येतो. सारांश या बखरीचे मूळ इ. स. १७०० पासून इ. स. १७५० पर्यंत केव्हा तरी रचले गेले असावे, असे माझे ठाम मत आहे, दत्तोपंत, तुम्ही आपले स्वतःचे भलतेच मत माझ्या नावावर लादू पाहता हे गर्हणीय होय. सरदेसाई – एक्याण्णवकलमी बखरीतही ही शहाजी-जाधवरावांची रेटारेटी पूर्वचरित्रासह तपशीलवार दिलेली आहे. दत्तोपंत – एक्याण्णवकलमी बखर, रायरी बखर व तारीखे-शिवाजी, यातीनही बखरी जवळ जवळ एकच आहेत, हे त्या एकमेकीशी ताडून पाहणारास सहज दिसून येईल. त्या शिवकालीन आहेत असा कित्येकांचा समज आहे, पण तो चुकीचा आहे. कारण या तीनही बखरींतून व्यंकोजीच्या दोन मुलांचा निर्वंश होऊन तिसऱ्याचा म्हणजे तुकोजीचा वंश ‘हाली असे’ असे बखरकारांनी स्पष्टच म्हटले आहे, व त्यावरून या बखरी पेशवाईतल्या आहेत याबद्दल संशयास जागाच राहात नाही. एकंदर विचार करता माझे मत झाले आहे की, एक्याण्णव कलमी बखर सन १७६० पासून १७७० पर्यंत केव्हा तरी रचली गेली असावी, आणि तारीखे-शिवाजी सन १७७०पासून सन १७८०पर्यंत लिहिली असावी. शंकरराव जोशी - एक्याण्णव कलमी बखर आणि तारीखे-शिवाजी या दोनही जर जवळ जवळ सारख्याच आहेत तर एक्याण्णवकलमी बखरीचा काळ मी तर १७८०च समजणार. सन १६६० पर्यंत मी तिला मागे जाऊ देणार नाही. जदुनाथही हाच काळ ग्राह्य समजतात. वाकसकर – फारशी आणि इंग्रजी भाषांतराचा काळ कोणताही असो. जदुनाथ अगर रघुनाथ पाहिजे तो काळ ग्राह्य समजोत, परंतु त्या योगाने मूळ एक्याण्णवकलमी बखरीचा रचनाकाळ निश्चित होणार नाही. अमका एक अमुक काळ म्हणतो, म्हणून आपण तोच काळ ग्राह्य समजावा ही बौद्धिक गुलामगिरी पत्करण्याचे काहीच कारण नाही. फॉरेस्टने छापलेल्या इंग्रजी भाषांतरांचे मराठी मूळ केव्हा लिहिले गेल, हे आज कोणासच सांगता येत नाही. प्रभातमध्य छापलेली बखर मात्र अनाजी रंगनाथ मालकऱ्याचा मुलगा खंडो अनाजी याने दत्तोजीपंत वाकेनिसाच्या संग्रहातून मिळवून नकल करून घेतलेली आहे. या बखरीत अनाजी रंगनाथ मलकरे याचा पाच सात वेळा गोठगस्ते, कारकून, मुजुमदार, इद्यादि अनेक हुद्यांनी उल्लेख येतो.

शिवाजी राजे व अफजलखान यांच्या भेटीच्या वेळी हा तेथे हजर होता. शिवाजी व व्यंकोजी यांची भागासंबंधाने भानगड चालली होती त्यावेळीही हा तेथे होता. सारांश अनाजी रंगनाथ हा शिवाजीचा समकालीन पुरुष होय. आणि याचाच मुलगा खंडो अनाजी याने या बखरीची नकल केली आहे. असे एक्याण्णवाव्या कलमात सांगितले आहे. दत्ताजीपंत वाकेनविसाजवळ मूळ बखर असल्याचे हा खंडोबा सांगतो. शिवाजीच्या अष्टप्रधानांपैकी मंत्रीपद या दत्ताजीपंताकडे होते व ते सन १७१३ मध्ये शाहूने नारोराम शेणव्याला दिले म्हणजे सन १७१३ मध्ये हा बहुधा निवर्तला असावा. या बखरीच्या २१व्या कलमात व्यंकोजीच्या वंशाबद्दल ज्याप्रमाणे ‘हाली असे’ असे म्हटले आहे, त्याचप्रमाणे कलम २४ यांत शिवाजी व औरंगजेब यांच्या वैराबद्दल – ‘‘तधींपासून दावा आजीपावेंतो चालिला आहे.’’ असे म्हटले आहे. हे वाक्य औरंगजेब जिवंत असेपर्यंत याप्रमाण लिहिणे शक्य आहे. आणि औरंगजेब सन १७०७मध्ये निवर्तला. या एक्याण्णव कलमी बखरीत शिवाजीच्या मृत्यूनंतर संभाजीच्या राज्यारोहणापर्यंतच हकीगत आहे. मोरोपंत पेशवे व अनाजी सुरनवीस यांचेवर संभाजीची इतराजी झाली, असे नव्वदाव्या कलमात आहे. त्यांत बाळाची आवजीचा उल्लेख प्रभात मधील बखरीत नाही. बाळाजी आवजीवर इतर इतराजी होऊन त्यास सन १६८१मध्ये संभाजीने हत्तीच्या पायी देऊन मारविले