शिव – जन्म – तिथीचा वाद: Page 6 of 23

प्रधान झाला. मुरार जगदेव कारभारी झाला.’ यांत चैत्रमासी मुरार जगदेव कारभारी झाला असे वाचावे आणि बाकीचा मजकूर खुलाशादाखल आहे असे समजावे. कारण या सगळ्याच गोष्टी चैत्रमासी झाल्या असे समजणे यगोय होणार नाही. दाजीसाहेब – दत्तोपंतांचे संगती लाविण्याचे चातुर्य मोठे अजब आहे बुवा! किंबहुना मला तर त्याचा र्थच समजत नाही. चैत्रमासी मुरार जगदेव कारभारी झाला असे वाचून बाकीचा मजकूर खुलाशादाखल आहे असे समजावे असे ते म्हणतात; पण या म्हणण्याचा अर्थच काय हे नीटसे ध्यानात येत नाही. कारण चैत्रमासी मुरार जगदेव कारभारी झाला, या दूरान्वित वाक्याला खुलाशाची आवश्यकता काय आहे? घटकाभर खुलाशाची आवश्यकता आहे असे आपण गृहीत धरले, तर दत्तोपंतांच्या म्हणण्याप्रमाणे बाकीच्या गोष्टी खुलासा होऊ शकतील, व मग त्यांचा अर्थ असा करावा लागले की, चैत्रमासी मुरार जगदेव कारभारी झाला. याचा खुलासा काय? तर इभराम इदिलशहा परलोकास गेला! बरे हेहि तुम्हास पटत नसले तर, चैत्रमासी मुरार जगदेव कारभारी झाला, याचा दुसरा खुलासा सुलतान महंमदशहा तख्ती बैसला हा स्वीकारा! आणि हाहि पटत नसला तर खवासखान प्रधान झाला हा तिसरा खुलासा घ्या!! या खुलाशावर शुलाशांनी दत्तोपंतांचे समाधान होत असेल, पण आम्हांस तर काहीच अर्थबोध होत नाही. वाकसकर - चैत्रमासी मुरार जगदेव कारभारी झाला या विधानाला तरी काय आधार आहे? शिवाय दूरान्वय कोठे स्वीकारावा यालाही काही नियम आहेच.

अदिलशहाचा मृत्यु. सुलतान महमदाचे राज्यारोहण, खवासखानाचे प्रधान होणे; मुरार जगदेवास कारभारीपद मिळणे, या सर्व बाबी एकाच वर्षात काय पण एकाच दिवसातही होणे शक्य आहे. त्या अशक्य असत्या, तर दूरान्वय घेणे अपरिहार्य होते. पण येथे दूरान्वय कशाला? आणि जेधे शकावलीतील सर्वच मित्या बरोबर आहेत असेही नाही. काही मित्यांचे वार जमत नाहीत व जिजाबाईच्या मृत्युसारख्या काबी बाबतीत तर अगदीच चुकल्या आहेत. बखरीमध्ये शक, संवत्सर, तिथी वार यांचा मेळ नसला तरी शके १५४९ वैशाख मास व शुद्ध पक्ष इतका तपशील तर एक दोन शिवाय सोळा सतरा बखरी देतात. तिथि भिन्न व वार विविध देतात, यावरूनच या बखरी एकमेकींच्या नकला नसून स्वतंत्रपणे लिहिलेल्या आहेत, असेच सिद्ध होते. वार व मिती भिन्न असण्याला कारण त्यावेळची परिस्थिती होय. आजच्या प्रमाणे छापखान्याचा प्रसार नसल्याने प्रत्येक गावी स्वतंत्र पंचांगे होत असत म्हणून, शिवजन्माची मिती तूर्त बदलू नये व तोतया मिती स्वीकारू नये हेच इष्ट होय. दत्तोपंत - जेधे शकावलीत काही चुका आहेत हे खरे आहे. पण दोन अडीचशे मित्यांत दहा पांचच चुका आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे. बखरीत चार दोनच मित्या दिलेल्या असतात व त्यातही एखादीच मोठ्या शिकस्तीने बरोबर आहे असे दिसते. शक संवत्सरांचा तर त्यांत मेळ नसतोच, म्हणून नवीन तिथिच मान्य झाली पाहिजे. या मितीला वाकसकरांनी तोतया म्हटले हे विशेषण मला आवडले. बनावट म्हणण्यापेक्षा तोतया म्हणणे बरे. दिवेकर - बखरीत आलेले वयाचे उल्लेख एकत्र करून ते कोणत्या मितीशी जुळतात हे तपासून पाहावे असे लोकमान्य म्हणत असत. मी व आबा चांदोरकरांनी ते सर्व तपासून पाहिले आहेत आणि आनंदाची गोष्ट ही की ते सर्व शक १५५१शीच जुळतात. सरदेसाई – एखाद दुसरा महत्त्वाचा असा वयाचा उल्लेख सांगा.

चांदोरकर - राज्याभिषेक प्रसंगी शिवाजी महाराज शेहेचाळीस वर्षांचे होते असे सर्व बखरकार म्हणतात शिवजन्म शके १५५१ फाल्गुन वद्य ३ आणि राज्याभिषेक शके १५९६ ज्येष्ठ शुद्ध १३ असे धरले तरच हे शेहेचाळीस वर्षांचे वय बरोबर येते. यावरून नवीन जन्मतिथीच खरी हे उघड सिद्ध होते. दाजीसाहेब – या हिशेबाने चांदोरकरांनी भास्कराचार्य आणि आइनस्टाइन या प्रख्यात गणितज्ञांनाही चीत केले बुवा! कारण आमच्या अल्प शिक्षणाप्रमाणे या दोन मित्यांची वजाबाकी ४४ वर्षे २ महिने आणि २४ दिवस