संगीत सीताशुद्धी: Page 7 of 48

तुला या लंकाद्वीपांत उच्च स्थिती प्राप्त झाली – अधोमुख०—पण ती स्थिती फार उंच वाढून तिच्यावरून खालीं कडेलोट करून घेण्यापेक्षा आहे एवढ्याच उच्चतेवरून खुशीनं खालीं उतरावं हें बरं. त्यांतून प्रधानजींचं मन तूं आतांच कलुषित केलंस. तेव्हां दूतगिरीचं हे वैभव आता बस्स झालं. पोटात कांटे भरण्याची वेळ आली तरि पत्करली पण दूतगिरीच्या कठोर व आत्मघातकी सुरीनं एकमेकाचे गळे कांपण्याचा प्रसंग नको. [जातो] क्रूरवदन०—ह्मः ह्मः ह्मः वृत्ति सुटली कीं हा उपाशी मरणार. उपास सुरू झालें कीं भीक मागणार. भीक मागायला अस्मादिकाच्या वाड्यावर येणार आणि आम्ही त्या वेळीं या हुरळ्याला आमच्या वृत्तीवर कमावलेल्या अगणित संपत्तीचा खजिना दाखवून वृत्तिवैभवाच्या दृष्टांतानें पुराच खजील करणार. [जातो.] अंक] प्रवेश ३ रा. [पहिला. मारुती प्रवेश करतो. मारुती० – झंपा. घोर प्रळयिं उध्वस्त लंका।। धाडिलें अमित खल काळलोका ।।धृ।। गुप्तरूपें कधीं प्रगट कधि होउनी।। मर्दिले राक्षसां मुष्टिघातें।। हाणितां लाथ हृदिं कुजनमुख छेदितां ।। हर्ष अति जाहला मज न शंका।।१।। --- भावी युद्धप्रसंगी शिल्लक राहिलेल्या राक्षसांना असंच ठोंकून जमीनदोस्त करण्याची परवानगी श्रीरामानीं मला एकट्यालाच जर दिली तर अत्यानंद ब्रह्मानंद म्हणतात त्यापेक्षा वरीष्ठ प्रतीचा आनंद या मारुतीला होईल. आपल्या शत्रूचा कंठ चरचरा चिरून त्याच्या रुधिराचं आकंत प्राशन करण्यात जीवित साफल्याची खरी मौज आहे. लंकाद्वीपस्थ राक्षसांनो, तुमच्याहि कंठाची तीच स्थिती असल्याचे भावी काळ मला स्पष्ट सांगत आहे. असो, जनकी मातेचा कुठं शोध लागेल, या आशेनं मी घरोघरचं गु्प्त भाषणहि ऐकतो, पण निश्चित स्थळासंबंधी कोणीच काही बोलत नाही. कामशांतीसाठी राखून ठेवलेल्या रावणाच्या ऐंशी हजार स्त्रियांची शयनमंदिरे मी तपाशीत तर आलोच. परंतु हा महाल मात्र पाहण्याचा राहिला आहे. ही कोण बरं स्त्री असावी? या स्त्रियेच्या कांतीवरून जनकन्या ती हीच असावी, असा माझा तर्क आहे. संशयच नको – साकी शय्येवरती निद्रीत सीता परमपुरुष-चिच्छक्ती।। राजलक्ष्मी हीच जानकी शोधिलि म्यां मद्भक्ती।। सफलहि मारपदीं।। जनना मोक्षचि मी साधीं।। -- या पहा, काही स्त्रिया सीतेची करमणूक करण्याकरिता नृत्य गायन करीत आहेत. या ठिकाणी-विशेषतः रावणाच्या बंदीत-सीतेला इतक्या ऐश्वर्यात कस ठेवलं आहे कोण जाणे? या गौप्याचा नीट तपास केला पाहिजे. (देखावाः- मंडोदरीचा हाल. मंडोदरी बसली आहे. दासींचा नाच सुरू आहे.) नृत्याचें पद. नाचूं गाऊं चला या ।। विहारि शशी अंबरांत नाचे । प्रणयानें मन मोंहि।।धृ।। घेउनिया संगतीस तारागणाला।। फेंकितसे रंगा विहारी ।। हे धवल किरण पाडी त्रिलोकिं छान ।। स्वकरिं रतिपतिसम धनु-किरणा प्रणयिजनां । देंत मना । मोदास भारी।।१।। मंडोदरी—क्रुद्धभाषणी, पुरे करा तुमचं हे नृत्य गायन. क्रुद्ध – आज सकाळपासनं राणी सरकारच्या जिवाला चैन नाहीसं दिसतं. मंडोदरी—सकाळपासनं काय झालं असेल ते होवो. जिवाला एकसारखी हुरहुर लागून राहिली आहे. मत्सरनयनी – मला वाटतं राणीसाहेब या पुढच्या स्फटिकगच्चीवर येतीलं तर ही चांदण्याची शोभा पाहून त्यांच्या मनाला जरा बरं वाटेल. मंडोदरी—बरं तसंच का होईना? क्रुद्ध – बाईसाहेब, किती तरी शुभ्र चांदणं पडलयं हे? मत्सरनयनी – राणीसाहेब, हे पाहिलंत कां आणखी? पद. (दिल्दार यार) गगनांत निशाकांत दिसे रम्याकृती ।।धृ।। इंदु सुमन वाटे । तारतति दाटे । मधुर मधूसेवनि हो लोलुप मधुपाकृति ।।१।। नवरदेव किंवा । मिरवीतचि न्यावा । तारकागणीं रजनिनाथ शोभतो किति ।।२।। नटलि रजनि-कांता । ग्रह-पुष्पहार हातां । घेऊनि ये मंद मंद लज्जायुत संप्रति ।।३।। मंडोदरी—छेः बाई, यात काही मला गोडी वाटत नाही. मी जरा निजतेच. माझ्या अंगावर हा शेला घाल न् स्वारीचं येणं झालं की मला जागी कर. (निजते) क्रुद्ध – (मत्सरनयनीस उद्देशून) भलत्याच ठिकाणी आपली छाप बसवायला गेलं की अशीच खोड मोडली पाहिजे. ‘राणी साहेब, राणी साहेब’ करून वशिले लागले मग काय? पण जित्याची खोड