संगीत सीताशुद्धी: Page 4 of 48

रक्षणार्थ, न्यायी प्रजापालनार्थ आणि धर्माच्या उन्नतीसाठीं त्रैलोक्यपति राजांची सिंहासनं स्थापलेली असतात. इंद्रजीत० – स्थापलेलीं असतील कदाचित परंतु राजे लोकांनीं आपलं वर्तन कसं ठेवावं याचा निर्णय करण्याची शक्ती व इच्छा ही नेहमीं आम्हां सत्ताधा-यांवरच अवलंबून असतात. सुलोचना० – अनीतिचं व पापाचं बीज एकदां कां एखाद्या भूमींत रुजलं कीं त्याचे वेल इतक्या त्वरेनं तेथील रहिवाशांच्या मानसिक मर्यादेत जाऊन भिडतात कीं त्या भूमींत वास करणारे सर्व प्राणी अनीतीचे व पापाचे मूर्तिमंत पुतळे बनतात. इंद्रजीत० – सुलोचने! पवित्र पतिप्रेमानं आणि अर्धांगी पत्नीच्या सुखवर्धनार्थ निष्कपट अंतःकरणानं आम्ही पुरुषांनीं बायकांना हृदयाशीं कंवटाळून धरून त्यांना आनंदानं या हातावरून त्या हातावर गुलाबाच्या फुलाप्रमाणं झेललं कीं स्त्रियांना आपल्या योग्यतेच्या पात्रापात्रतेबद्दल तिळभरही भान न राहतां, केवळ विश्रांतीचं स्थान, सौख्याचं प्रतिबिंब पहाण्याचा आरसा आणि सर्व श्रमांचं परिमार्जन करणारा कल्पवृक्ष जो हा रंगमहाल, त्या ठिकाणीं शुष्क राजनीतीचा उपदेश करण्याचं धाडस करून प्रतिप्रेमाच्या निर्झर प्रवाहास कायमचा अडथळा आणतात. सुलोचना० – इकडच्या प्रेमाला मी जर योग्य नव्हते आणि सत्यभाषण करण्याइतकी माझी पात्रता जर इकडे मान्य नव्हती तर अर्धांगीचा मान देण्यांत प्राणनाथांची चूकच झाली म्हणायची. ती चूक सुधारली जाईपर्यंत मी अश्शी या पायांपासून दूर रहाणार. [रागाने निघून जाते. तोहि जातो.] मारुती० – एकूण ही रामपत्नी सीता नव्हे! या जोडप्याचा हा प्रणयी संवाद ऐकण्याचा या ब्रह्मचारी वायूनंदनाचा हा पहिलाच प्रसंग. परंतु विशेष समाधानाची गोष्ट ही की रावणानं आर्यावर्तांत भीक्षांदेहीच्या ढोंगानं केलेलं चौर्यकर्म येथल्या रहिवाशांना विशेष डांचू लागलंय खास. असो, सीता-शुद्धीचं विस्मरण होता कामां नये. बरं पण, हा मधुर ध्वनी न तोहि क्षीरामनामाचा कुठून बरं येत आहे? ["राम राम राम सीताराम राम राम भजन ऐकूं येतें."] --- अहाहा! ‘नाही रजतमाची वार्ता । न दिसे द्वेष हिंसा तत्त्वता ।। पुराण श्रवण हरिकथा। याविण चर्चा नसेचि’ ।। किती प्रेमळ हें भजन! किती गोड हें रामनाम! [भजन गातो.] ज्या भूमीच्या तुकड्यावर रामनामाचा जयघोष करून भक्त नाचतो, तेथील त्याचे चरणरज कपाळी लावावें. [तसें करतो.] चरणरजाचा प्रताप तरि किती अद्भूत! पद. (प्रणयतरंगासवे०) राम कल्पतरु गमे। स्मरणिं भक्तमन रमे।। नच भ्रमे कधिं श्रमे नाम-सुरस-प्राशनें।।धृ०।। राम-परिस स्पर्शतां। चरण-सुरस प्राशितां।। अमर शांति लाभतां। स्पर्श करि न अघ भ्रमें।।१।। काय चमत्कार पहा! हा पडला राक्षसाचा वंशज, पण भक्तराज व किती तरी सात्विक! माझा धनी रघुनंदन जेव्हां या लंकेंत येऊन ह्या अनाचारी रावणाचे सहपरिवार कंदन करील, त्या वेळीं – साकी. कामक्रोध मदमत्सर यांना संत पिटाळुनि देती।। साधाया निजबोध ज्यापरी त्यापरि बिभिषण-हातीं।। लंका राज्याला । देइन विनवुनि मत्प्रभुला ।।१।। कॉपी सुटली?...... --असो, सीता-शुद्धी, सीता-शुद्धी. बस, दुसरी गोष्ट नको. ऊः ऊः! अरेच्च्या, कसली ही घाण आली? आणि मेघींच्या गडगडाटाप्रमाणं घुर्रघुर्र घोरत हा कोण पडला आहे? अरे बापरे! हें तर जाडीच प्रकरण! यांच्या श्वासाबरोबर हत्ती, घोडे, म्हशी न् गाढवं पार आंत जात आहेत व उच्छवासाबरोबर ते सर्व धडाधड बाहेर येऊन कोंसळत आहेत. [स्वस्ति श्री कुंभकर्ण महाराज शब्द होतो.] -- वाहवारे कुंभकर्ण! जाऊ द्या. आपलं काम बरं कीं आपण बरे. या लंका नगरीतील घरोघरची चर्या पाहिली तर वरवर मात्र आचारविचाराचा टाकम् टिकला दिसतो, परंतु अंतस्थिती फारच अधर्माची. घरोघरीं पूर्ण अग्निहोत्रें आहेत पण या राक्षसांच्या दृष्टीस गोब्राह्मण पडले कीं दुष्टांनीं रगडलेच आपल्या दाढेखालीं तसंच – पद. (मज गमे ऐसा०) युवति त्या युव ते घातकी। दुराचारी।।धृ०।। थोर दिसति ते कुटिल वर्तनी।। वधुनि गोधन भक्षिति विपिनीं।। वानप्रस्थ ते स्वेच्छाचरणी।। इंद्रियदमना होत पारखी।।१।। --- अशा पापी प्रदेशांत ती जनककन्या मा अजाणत्यानं कशी बरं शोधून काढावी? सीतेनं योगगतीनं प्राण तर दिला नसेल? ती समुद्रांत तर बुडाली नसेल? कदाचित्