संगीत सीताशुद्धी: Page 3 of 48

वैभव ज्याचें।। रमणिय स्थलिं या भेगित सौख्या धन्य दैव पुरुषाचें ।।धृ०।।

उंच ध्वजा या डुलति प्रदर्शनि वैभव दाविति ज्याचें।।१।। स्टिक-शिळांवर सुवर्ण-चित्रें सार्थक हो नयनांचें।।२।।

भाग्यशालि हा कोण, भोगितो भोगहि सुरलोकींचे।।३।।

 पण नाहीं. छेः! या लुटारू लंकेंतल्या कोणत्याही प्राण्यास ‘भाग्यशाली’ ही उपमा बिलकूल शोभत नाहीं. ज्या या लंकाद्वीपस्थ राक्षसांचा बाणा केवळ अधर्माच्या व अनीतीच्या तत्त्वांवर वैभव मिळवून त्यावर चैन करण्याचाच आहे. त्यांना ‘भाग्यशाली, ईश्वरावतार, परोपकारी, प्रामाणिक’, इत्यादि विशेषणें लावणारा निदान हा रामभक्त मारुती तरी खास नाहीं, हें ऐश्वर्य चोरटें असो, नाहीतर निढळाच्या घामाचें असो, या महालांत नीट बारकाईनें तपास केला पाहिजे. त्याशिवाय सीतामातेचा शोध लागणार कसा? [इंद्रजीत सुलोचना यांचा महाल] हें तर मूर्तिमंत पापाचरण मी पहात आहे. आर्यावर्तवासी श्रीरामाची सीता ती हीच काय? असं असेल तर या मुष्टीचा प्रहार-पण नको. हीं दोघे काय भाषण करतात तें प्रथम ऐकलं पाहिजे.

इंद्रजीत- (सुलोचनेस) खरोखर तुला निर्माण करते वेळीं चंद्र प्रसन्न झाला असावा किंवा वसंत झाला असावा. अथवा एका श्रृंगारांतच जो नेहमीं रमतो असा साक्षात् मदनच कारागीर होऊन त्यानं तुला घडवली असावीं खास.

मारुती- (स्व.) ज्या नीच मुखानं आमच्या सीता मातेबद्दल असले नीच शब्द उच्चारले त्याची जिव्हा हांसडून तिचे शतशः तुकडेच केले पाहिजेत.

इंद्रजीत- प्रिये, शेषकन्ये! मी काय म्हणतो इकडं तुझं लक्ष आहे ना? कारण असं पहा – पद. (या तव बघुनि०)

जो नित वेदपठणि. रमला। मतिला जाड्यचि ये त्या जरठाच्या।। जुनाट ऋषि विधि नच शकला ।।धृ०।।

सस्मित वदना सिंहकटीला सडपातळ तनुवल्लीला। रतिहुनि सुंदर युवतीला या । स्वप्नि न रंगवितां शकला ।।१।।

सुलोचना- एखाद्याचं वर्णन करायला इतकी कांही कविकल्पना लढवायला नको. मला उत्पन्न करणारा वसंत असो नाहींतर मदन असो, मला दासीला हे पुण्यचरण सेवा करण्याला प्राप्त झाले आहेत, यांतच मी आपल्या नशिबाला फार भाग्यवान समजतें. मारुती० -- (स्व०) त्या राम-मणिकापेक्षां हा गारगोटीचा दगड तुला आवडला काय? आणि त्यांत तुझें पूर्ण भाग्य समजतेस? ठीक आहे. इंद्रजीत० -- इंद्रादि तेहतीस कोटी देवांवर हुकमत चालविणारा चौदा चौकड्यांचा अधिपती जो त्रैलोक्याधीस रावण त्याचा मी राजपुत्र—तेव्हा तुझ्या बलवत्तर दैवाची तूं जी प्रशंसा केलीस ती योग्य आहे. सुलोचना० -- आतां स्वारी आनंदात आहे म्हणून एक गोष्ट विचारतं – विचारूं का ती गोष्ट इंद्रजीत० -- खुशाल विचार. सुलोचना० -- आपलं म्हणतात ना, बोलण्यावरून बोलणं सुचतं. आपले वडील लंकानाथ फार अनुचित मार्गानं वर्तन करतात. इंद्रजीत० -- काय? अनुचित? सुलोचना० -- होय. अगदी अनुचित. हें काय बाई बरं नाहीं. कोणत्याहि प्रकारचा संबंध नसतां, किंवा शत्रुत्वालाहि काहीं कारण नसतां ती जनक राजाची मुलगी चोरून आणून व्यर्थ व्यर्थ कुलक्षयास कारण घडवलं. इंद्रजीत० -- यांत कुलक्षय होण्याचं कारण काय? पराक्रमी वीरांची पराक्रमी लीला चालली असतां किंवा ते पराक्रमी वीर स्वतःचा मनाचा कांटा संतोषाच्या आणि चैनीच्या बिंदूवर समतोल ठेवीत असतां त्यांच्या हातून प्रत्यक्ष ब्रह्महत्त्या जरि घडली तरि त्या पापाची जबाबदारी आम्हांवर मुळींच नाहीं. सुलोचना० – हो. असं म्हणून चालेल तरि कसं? महाराज – पद. (तरुणीस ही०) अनुचीत ही कृति करीतां जनीं ।।धृ०।। अन्य स्त्रीस वांछिती। गुरुद्रोह दाविती।। विप्र छळिल नित। नरकीं जाती। प्राणी।।१।। शील भ्रष्ट होतसे। कुमति योग्य ही नसे।। मूर्तिमंत खल। अल्पायुषि ते। प्राणी।।२।। इंद्रजीत० – अल्पायुषि झाला म्हणून त्यांत काय वाईट? त्याला जितकं आयुष्य लाभेल तितक्यांतच त्यानं आपली वैभवी सत्ता गाजवून घ्यावी. सुलोचना० – महाराज – पद. (दाखवि तव दिव्य) अवलोकन शील करा पात्र न ही कुमती।। काढित पाखांड मतां त्या न मिळे सुगती।।धृ०।। हरिहर-स्तुति-उच्छेदा। गर्वबळे करि निंदा। परमेश्वर त्यास सदा। नरकीं ने अंतीं।।१।। -- महाराज, सत्याच्या