संगीत सीताशुद्धी: Page 2 of 48

षड्रिपुछलना हरी।।१।।

धैर्य-पिता त्या क्षमा-जननिला।। शांति-गेहिनी सत्य-सुताला।। परमेश्वर चिर करी।।२।।

१. परिचारक- बिभीषण महाराज ईशभजनाचा महिमा फार थोर आहे. तारण्याकरितां आणि असत्याचा नायनाट करण्यासाठी ईश्वरानें मस्त्य, कच्छ, वराह, नारसिंह, वामन आणि परशुराम असे सहा अवतार आजपर्यंत धारण केले खरें. पण बिभीषण महाराज, सांप्रत भूतलावर सुरूं असलेलीं अनाचारी व पापी कृत्यें सत्य पाहून ईश्वराला त्या श्रेष्ठ सत्यतत्त्वाची करुणा अझून का येत नाही कोण जाणे?

बिभीषण- परिचारका अनंतकाळ अबाधित सुरू असलेला सृष्टीक्रम कधींहि चुकायचा नाहीं, तो मनुष्यांनीं मदांध होऊन जर उल्लंघन केला तर परमेश्वर ती शिस्त हाणून पाडल्यांशिवाय मात्र राहणार नाहीं, हे खूप ध्यानांत ठेवा.कारण— साकी.

सत्याधारें सृष्टि तरे त्या ईश रक्षणा करितो।। धर्मक्रान्ति होतांच पाप तें छेदाया अवतरतो।।

वचनहि त्या प्रभुचें।। वारी संकट या भूचें।।१।।

[‘जय जय राम रघुवीर समर्थ’ शब्द ऐकूं येतो.]

२. परिचारक- रघुवीराच्या नामाचा हा जयघोष कुठून बरं ऐकूं येत आहे?

बिभीषण- काय? राम रघुवीराचा जयघोष? या राक्षसी लंकेंत रामाचा ध्यास करणारे प्राणी मुळींच नाहींत. तेव्हा हा नुसता आपल्याला भास झाला. कारण असं पहा— पद. (यमन कल्याण—चौताल.)

सतत मनन मन रामीं करितां। समर्थ जय रघुवीर शब्द हा कर्णि पडे, कां विस्मय करिंतां।।धृ०।।

दशदिग्भागीं राम दिसतसे। स्थिरचर व्यापी राम गमतसे।। मन हें रामी रंगुनि जातां राम राम ध्वनि उमटें आतां।।१।।

चला आपण आपल्या कार्याला जाऊं.

परिचारक- जशी आज्ञा. असं चलावं बिभीषण महाराज. [जातात]

प्रवेश १ ला. लंका नगरींतील राजरस्ता. (मारुती प्रवेश करितो.)

मारुतीः-

झंपा. धडधड झंजावात सुटतां। कडड कडकड तरुहि उमलति।।धृ।।

अंबरांतचि चपल चपला। चमकतां भयभीत होती। हिंस्त्र पशु वसतिस्थलातें। त्यजुनि गिरिगुहरांत लपती।।१।।

गगनिं दिसता दिव्य दिनकर। दीवाभीतहि तसें तस्कर। कृष्णवदना झांकिती खल। दडुनि तिमिरीं तेचि बसति।।२।।

गर्जितां रघुवीर नामा काळ कल्पांतास धडकी। भरुनि हृदयी पळत सुटती। ती पिशाच्चें चपल गतिनें।।३।।

अहाहा माझ्या रामाचं नाव तरि किति गोड!

पद.(भारती जडा०) माधुरी तया अतीहि । अमृतीं नसे।। कल्पवृक्षसे । सुरा-सुरां न प्राप्त तेंचि इष्ट देतसे ।।धृ।।

प्रभुस्मरणिं गुंग मति सहज भंगवी अघ पंथें। करि परीससम-कृति त्वरीत स्पर्शृनि प्रभू पदें।।१।।

-रविकुलभूषण श्रीरामचंद्राच्या पवित्र नामाचा जयघोष करून या लंकानगरीकडे मी रामसेवकानें जों उड्डाण केलें. तो माझ्या भूःभूःकारानं हा भूगोल डळमळूं लागला, गगनात नक्षत्रें जागच्याजागी वितळून मेघां ची दांतखिळी बसतांच प्रत्यक्ष कृतांत काळाचाहि महाभयाने थरथराट झालाः माझ्या चपल गतीच्या उड्डाणामुळं उत्पन्न झालेल्या वायूनं महासागराचें खवळलेलं पाणी आकाशास भिडविलं. त्यामुळे सप्तपाताळात एकच हाहाःकार उडाला. शेष गर्भगळित होऊन कूर्म आपल्या कवचाखालीं दडून बसला. दिग्गज चळचळा कांपला. मंदार पर्वत देखिल डळमळला. शचिपती प्रत्यक्ष इंद्र. पण तोहि घाबरला. पार्वती भयभीत होऊन शंकराच्या गळ्यांत पडली आणि कंपायमान झालेल्या कमलेचं शांतवन करतांना विष्णूची त्रेधाच त्रेधा उडाली. अशा रितीनं मनोवेगावरहि ताण करून मी या लंका नगरीत प्राप्त झालो. परंतु— पद.(जठरानल शम०) परमार्थी जन ज्ञान मिळवितां। विघ्न तयाला विरोध करितें।।धृ।।

सुजनकृतीला रिपु निपजावा।। अमृतनिधि जहरें व्यापावा।। साधूं जातां निधान अथवा। विवशि निश्चयें घाता करिते।।१।।

या नियमानुसार रंभा राक्षसी आपले अक्राळविक्राळ तोंड पसरून माझ्या मार्गात येतांच माझी उडी त्यांतच पडली. पण रामनामानं अमर झालेल्या सनातन धर्माभिमानानं स्फुरण पावलेल्या आणि आमच्या राजलक्ष्मीच्या शोधार्थ आपलें सर्वस्व अर्पण करणा-या या वज्रदेही मारुतीनं रामस्मरणाच्या बलावर त्या विवशीच्या कानांतून पार निसटून जाऊन आपली मुक्तता केली. उड्डाणास पुन्हा सुरवात होतांच मैनाक पर्वत, सिंहिका, यांचा यथास्थित समाचार घेऊन लंकादेवीस मुष्टीप्रहाराचा प्रसाद तर दिलाच. पुढें भेटलेल्या क्रौंचा नामक रावणाच्या भगिनीचा व इतर राक्षसिणींचा फन्ना उडवून नुकताच या ठिकाणी आलो, अरे पण! हें रत्नखचित सुंदर मंदीर कोणाच बरं? अहाहा— पद. (किती कपटि०)

शचिपतिसम