शेतक-यांचे स्वराज्य: Page 7 of 44

जित गुलाम आहेत. ‘ स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे ’ असल्या आरेळ्या ठोकणा-या बृहस्पतीनी, इंग्रेज बनियांच्या पचनी पजणा-या आपल्या बापजाद्यांचा गाढवपणाबद्दल, चुकून सुद्धा एकदा निषेधाचा फूत्कार काढल्याचे कधी कोणी ऐकले आहे काय ? बळी तो कान पिळी आणि ज्याच्या हाती शिकार तो पारधी हा व्यवहाराचा निसर्ग धर्म दृष्टीआढ करून, इंग्रेजी सत्तेविरुद्ध सिव्यागाळीची नुसती आदळ आपट करणे, एवढेच बडे राजकारण हिन्दुस्थानातील बडे राजकारणी झब्बू गेली ३०-३५ वर्षे अहमदभिकेने खेळत बसले आहेत. पक्षभेद पंथभेद धर्मभेद जातिभेद वगैरे भेदांचे भिन्न भिन्न विदुषकी पोशाख घालून जरी हे झब्बू आपल्या वाणकोटी नाचांची कमाल रात्रंदिवस करीत असले, तरी इंग्रेजी सत्तेला नुसत्या बायकी शिव्या देण्यापलिकडे एकाहि गाढवाची मजल गेलेली दिसत नाही.

नॅसनल कॉँग्रेस घ्या, वृत्तपत्रे पहा, सामाजिक परिषदा अभ्यासा, यूथलीगा तपासा, किंवा रस्तोरस्ती गल्लोगल्ली नित्य उफलणारे हिंदुमहासभेच्या तोडपाटलिकीचे सुरनळे पहा, जिकडे पहाल तिकडे शहरी झब्बूंचा गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ ! निरनिराळ्या चळवळीचा धुमाकूळ सर्वत्र अखंड माजल्यामुळे, ब-याच बावळढाना स्वराज्याचा चांदोबा डोक्यापासून दीड बोटावर आल्याचा भास होतो. पण राष्ट्रीय स्वातंत्र्याचे आकाश चुटकीसरसे चाटण्यासाठी हात हातभर जिभा बाहेत काढणारांना आपल्या पायाखालची जमीन खचत चाचली आहे आणि आजूबाजूला कसली आग भजकली आहे, याची मुळीच दाद नाही. इंग्रेजी सत्तेचा फास ज्या ज्या वळणानी, गाठीनी आणि पेचानी हिन्दुस्थानाच्या गळ्याभोवती बसत गेला आणि अखेर ब्रम्हगाठीने कायम घट्ट झाला, ती वळणे त्या गाठी आणि ते पेच, ब्रम्हगाठीकडून उलट सुरूवात करून सोडविल्याशिवाय हा फास सुटणे शक्य नाही.

प्रकरण २ रे

पोटाच्या पापाचा व्याप बेदरकार आणि बिनकाळजाच्या भांडवलशाहीचा व्याप बाढला, श्रीमंतांच्या चैनबाजीच्या भस्मासुरी भुकेचा वणवा चोहीकडे भडकला, देशातली संपत्ति काही थोड्या धनाढ्यांच्या तिजो-यात अडकून, जनता अनन्य दशेला येऊम मिळाली आणि शेतक-याच्या शेत-जमिनीवर श्रीमंत भांडवल्यांचे वाडे आणि कारखाने बसले की त्या देशाचा –हास होत चालला, असा सिद्धांत गोल्डस्मिथ कवीने आपल्या ‘ उध्वस्त खेडे ’ काव्यात सन १७७० साली व्यक्त केला. आज या सिद्धान्ताला २६० वर्षे होत आली. विषयाच्या प्रतिपादनासाठी कवीने इंग्लण्ड देश घेऊन त्याच्या –हासाचे चित्र रंगविले आहे. शेती बुडविल्यामुळे इंग्लण्डचा –हास झाला, असे कवीने म्हटले आहे, ते कितपत खरे खोटे किंवा कल्पनामय काव्य, हा प्रश्न बाजूला ठेवला, तरी इंग्लण्ड शब्दाच्या जागी इंडिया शब्द घातला तर आपल्या जातभाईच्या अमदानीत हिन्दुस्थानची अवस्था कशी होणार आहे, याचेच भाकीत गोल्डस्मिथने करून ठेवले, असे म्हणावयास हरकत नाही. भांडवलशाही नंगा नाच सुरू होण्यापूर्वी, इंग्लण्डची स्थिती कशी होती ? कवि म्हणतो – A time there was, era England’s griefs began, When every rood of ground maintained its man; For him light labour spread her wholesome store; Just gave what life required, but gave no more; His beat companions, innocence and health; And his best riches.ignorance of wealth. [भावार्थ – इंग्लण्ड देशावर दुर्दैवाचा पगडा पडण्यापूर्वी असा एक काळ होता की, त्या वेळी जमिनीचा एकूण एक तुकडा प्रत्येक मनुष्याला पोटभर भाकर देत असे. थोडेसे श्रम केले की धट्ट्याकट्ट्या जीवनाला लागणा-या अन्नवस्त्रादि सर्व आवश्यक गोष्टी त्याला गरजेपुरत्या सहज मिळत असत. बाजवीपेक्षा फाजील पुरवठा होत नसे आणि त्याची जरुरहि नसे. सर्व लोक सुखी संतुष्टचित्त आणि निरोगी असत. जवळ जे काही असेल त्यातच समाधान मानून, द्रव्य साठवून ठेवण्याची आसुरी लालसा त्यांना कधीच शिवली नाही.] ब्रिटिशांच्या आगमनापूर्वी माती मळून सोने काढणारा हिन्दी शेतकरी याच समाधानी वृत्तीचा आणि स्थितीचा नव्हता काय ? पण इंग्लण्डातल्या पोटाच्या बंडाने बोकार बनलेल्या लोकांच्या माध्यान्हीची सोय लावण्यासाठी, जेव्हा इंग्रेजादि युरपियन बनियांच्या तागड्यांच्या तंगड्या हिन्दुस्थानाला भिडल्या आणि राजकारणाबरोबरच सुधारणेच्या नावाखाली भांडवलशाहीचा व्यापारी नंगा नाच येथे सुरु झाला,