शेतक-यांचे स्वराज्य: Page 6 of 44

बिनउपाय चालू आहे. प.वा. दादाभाई नवरोजी, रमेशचंद्र दत्त प्रभृती अर्थशास्त्रपटूनी वाढत्या हिन्दवी दारि-याची आरोळी ५० वर्षापूर्वीच मारली. राजकिय बंडाच्या उपक्रमाचा नुसता खरा खोटा बास येताच त्याच्या पाळ्या मुळ्या उखडताना जे ‘व्यापारी’ इंग्रेज सरकार सुक्या ओल्याचीहि लवमात्र क्षिती बाळगीत नाहीं, त्याला एतद्देशीय पोटाच्या बण्डाची मात्र दखल करण्याची बुद्धी होत नाही. इंग्रेजी साम्राज्याचा जगढ्व्याळ वेलविस्तार वाढविला आणि अखेर आज त्याच इंग्लण्डचे तेच पोट-मजूरपक्षाच्या रुपाने-प्रबळ बण्डखोर बनून त्याच साम्राज्याचे कर्णधार व सूत्रधार होऊन बसले आहे. पोट काय करणार नाही? --नव्हे, करवणार नाही? पोटानेच हिन्दी नागरिकाना आणि शेतकरी मजुराना फिजी केन्याचे काळे पाणी दाखविले आणि पोटाच्या बण्डामुळे तेथे उपरे आलेले गोरे लोक बण्डखोर आणि मस्तवाल बनले. पोटाच्या पोटी पुण्याच्या काय काय खाणी आहेत, याचा ठावठिकाण जरी अद्याप कोणास लागलेला नाही, तरी पोटाची पापे आज सा-या जगभर दिवसाढवळ्या मोकाट वावरत आहेत, यात मुळीच संशय नाही. ‘ना विष्णूः पृथिवीपति’ या अजागाळ भावनेने राजा आणि राज्यकारभारी यांच्या तोंडाकडे पाहून, आपल्या सर्वांगीण जीवनाच्या उत्क्रान्ति अपक्रान्तीची सट्टेबाजी खेळण्यास सवकलेल्या हिन्दी लोकाना न झाल्यामुळे, वर्तमान दैन्याचे खापर ते ब्रिटिशांवर फोडतात. पण ही चूक आहे.

मांजर उंदरासाठी, कोल्हा कोंबजासाठी, पठाण-मारवाडी, व्याज्यासाठी, भट दक्षणेसाठी, भांडवल्या नफेबाजीसाठी, कायस्थ प्रभु कारकुनीसाठी, मराठा-क्षत्रियत्वाच्या कोरड्या ऐटीसाठी, झब्बू मानपानासाठी, पारशी दारू-ताडीच्या मक्त्यासाठी, मद्राशी पोट भरण्यासाठी, आणि ऐदी श्रीमंत कोणशीलदारीसाठी जसे जीव टाकतात, तसा इंग्रेज प्राणी व्यापारसाठी जगाच्या पाठीवर हवा तेथे जीवाचे रान करीत भटकत फिरेल. व्यापार म्हणजे इंग्रजाचा देव. तोच त्याचा धर्म आणि तेच त्याचे वर्म. या वर्माच्या मर्माला जरा मुंगी चावली की इंग्रजाचा प्राण तेव्हाच कासावीस होतो. इंग्रजानी हिन्दुस्थान देश पादाक्रान्त केला, तो हिन्दी लोकाना माणुसकी देण्यासाठी, त्याना सुधारण्यासाठी, वगैरे गप्पा, भाषा-सौदर्याचे मासले आहेत. शिकंदर तार्तर मोगलाप्रमाणें इंग्रेज जर जात्या शुध्द राजकारणी देश-जेते असते, तर हातात तागड्या घेऊन सा-या जगाच्या ज्ञात अज्ञात भागांत त्यानी आपली तंगडतोड केलीच असती कशाला? जशी गूळ तेथे माशी आणि व्हेकन्सी तेथे मद्राशी तसा जेथे व्यापार तेथे इंग्रज , हा सनातन सिद्धान्त समतावा. व्यापारापलीकडे तसा इंग्रजाजवळ राजकारण नाही, समाजकारण नाही, धर्म नाही आणि नीतीहि नाही. व्यापार नसेल तेशे इंग्रज श्वास सोडायलाही पळभर राहणार नाही. इंग्रेजी व्यापारीचू पकड राजकारणाच्या आटारेट्याशिवाय जर कायमची शाबूत टिकत असेल, तर इंग्रेज लोक राजकारणाच्या फंदात पडायला मुळीच तयार नाहीत. मात्र व्यापारी पकडीची मांड जर राजकारणी वचकाशिवाय किंचितहि ढिली पडण्याची त्याना शंका असेल, तर तेवढ्यासाठी राजकारणच काय, हवे ते नवे कारणसुद्धा हाताळायला इंग्रेज लोक मागेपुढे पाहणारे नव्हत. हिन्दुस्थानाच्या एकमुखी एकसुत्री सम्राटपदाची दिल्लीची किल्ली इंग्रेजानी केवळ व्यापाराच्या आचद्रार्क अमरपट्ट्यासाठीच हस्तगत केली आहे. त्यात त्याना राजकारण साधावयाचे नाही किंवा राजनीतिशास्त्रावर नवीन शोध लावायचे नाहीत. बोलून चालून इंग्लंड हे ‘शॉपकीपर्स नेशन’ ( दुकानदारीचे राष्ट्र ). त्याना मोगल बादशाहीप्रमाणे चक्रवर्तिपदाचे बेगडी ऐश्वर्य मिरवून आणि हिन्दी लोकांच्या आत्म्यात आत्मा मिसळून करायचे काय ? केवळ व्यापाराच्या वृध्दीसाठी नाइलाजाने त्या बिचा-याना या भरतखंडाच्या सम्राटपदाची उलाढाल करणे भागच पडले.

राजकारण म्हणजे इंग्रेज प्राण्यंचे साध्य नसून साधन आहे. अशा प्राण्याशी राजकारणी झगडा देऊन स्व-राज्. प्राप्तीच्या दंगली करणारे हिन्दी लोक मुर्ख नव्हत तर कोण ? इंग्लंड बोलून चालून बलियांचे राष्ट्र. बनियेगिरी हाच प्रत्येक इंग्रेजाचा पिंड. राजकारण असो नाहीतर धर्मकारण असो, इंग्रेज आदमीं त्याला व्यापारी धोरणानेच हाताळीत असतो. अशा बनिया वृत्तीच्या आणि भांडवली पिण्डाच्या इंग्रजानी शुद्ध तत्वज्ञानी हिन्दुस्थान घशात उतरून, आज ते या महाखण्डाचे धनि होऊन बसले. इंग्रजानी हिन्दुस्थान कसे पाजाक्रान्त केले, कां केले, वगैरे ऐदी प्रश्नंची चिकित्सा आज फुकट आहे. इंग्रेज आज हिन्दुस्थानाचे जेते मालक आहेत आणि हिंदी लोक आज त्यांचे