शेतक-यांचे स्वराज्य: Page 44 of 44

ठेवण्यासारखे आहे.

हिन्दुस्थानता पिढिजात शेतकरी यापुढे मजूरच राहणार काय ? नाही नाही, त्रिवार, शतवार नाही. त्यांच्या बापजाद्यांचा नांगर त्याना आरोळ्या मारुन सांगत आहे, हिन्दी मजुरानो शेतकरी बना. तुम्ही जर अभेद भावाने एकवटाल, देव धर्म जातपात असल्या क्षुद्र आणि हलकट कल्पनांच्या छाताडावर लाथ मारुन एकजिनसी संघटित व्हाल, आणि तुमच्या बापजाद्यांची मातीचे सोने करणा-या शेतीच्या किमयेचे एकनिष्ठ किमयागार बनाल, तर मुत्सद्यांच्या घोरपणाला चुकवील, इतक्या थोड्या काळात नांगर चिन्हांकित राष्ट्रध्वजाखाली शेतक-यांचे स्वराज्य स्थापन करुन, या अभागी भरतखंडाला पुन्हा सभाग्य सुवर्णभूमी बनवाल, यात मुळीच शंका नाही. तथास्तु.