शेतक-यांचे स्वराज्य: Page 5 of 44

आहे.

पूर्वीच्या कान्तियुगात हिन्दी आदमी आणि विशेषतः शेतकरी मूठभर साठ आणि पोटभर भाकरीला तरी मुकलेला नव्हता; पण आजच्या शांतिप्रधान ब्रिटिश सुवर्णयुगात मोठमोठ्या विद्वान पंडीतानाहि भीक मागून पसाभर धान्य मिळवण्याची पंचाईत पडली आहे. सन १८५७ साली अखिल भरतखंडाने राजकारणी स्वातंत्र्यासाठी निर्वाणीच्या तगड्या झाडल्या; पण आज राजकारणाचा प्रश्न मागे पडून, भाकरीच्या सुक्या ओल्या तुकड्यासाठी आपंडित अनाड्याना हातापायाना आचके देण्याचा प्रसंग येऊन ठेपला आहे. ब्रिटिश राजवटीने आमच्या मेंदूची आणि जिभेची वाढ भरंसाट केली, पण पोटाच्या पापाकडे पाठ फिरविली. जगाचा एकूण एक व्यवहार पोटासाठी. ब्रिटिशानी हिन्दुस्थान घशात टाकले पोटासाठी. क्रांतीची भस्मासुरी भूक आणि शांतीची तृष्णा प्रथम पोटालाच लागते. इतिहालाची पृष्ठे मानवी रक्ताच्या लालभडक रंगाने रंगविणारी महायुध्दे आजपर्यंत या पोटानेच घडवून आणली. राजकीय वर्चस्वाची भावना, जित आणि जेते, कारखानदार आणि कामगार, किंवा मालक आणि नोकर हे भेद पोटाच्या पोटीच जन्मलेले आहेत. सावाचा चोर, सज्जनाचा दुर्जन, मित्राचा शत्रू, राजनिष्ठाचा राज्यक्रांतिकार बनविण्यांच्या कामी पोटांच्या तिडकाची वकिली किंवा याचनाच कारण होते. मानो मनुष्याच्या मानाची मान कापण्याचा कुपराक्रम, आणि स्वदेशाच्या उदरभरणासाठी परदेशाच्या स्वातंत्र्यावर कारस्थानचे जळजळीत निखारे ओतण्याची राक्षसीवृत्ति पोटानेच आजवर चेतविली. एक पोट नसते, तर या जगाला मसणवटीचे रुप आले असते. मसणवटीत गुरे वावरतात, आणि तीहि म्हणे पोटासाठीच! तेव्हा मसणवटीची उपमाहि शोभणार नाही. पोट नसते तर जगच जगले नसते, किंबहुना ते अस्तित्वातच आले नसते. सगळी बंडे पत्कतली, पण पोटाचे बंड पत्करत नाही. राजकारणी कान्त्यांची बंडे आपल्याला मोठी भयंकर वाटतात.

कांतिचक्राचा थैमान सुरू झाला की त्यात पडणा-या माणसांच्या आहुती पाहून किंवा ऐकून आपले मन चर्र होते. परंतु त्या बंडांना किंवा मानवांच्या कत्तलीना कारण आपले पोटच आहे; अर्थात् ते किती भयंकर असले पाहिजे, याचा मात्र सहसा कोणी विचार करीत नाही. याचे कारण पोटाचा आपलेपणा किंवा आप्पलपोटेपणा. इंग्लडच्या ब्रेडबटरसाठी तांदळाच्या पेजेला गुकलेल्या हिन्दी शेतक-याची दैन्यावस्था पाहून आमचे ब्रिटिश सरकार सुध्दा जाड जाड रिपोर्टभरअश्रूंचा धबधबा गाळते. पण दैन्याला कारण आपल्या इंग्लण्डचेच पोट, ही नेमकी गोष्ट त्या धबधब्यात बिनचूक वाहून जाते व बेपत्ता होते. शेतकरी मेला कीं देश भिकेला लागला, ही गोल्डस्मिथची निर्वाणाची किंकाळी इंग्लण्डने धिःकारल्यामुळे त्याला व्यापाराच्या सबबीखाली स्वतःच्या पोचासाठी ब्रिटिश साम्राज्यवृध्दीचा आठारेटा करण्याची पाळी आली. हा अनुभव दृष्टीसमोर असताहि, स्वतःला पेज आणि इंग्लण्डला भात चारणा-या हिंदी शेतक-याचा –हास साम्राज्य-सत्ता-वाजीच्या मदात त्यानी उघड्या डोळ्यांनी पहात स्वस्थ बसावे हा मोठा क्रांतिकारक देखावा नव्हे काय? शेतक-याची शेतकी मेल्यामुळे तो कर्मचारी होऊन देशोधडीला पोटासाठीहवी ती मजुरी करुन जगण्याची धडपड करीत आहे. याचा परिणाम शहरी लोकावर होऊन; त्यांचीही उपासमार सुरु झाली आहे. म्हणजे पोटाच्या बण्डाचा धिंगाणा आता सर्व हिन्दुस्थानभर संचार करु लागला आहे. श्रमजीवी शेतकरी आणि वुध्यपजीवि शहरी वा दोघांच्याहि दुःखाना तीव्र एकजूनसीपणा आल्यावर, कान्तीच्या स्फोटाचा भाजी परिणाम यथातथ्थ वर्णम करण्याची कामगिरी भविष्य काळालाच चांगली साधेल. पोटाचे बण्ड आज सा-या जगावर धुमाकूळ घालीत आहे. रशियांतील राज्यकांति पोटानेच केली आणि झारला सहकुटुंब सहपरिवार कुत्र्याच्या मोतानें ठार मारला पोहि या पोटानेच.

जर्मनीसारखे बलाढ्य राष्ट्र, पण या टीचभर पोटाच्या आगीने त्याच्या सर्व शस्त्रास्त्र संपत्तीची राखरांगोळी करुन त्याला गायीपेक्षाहि हीन दीन केले. पोटाच्या बण्डानेच इंग्लण्डात मजूरपक्ष निर्माण झाला आणि चालू घटकेला ब्रिटिश साम्राज्याची सुत्रे याच पोटार्यी पार्थिवांच्या हाती दुस-यांदा आलेली आहेत. सर्व जगात पोटाने मारलेले जर कोणते राष्ट्र असेल तर ते हिन्दुस्थानच होय. जगाच्या पोटाच्या बण्डाची आग विझवण्यासाठी हिन्दुस्थानाने आजपर्यंत आपली चामडी सोलवटून घेतली. पण आज त्याच्या चमढीके झोपजीमे आग लागली असून, ‘बुझानेवाला कौन है?’ या त्याच्या किंकाळीला जगाकडून सक्रीय उत्तर मिळेनासे झाले आहे. पोटाचे भयंकर बण्ड येथे आज कित्येत अहोरात्र बिनअटकात व