शेतक-यांचे स्वराज्य: Page 4 of 44

मामले अखंड चालू असता, वेळी एखाद्या सैन्याने शेतांतल्या उभ्या पिकाची कापणी करुन लुटली, तरी नगाला नग आणि डोळ्याला डोळ्याचा सूड उगविण्याइतका हिन्दी शेतकरी नांगरबहाद्दर आणि तलवारबहाद्दर असे पुरूषांचीच गोष्ट कशाला? पुरूष घरात नसता, दरवडे आणि परचक्रांची झाप हिंदी बायकानीहि परत फिरविल्याचे पराक्रम इतिहासात रेळचेळ आढळतात. रोजेची बाईल परका मनुष्य दृष्टीसमोर पळवून नेत असता, त्या अधमाचा जागच्या जागी मुर्दा न पाडता, आजूहाजूचे चार ‘ संभावूत साक्षीदार ’ घेऊन पालिस ठेचणात ( Station ) कागदी फिर्यादी देणारे महात्म्ये त्या क्रांतीच्या काळात लोकांच्या स्वप्नी सुध्दा नव्हते; मग पाह्यला कोठून मिळणार? असली नामर्दाची अवलाद शांतीच्या स्मशानयुगातच कशी पैदा होत असते, याचे दाखले चालू राजवटीत दररोज मुबलक दिसून येतात. हिन्दुस्थानने सम्राट अशोकाचा अखिल राष्ट्रीय शस्त्र-संन्यासहि पाहिलेला आहे आणि पानपतची घनघोर महायुध्देहि अनुभवली आहेत.

येथे शेकडो परकीयानी स्वा-या केल्या, कल्पनातीत रक्तपात केले, राज्यक्रान्त्यांचा धुमाकूळ उडविला, लुटारू धाडश्यानी संपत्तीची घवाडेच्या घवाडे काबूल कंदाहारकडे पळवून नेली, पण त्या वेळी सुध्दा हिन्दुस्तान आजच्याइतका जगायला नालायक आणि अन्नाला मोताद झाला नव्हता. औरंगजेबाची कारकीर्द भयंकर रंगात रंगविण्याचा मोह न आवरणा-या वृहस्पतीना सुध्दा हे कबूल करावे लागेल की त्या काळी सुध्दा भेदरट हिन्दु आणि आचरट मुसलमान उभ्या हिन्दुस्तानात सापडणे मुष्किलीचे असे. आजच्या शांतीप्रिय कमजोर दृष्टीला भयंकर वाटणा-या त्या क्रान्तीला काळात, हिन्दुस्तानची शेती ओसाड पडली नाहीं आणि तांदळाच्या चार दाण्याला शेतकरीहि कधी मोताद झाला नाही. कारागीर भिकेला लागला नाही आणि ज्ञानी पंडितालाहि उपासमार भोगण्याचे शांतिसौख्य अनुभवावे लागले नाही. क्रान्तीच्या या रक्तपाती लालबुंद युगात हिन्दी आदमी निसर्ग-निर्मित मिठाच्या खड्याला मुकला नव्हता, किंवा टीचभर चाकू सुरीला पारखा झाला नव्हता. कान्तीचा धुमाकूळ तुफानी झाजावाताप्रमाणे त्यांच्याभोवती अखंड घडामोडी घडवीत असतानाहि, हिन्दी मनुष्य सांसारीक आणि राष्ट्रीय झगड्यांच्या क्षेत्रात सवसारखा मर्द म्हणूनच सतत उभा असे. राजा कलस्य कारणम्. यथा राजा तथा प्रजा. या म्हणी पुष्कळांना तोंडपाठ येतात. पूर्वीच्या कान्तीयुगात हिन्दुस्थान मर्द होता आणि आजच्या शान्तियुगात तो मुर्दा बनला. याची अनेक कारणे असली, तरी राजकारण हे मुख्य कारण आहे. म्हणूनत ब-याच एकाक्ष हिन्दी पुढा-यांचा राजकारणी काथ्याकुटावर बराच जोर असतो. ब्रिटिशपूर्व क्रान्तीकारक विजयी जेत्यानी दिल्लीच्या राजधानीत अनेक रियासतींच्या उलटापालटी केल्या; राजकिय सत्तेच्या जोरावर हिन्दुस्थानच्या सामाजिक धार्मिक आणि आर्थिक जीवनात त्यानी विलक्षण क्रान्ति केली आणि आपापल्या विशिष्ट संस्कारांची रयतेवर कायमची छापहि पाडली; पण त्यानी या देशाची आतडी कातडी धुवून आपापल्या देशाची घरे भरली नाहीत.

हिन्दुस्थानाला भणंग भिकारी बनवून, आपल्या देशाच्या वैभवाचे मनोरे उभारले नाहीत. हिन्दुस्थानची कामगिरी ठार आणि कारागीर उपाशी मारून, त्यानी आपल्या देशातल्या व्यापा-यांच्या गंगाअळी भरल्या नाहीत. देशी शेतक-यांच्या पाठकण्याचे मणके करांच्या करवतीने कापून, त्याना धान्याच्या राशीपुढे उपाशी मारले नाही. प्रत्येक विजयी जेत्याने दिल्लीचे सार्वभौम तत्क काबीज करताच, हिन्दुस्थानालाच आपला मायदेश मानून, येथेच कायमचे वास्तव्य केले. मोगल बादशाही तर हिन्दी जीवनात इतकी समरस होऊन गेली कीं, दिल्लीच्या तक्तावर बसलेल्या बारा बादशाहांपैकी सहा बादशाहांच्या माता हिन्दु होत्या. हिन्दुस्थानात वंश जाति धर्म क्तीहि भेद अस्तित्वात असले तरी मोगल रियासतीच्या अमदानीत, हिन्दु आणि मुसलमान दिल्लीकडे पाहताना एकदम एकजिनशी अभेदभावी बनत असत, ही मुद्याची गोष्ट आज हिंदु-मुसलमान-द्वैताची धुळवड शेणवड खेळणा-या हिंदी पुढा-यांच्या भ्रष्ट मनोवृत्तीत घुसत नाही. यथावकाश कान्तिचकाची गति बदलली आणि कान्तिप्रधान मोगल दिल्ला खतम् होऊन, त्या जागेवर सान्तिप्रधान ब्रिटिश दिल्ली चमकू लागली, तिच्या शांतिमय शंभर वर्षांच्या अमदानीत हिंदी शेतकरी किती उन्नत झाला, हिंदी कारागिराची केवढी भरभराट झाली, हिन्दी लोकांची इतिहासप्रसिध्द मर्दुमकी किती वाढली आणि या देशाची सांपत्तिक शक्ति किती वर्धमान झाली, याची चिकित्सा करणे, हे सुध्दा सध्याच्या शांतिप्रधान आणि कायदेबाज राजवटीत एक भयंकर महापाप होऊन बसले