शेतक-यांचे स्वराज्य: Page 3 of 44

चरख्याने स्वराज्य मिळणार, का टिळकांची देवळे गावोगाव थापून तेथे घण्टा बडविल्याने स्वराज्याचा मेवा अलगज आमच्या घशात घुसणार, असल्या बाष्काळ बायकी बडबडीनाहि विचारांत घेण्याची आज फुरसद नाही. राजकीय चळवळ बरी, का सामाजिक चळवळ खरी, या वादाच्या किसक्या मसणात गेल्या तरी आज पुरवल्या. केवळ तोण्डपाटीलकीने आणि नॅशनल कॉँग्रेसच्या नाटकी थैमानाने प्राप्त होणारे स्वराज्य हिंदूंचे का ब्रिटीश राजवटीत दरसाल रावसाहेब खानबहादूर सर-वगैरे महात्म्यांची पैदास गेली शंभर वर्षे शेकड्यांनी होत आली आहे. हिन्दी जनतेने किती सरांची सरकी आजवर मान्य केलेली आहे? मुसलमानांचे, ढोमिनियन स्टेटस बरे का कंप्लीट इंडिपेंडन्स बरे, या चर्चेला आज फुटक्या कवडीचेहि महत्त्व उरलेले नाही.

आजचा हिन्दुस्तान भाकरीला मातोद झाला आहे. उपाशी पोटावर तत्वज्ञानाचा लेप काय कामाचा? पोटात पेटका आणि पाठीला चटका । जखम जोक्याला आणि मलमपट्टी पायाला । अशी आजच्या हिन्दुस्थानची स्थिति होऊन बसली आहे. विचार उच्चार आणि आचाराच्या क्षेत्रात कान्तीकारक कल्पनांचा थैथयाट कितीहि आकाण्डताण्डवी चालू असला, तरी रोगाचे प्रत्यक्ष निधानच निश्चित न ठरल्यामुळे, वैद्य डागदारांच्या मतवैचित्र्याच्या शिमग्यात रोग्यांची होळी होऊन, जनतेला प्राणान्तीचा शंख करण्याचा प्रसंग येऊन बितला आहे. गेल्या ५० वर्षाच्या राष्ट्रीय चळवळींची फलश्रुति आणि ब्रिटीशांच्या शंभर वर्षे राज्यकर्तृत्वाची पुण्याई काय? तर उभा हिन्दुस्तान भणंग बनला! अन्नासाठी दाही दिशा । आम्हा फिरविशी जगदीशा । म्हणून देशाच्या नावाने पांचजन्य करण्यापुरतीहि हातातोंडाची गाठ घालायला उजगद नाही. कारण पूर्वी दहाहि दिशा फिरवून तरी भक्ताच्या पोटात भाकरीचा तुकडा ढकलणा-या जगदीशाला आज दहाहि दिशा शून्. झाल्यामुळे, आकरावी दिशा कोठे निर्माण करावी, या विवचनेत तो सुध्दा बुळा बावळा आणि खुळा होऊन बसला आहे. देवाच्याच अकलेचे तेरावे पडल्यामुळे, भक्तांच्या पोटाचे बण्ड वर्तमान परिस्थितीचे तीनतेरा करण्यासाठी लालबुंद कान्तीच्या प्रयोगशाळेत धुमाकूळ घालायला सिध्द झाल्यास, त्यात आश्चर्य़ मानण्याचे मुळीच कारण नाही. हिन्दुस्थानात क्रान्तीचा धुमाकूळ सुरू झाला, म्हणून नाटकी आश्चर्याने पाटलोणीची पार्सले धोबीघाटावर रवाना करण्याच्या फार्साने हिंदी जनतेला चकविणा-या सर्वसमर्थ ब्रिटिश सरकारला या क्रांतीच्या आदिअंताची अगदीच काही अटकळ नसंल, असे मानणारा माणूस हिंदु तरी असावा किंवा मूर्ख तरी असावा. हिंदुस्तान ही क्रांतीभूमी आहे. हिला क्रांतीचा संन्यास शिकवून, शांतीचा हव्व्यास धरायला लावणारे लोक एकतर पागल असले पाहिजेत, अगर जिवाला कंटाळलेले आततायी असले पाहिजेत; मग ते ब्रिटिश असोत, त्यांचे राजनिष्ठ हिंदी पोशिंदे असोत, अगर काणीहि असोत. हिंदुस्तानाने क्रांतीचाहि महिमा अनुभविला आहे आणि गेल्या शंबर वर्षे शांतीचीहि कसोटी अजमावली आहे. हिंदुस्तानचा आत्मा जर क्रांतीकर्मा नसता तर, ग्रीक आणि रोमन साम्राज्याच्या धुळीतून डोके वर काढणा-या रानटी ब्रिटन लोकांच्या आंगाचा विदुषक रंग आणि पांगरलेली जनावरांची कातडी आजसुध्दा कायम राहून, त्याना न्यू कॅसलच्या काळशावर आपली दोन प्रहर साजरी करावी लागती.

क्रांतीला रामराम ठोकून जर आपले सर्व दरवाजे शांतीच्या अडसराने हिंदुस्थान घट्ट बंद करील तर अवघ्या २४ तासात हिंदुस्थानेतर सर्व जगाच्या भपक्याचे डोळे पांढरे होतील. शिकंदराच्या स्वरीपासून तो मोगल बादशाहीचा अंत होई पर्यत असंख्य परचक्राचे क्रांतिकारक धुमाकूळ या देशाने आपल्या ह्रदयावर सहज लीलेने खेळविले आहेत.दिल्लीच्या क्रान्तिकारक तक्तावर अनेक चक्रावर्तींच्या रियासती गाजल्या आणि ‘ मी चिरंजीव, मी अमर ’ अशा वल्गना करता करताच, यथा काळ यथावकाश कान्तिचक्ताच्या भोव-यात गडप झाल्या. ब्रिटिशांच्या आगमनापूर्वीचा परचक्राचा इतिहास म्हणजे लुटालुटींचा बेबंदशाहीचा काळ, असे पुष्कळ बावळटाना वाटते. त्यावेळी हिन्दी लोकांचे जीवीत रात्रंदिवस धोक्यात असे, तरी राष्ट्रीय प्रगतीचा मार्ग आताप्रमाणे कधीच कोंदाटलेला नव्हता. लुटालुटीच्या नित्य दंगलीने व्यापाराचा प्रवाह डोंगराळ प्रदेशातून वाहणा-या नदीप्रमाणे चालत होता, तरी आर्थिक भरभराटीला आताप्रमाणे ऊर्ध्व वायूचा घरघराट कधीच लागलेला नव्हता. तो काळ पूर्ण कान्तिमय असल्यामुळे, प्रत्येक हिंदी स्त्रीपुरूषाचे मनगट आणि पाठकणा हव्या त्या परिस्थितीशी टक्कर देण्याइतका मजबूत आणि खंबीर होता. आसेतूहिमाचल रात्रंदिवस लढाईचे