शनिमहात्म्य: Page 6 of 85

पुढे त्याच्या सर्व आयुष्यक्रमात, अखिल विश्वातल्या परिभ्रमणाप्रमाणे ग्रहांच्या ज्या हालचाली होतात, त्यांचा त्या पिंडावर बरा वाईट परिणाम आपोआप घडत असतो. याला आपण असे एक उदाहरण घेऊ. एका खोली रामा कृष्णा आणि गोविंदा असे तिघे जण अनुक्रमे पांढरा निळा आणि पिवळा अशा तीन रंगांचे सदरे घालून बसले आहेत. खोलीला एकच खिडकी असून, बाहेर कडक सूर्यप्रकाश पडला आहे. जोंवर निर्भेळ सूर्यप्रकाश खोतील येतो तोंवर तिघांचे कपडे पांढऱे निळे आणि पिवळेच दिसतात. इतक्यात खिडकीवर तांबडे तावदान धरले, तर काय होईल? तोच पूर्वीचा पांढरा स्वच्छ सूर्यप्रकाश तांबड्या काचेंतून खोलीत आल्यामुळे, रामा तांबडा, कृष्णा जांभळा आणि गोविंद नारिंगी कपड्याचे दिसतील. निळी काच लाविली तर कृष्णाच्या निळ्या कपड्यावर काही परिणाम होणार नाही. पण पांढ-या कपड्याचा रामा निळा दिसेल, आणि पिवळा गोविंदा हिरवा चार पडेल. पिवळी काच आड धरली, तर गोविंदा मात्र पिवळाच पिवळा राहून, पांढरा रामा पिवळा बनेल आणि निळा कृ,णा हिरवा होईल. तद्वत् सूर्याचा प्रकाश सर्व विश्वाला जरी चैतन्य देत असला, तरी त्या प्रकाशाच्या मार्गात निरनिराळ्या ग्रहांचे येणे जाणे अखंड चालू असल्यामुळे, त्या त्या ग्रहांच्या दशा (Influences) निरनिराळ्या कुंडल्यंच्या व्यक्तींवर यथाक्रम यथाकाळ बरावाईट परिणाम करीत असतात. ज्योतिष्यांचे हे म्हणणे खरे मानले तरीहि त्यावर आक्षेप असा येतो की मांडलेल्या कुंडल्या ख-या कशावरून? एका गृहांतला ग्रह दुसर्या गृहात चुकून मांडला, तर त्या मनुष्याच्या प्रकृतीच्या तपशीलात भयंकर तफावत पडणे शक्य आहे, आणि जोंवर मनुष्य चुकीला पात्रच असतो, साध्या हिशोबात सुद्धा ‘हातचा आणि एक’ धरायला विसरतो आणि जोवर ज्योतिषी हे मनुष्यच आहेत, तोवर त्यांनी तयार केलेल्या कागदी कुंडल्यावर आम्ही विश्वास का ठेवावा ? मुळीच ठेऊ नये. मला वाटते विश्वविधात्याला या आमच्या आक्षेपाची आगाऊच अटकळ असल्यामुळे, त्याने आमच्या तळहातावर आमची कुंटली आधीच खोदून ठेवलेली असते. कागदी तपशीलात चुकले, पण ही तळहाती कुंडली कधीच चुकायाची नाही. यामुळे ज्योतिषशास्त्राच्या जोडीनेच हस्तरेषाशास्त्राचीहि बरीच प्रगति झालेली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात अवचित एके दिवशी मला अगदीच अपरिचित व कधीहि न भेटलेले असे ठाण्याचे श्री. वसंत जयवंत चित्रे नावाचे एक तरुण पामिस्ट (हस्तरेषापरीक्षक) भेटले. त्यांनी माझा हात पाहून आयुष्यातील ठळक ठळक प्रसंग तर मुदतशीर सांगितलेच, पण विशेष आश्चर्याची गोष्ट कीं, माझे वय, जन्मतिथि, जन्मवार, सायन व निरयण कुंडल्यातील ग्रहस्थाने, राशी, वैगेरे तपशील बिनचुक फटाफट अवघ्या नऊ दहा मिनिटात सांगितला. ज्या कित्येक गोष्टी फक्त माझ्या मलाच माहीत, त्यासुद्धा त्यांनी सूचनांच्या रूपाने दर्शविल्यामुळे, मी या तुरणाच्या हस्तरेषापरीक्षण प्राविण्याने अगदी चकित झालो. या प्रसंगामुळे माझी बरीच एक शंका आपोआप सुटली. आचार्य होऊन शुद्ध वैदिक विधीने मी विवाहविधी चालवीत असतो, हे कविश्रुतच आहे. त्या विधीतल पाणिग्रहण विधि प्रथम मी जेव्हा अभ्यासला, तेव्हा शेकहॅन्डची पद्धत वरवर विचार करणारांना जरी युरोपियन वाटली, तरी ती वेदकाळाइतकी प्राचीन आणि खास आर्यन आहे, हा एक सिद्धांत सुटला. या नंतर शंका आली की परस्पर वंदनाचे काम जर दुरून जोडलेल्या दोन हाताच्या नमस्काराने भागते, तर त्यासाठी हा शेकहॅण्डचा धसळामुसळी मामला कशाला पत्करावा ? त्यात विशेष काय आहे ? दुसरी एक शंका अशी की जोशी पंचांग पाहाता । मग कां बालविधवा होती ? ।। वधु वरांची लग्ने जुळविताना, त्यांच्या परस्पर संमतिपेक्षा आणि मने जुळविण्यापेक्षा, त्यांच्या कुंडल्यांच्या जुळवाजुळवीचा आणि खुलवाखुलवीचा एवढा द्राविडी प्राणायामी धुगघुस चालतो का ? ‘कुंडल्या जुळवितात’ म्हणजे हे धुडघुश्ये करतात काय ? पण प्रत्येक व्यक्तीची कुंडली, प्रकृति, अथवा पिंड त्याच्या तळहातावरच परमेश्वराने खोदून ठेवलेला असल्यामुळे ज्या वेळी वधू आणि वर पाणिग्रहणासाठी अग्निसाक्षिक आपापले हात एकमेकांत, तळहाताला तळहात चिकटवून, घट्ट धरतात, त्याच वेळी त्यांच्या परस्पर प्रकृतीचे, ग्रहदशेचे आणि पिंडाचे